✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संवेदना वगैरे

च — चाणक्य, Sat, 06/14/2014 - 22:13
तसं तर रोज असते तिथे ती पण आज दिसली मला डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात असं काहीसं झालं मला सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज आणि बहुतेक वेळेला जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला अरे हो, काल ते झाड तोडत होते नाही का.... तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना तिला ते झाड हवय म्हणून? पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही कारण त्या झाडापेक्षाही तिथली कचराकुंडी न हालणं जास्त महत्त्वाचं असणार तिला . . . . 'कुठे राहत असेल ही' 'कशी राहत असेल' 'काय खात असेल' 'आणि काय खावू घालत असेल तिच्या त्या पोराला' 'थंडी-पावसाचं काय करत असेल' 'गळणारं छप्पर असेल की छप्परच नसेल' एक ना अनेक मुंग्यांची रांग लागावी तसे प्रश्न घेऊन मी निघालो तिथून पण ना... एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय

प्रतिक्रिया द्या
2755 वाचन

💬 प्रतिसाद (16)

सा-या जगाने टाकलेल्या कच-यात

यशोधरा
Sat, 06/14/2014 - 22:29 नवीन
सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज
आणि
मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
!!!
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Mon, 06/16/2014 - 17:30 नवीन
खासच आहेत या ओळी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

आतिवास
Tue, 06/17/2014 - 10:31 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कविता आवडली

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/14/2014 - 22:38 नवीन
एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय हे खासच !
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिखाण!

आयुर्हित
Sat, 06/14/2014 - 22:42 नवीन
भावना पोचल्या. अप्रतिम लिखाण!
  • Log in or register to post comments

+१

एस
Mon, 06/16/2014 - 01:39 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

.....सुंदर.

कवितानागेश
Sun, 06/15/2014 - 22:31 नवीन
.....सुंदर. :)
  • Log in or register to post comments

!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 06/15/2014 - 22:47 नवीन
__/\__!!
  • Log in or register to post comments

सुंदर !!!!

धन्या
Mon, 06/16/2014 - 17:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलंय

पैसा
Tue, 06/17/2014 - 00:08 नवीन
अगदी! थेट पोचणारं.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म!!

नगरीनिरंजन
Tue, 06/17/2014 - 05:29 नवीन
हम्म्म्म!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

झंम्प्या
Tue, 06/17/2014 - 06:48 नवीन
भावना छान मांडल्यात. गमतीशीर आहे ना आयुष्य, कोणाच्या मुखी सोन्याचा घास, तर कोणाच्या उरी दुक्खाचा भार,
  • Log in or register to post comments

सुरेख रे चाणक्या.

प्रचेतस
Tue, 06/17/2014 - 08:49 नवीन
सुरेख रे चाणक्या.
  • Log in or register to post comments

यशोधरा यांनी म्हटल्याप्रमाणेच

इन्दुसुता
Tue, 06/17/2014 - 08:50 नवीन
यशोधरा यांनी म्हटल्याप्रमाणेच !!!!
  • Log in or register to post comments

छान लिहिलय!

अनुप ढेरे
Tue, 06/17/2014 - 10:51 नवीन
छान लिहिलय!
  • Log in or register to post comments

चाण्क्य सर, कविता मनाला चटके देउन गेली, फार सुरेख व आशयघन.

निश
Sat, 06/21/2014 - 10:40 नवीन
चाणक्य सर , फार सुंदर कविता आहे. कविने जगाला सभोतालच्या समाजातील व्यथा दु:ख समाजाला जाणीव करुन द्यायची असते आणि तुमची ही कविता ती जाणिव करुन देते. मनाला वेदना देत पिळवटून टाकते. म्हंजे अजुनही माझ मन बोथट झाल नाही असच म्हणिन मी. कविता नक्कीच सुन्न करुन गेली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा