गेल्या महिन्यात छोट्याश्या सुट्टीत घरी जाउन आलो. नेहमी जायच्या आधी माझं आणि बहीणचही आठवडाभर प्लॅनिंग असत की आईच्या हातच काय काय खाउन घ्यायच. शक्यतो इथे परदेशात न मिळणारे मासे आणि भाज्या. (शक्यतो मासेच. कोंबडी / मटण टाळतो , ते काय इथेही खातोच नेहमी)
वर्षभर वजन कमी करण्याचे प्रयत्न करणारे आम्ही दर सुट्टीत हटकुन १-२ किलो वजन वाढवुन येतो.
यावेळी काही दिवस गावालाही जायला मिळाल. तिकडे बोंबील, निवट्या, घोळीच/दाढ्याचं खार(काटा), काटेरी, पापलेटं मनसोक्त खाल्ले.
दोन दिवस सासुरवाडीला ही भेट देउन आलो. आमच्याकडे एक आहे की पाहुणा आला (आणि त्यात तो जावई असला) की त्याला कोंबडी /मटण खाउ घातल्या शिवाय पाहुणाचार झाला अस मानत नाहीत. त्यामुळे नको नको म्हणता नाही सासर्यांनी मटण आणलच. आणि मग सासुबाईंनी जे सुक्क मटण बनवल होत त्याला तोड नव्हती. (मनातल्या मनात सासर्यांचे आभार मानले , अहो नाय तर काय जावयाचा आग्रह म्हणुन त्यांनी मटण नसत आणल तर :) ) हात धुता धुताच आईंना कृती विचारुन घेतली.
मागे एकदा मी सुक्या मटनाची कृती इथे दिली होती ती आमची आई करते तशी, तर आजची ही माझ्या सासुबाईंची कृती.
साहित्य :
१ छोटा चमचा हळद.
२ चमचे मसाला (वाडवळी/मालवणी)
२ चमचे हिरव वाटण. (आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर)
१ १/५ चमचा गरम मसाला
१ चमचा जिरे पुड (भाजलेली)
१ मोठा कांदा पातळ उभा चिरुन.
२ लहान बाटाटे साला सकट गोल फोडी करुन.
२ मोठे चमचे सुक खोबर किसुन. (किसायचा कंटाळा आल्यास १/३ वाटी खोबर आगीवर भाजुन घ्याव आणि मग ठेचुन घ्याव. याने अजुन लज्जत वाढते. )
१/२ किलो कोवळ मटण.
२ चमचे लिंबाचा रस.
तेल, मिठ चवी नुसार
कृती :
फ्राईंग पॅनमध्ये कापलेला अर्धा कांदा आणि खोबर तेल न टाकता परतुन घ्याव. कांदा पारदर्शी झाल्यावर गार करुन बारीक वाटुन घ्याव.
मटण स्वच्छ धुवुन त्याला वरील सर्व मसाले, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ लावुन चांगले मिक्स कराव.
मग त्यात कांद्याखोबर्याच वाटण आणि १ मोठा चमचा तेल टाकुन किमान २ तास मुरत ठेवाव.
फ्राईंग पॅनमध्ये थोड्या तेलावर उरलेला अर्धा कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा.
त्यात मुरवलेल मटण टाकाव. पाणी अजीबात टाकु नये.
त्यात बटाट्याचे काप घालावे. आणि वर झाकण लावुन (झाकाणावर पाणी ठेवाव) आच मंद ते मध्यम ठेवावी.
मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे किमान ३०-४० मिनिटे शिजु द्यावे. त्या दरम्यान बाटाटा पण एकदम मस्त मऊ होतो. (फुटला तरी उत्तम)
मुख्य जेवणात तांदळाची भाकरी जर जोडीला असली तर उत्तमच.
पण सोबतीला २-४ मित्र आहेत, समोर बियरचे मग फेसाळलेले आहेत सोबतीला हा चखणा आणि टिव्हिवर जर्मनी आणि फ्रांस विश्वचषकासाठी झुंजतायत.... आहा हा हा स्वर्ग स्वर्ग म्हाणातात तो हाच आसावा ;)
***************************************************************************
मटणाला पर्याय :
ज्यांना मटण आवडत नाही किंवा चांगल मटण मिळण कठीण आहे त्यांना चिकन वापरुन हिच कृती करता येईल.
चिकनला शिजायला मटणापेक्षा कमी वेळ लागतो, १५ मिनिटं पुरेशी होतात. त्यामुळे आधी कांद्यावर बटाटा शिजवुन घ्यावा, आणि मगच चिकन टाकाव.
***************************************************************************
व्हेज व्हर्जन :
मटणाला पर्याय म्हणुन व्हेज प्रेमिंना सोयाबीन चे तुकडे वापरायला हरकत नाही. सोयाबीन चे तुकडे आदल्या रात्री पाण्यात भीजत ठेवावे.
दुसर्या दिवशी हाताने प्रत्येक तुकडा दाबुन पाणी काढुन टाकावे.
सोयाबीन शिजायला मटणा एवढा वेळ लागत नाही,. त्यामुळे आधी कांद्यावर बटाटा शिजवुन घ्यावा, आणि मगच,सोयाबीनचे तुकडे टाकावे.
सोयाबीन इतक फक्कड लागत की मी लहान असतान चक्क फसलो होतो.
वाचने
26772
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
हलकट साला......
उच्च
In reply to हलकट साला...... by वेताळ
गणपाजी
नकोच..
In reply to गणपाजी by सहज
(विषय दिलेला नाही)
आपल्या
नि:शब्द...!
मृत्युदात
In reply to नि:शब्द...! by विसोबा खेचर
बर्याच
गणपा खुप
छान लेखन
बढीया
(विषय दिलेला नाही)
तू
गणपांना
व्वा!
गणपा इज बॅक
लय दिवसांनी येऊन गणपाचा मिपावर गोंधळ
काहीच बोलणार नाही.
लय भारी रे गण्या!!
रंगाशेठ
In reply to लय भारी रे गण्या!! by चतुरंग
ओक्के रे!
In reply to रंगाशेठ by गणपा
ट्राय मारुन बघेन,
In reply to लय भारी रे गण्या!! by चतुरंग
ठ्ठो!!!!
In reply to ट्राय मारुन बघेन, by रामदास
मारा, मारा गरिबाला!
In reply to ट्राय मारुन बघेन, by रामदास
सूचक!
मस्त
कोवळ्या
फोटो
येलकम बॅक.. ओगा,.!!
पोटभर
समस्त
एकदम खतरी
आज केल रे.. १स्ट क्लास झालेल
एssssss
In reply to आज केल रे.. १स्ट क्लास झालेल by लवंगी
असच , तुम्हाला चिडवायला
In reply to एssssss by श्रावण मोडक
X(
In reply to असच , तुम्हाला चिडवायला by लवंगी
शिजलेच नाहि ..
धन्यवाद
आई ग :(…. भूक लागली :(
मस्त
मस्त
कोवळं मटन ? त्या कोवळ्या
शब्दांच्या पलिकडले