रूप सावळे आतीव सुंदर
भक्तिरसाचा मनात पाझर
उठे शहारा अंगांगावर
अंतरात वसतो मुरलीधर
निळा गंध त्या निळसर देही
मोहक इतुका तो निर्मोही
वरवर सारे चंचल श्यामल
आत गूढ अविचलसे काही
चराचरांतून घुमे बासरी
सप्तसूर सावळा मुरारी
वाहे यमुना अमृत होवुन
उठती आतुन अथांग लहरी
प्राण नांदतो ह्या तीरावर
त्या तीरावर मन झेपावे
कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे
कृष्णातच समरसून जावे
© डॉ.अदिती जोशी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3142
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच छान कविता!
सुरेख!! धन्यवाद!!
अस्तित्वाचंच दुसरं नांव किंवा
भाव...!
In reply to अस्तित्वाचंच दुसरं नांव किंवा by संजय क्षीरसागर
कविता छान जमलीये!
+१
In reply to कविता छान जमलीये! by प्यारे१
+२
In reply to कविता छान जमलीये! by प्यारे१
+२
In reply to कविता छान जमलीये! by प्यारे१
सुंदर कविता. दुसरं कडवं फार
हेच म्हणते..
In reply to सुंदर कविता. दुसरं कडवं फार by कवितानागेश
जय हो माते आनंदमयी
सुरेख
प्राण नांदतो ह्या तीरावर त्या
छान
सुंदर
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}कविता आवडली.
छान!
कविता आवडली!
वाह वाह