वेळ आली वेळ झाली
मनुजा सांगून गेली
काळ आहे बदलला
झटपट कामाला लागा
संप आणिक दगडफेक
झाले ते रोजचेच
बॉम्बस्फोटही पचवण्याची
आम्हास आता सवय झाली
नेते आमुचे बसले नुसते
मस्ती त्यांना खुर्चीची
सामान्यांना असते चिंता
इथे रोजच्या खर्चाची
सगळे असती इथे सारखे
मरणा-यांचे नशीब सारखे
किती गेले, किती राहीले,
अतिरेक्यांनी काय साधले
निष्क्रीयतेने बघतो आपण
चला करुया आज एक पण
वेळ आता आली क्रुतीची
एकजुटीने लढण्याची
बघू नका जात-पात
गुंफून हातात हात
एकदिलाने सारे लढू
शत्रुस त्या दूर पळवू
छत्रपतींचे आम्ही सैनिक
राष्ट्राचे ही आम्ही पाईक
राष्ट्र आमचे, देश आमचा
अभिमान आम्हां तिरंग्याचा
वेळ आली, सांगून गेली
ऊठ आता होई जागा
शत्रू आला दाराशी
लढण्याची बघ वेळ झाली.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2409
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली आहे कविता
- शत्रू कोण याची व्याख्याही आली असती तर बरं झालं असतं.
- कृतीचं स्पेलिंग: kRutI / kRutee छोट्याऐवजी मोठा R वापरला की रु ऐवजी ऋ येतो.
अदितीशत्रू आला
धन्यवाद
कविता खूप
शेवटची
छान आहे कविता..