Skip to main content

वसंतराव देशपांडे

लेखक व्यंकु यांनी मंगळवार, 14/10/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय बंधू आणि 'मैत्रिणींनो' मी तसा मिपावर नवीन आहे त पहिल्यांदाच लिहीतोय तेव्हा सांभाळुन घ्या. तर सांगायचा मुद्दा असा कि माझ्याकडे वसंतरावांची एक अप्रतिम चित्रफित आहे पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए तेव्हा जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं. [एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2732
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

एक प्रश्न कोणती चित्रफित आहे? रंगीत आहे का, कॅलिडोस्कोप ने प्रकाशित केलेली? का ७७ च्या सवाईमधली आहे? का याहून इतरही आहे? महत्वाचा प्रश्न: तिच्या अशा ओपन वितरणाने कोणाच्या कॉपीराईटचा भंग तर नाही ना होणार? (जिज्ञासू वसंतवेडा) पुण्याचे पेशवे

" पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए ...." का? आपण आपली ध्वनिचित्रतबकडी यु ट्युब किंवा डेली मोशन वर अपलोड करु शकता (१०-१५ मिनिटे च्या क्लिप)... एकदा अपलोड झाल्यानंतर मिपावर दुवा देऊ शकता म्हणजे सर्वांना बघता येईल. नाम्या झंगाट

ही क्लिप तासाभराची आहे

व्यंकू, (हे संबोधन चालेल का? अहो-जाहो नको असं लिहिलंय म्हणुन मोकळेपणानं विचारतोय) नेकी और पुछ पुछ? फक्त एकच विनंती- वर पेशव्यांनी म्हणल्याप्रमाणे त्या तबकडीत नक्की काय काय आहे आणि कॉपीराईटच्या कायद्याचा भंग तर नाही होत ना, हे इथं स्पष्ट केलं तर फार बरं होईल!
पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ.
च्छ्या:! त्यात काय? हजार मागा, दोन हजार मागा, पाच हजारसुध्दा देऊ की! हमारे वसंतखाँ के वास्ते कुछभी!!!!

(व्यंकू चालेल नव्हे धावेल) मला राग वगैरे काही कळत नाही पणा त्यात वेड्या मना तळमळसी, रवि मी इ गाणी आहेत. साथीला नाना मुळ्ये आणि गोविंदराव आहेत

मला खालील पत्त्यावर पाठवा phadke1984@gmail.com I have very high speed Internet connection... I can also upload it for others..

In reply to by आगाऊ कार्टा

मला असं वाटतं इथे बर्‍याच जणांचा गैरसमज होतो आहे. व्यंकटेश म्हणत आहे "जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं. [एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ. " ह्याचा अर्थ असा की त्यांच्याकडे ही चित्रफीत तबकडी (व्हीसीडी/डीव्हीडी) स्वरूपात आहे व ते तुमच्या पोस्टल पत्त्यावर पाठवू शकतील.