✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दाबाहेर

च — चाणक्य, Wed, 05/21/2014 - 16:03
बोलवू का पावसाला? का थांबू जरा? तू म्हणशील तसं आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ! . . . तिला वाटतं मी खोटंच बोलतो किंवा पावसाचा अंदाज वगैरे वाचून असं काहीबाही बोलतो आणि नसतीलच पावसाचे दिवस तर मग उसासा सोडते ती नुसताच पण मला खरच येतं अहो पावसाला बोलावता हल्ली-हल्लीच जमायला लागलंय. खरं तर अचानक आलेला पाऊस तिला आवडत नाही म्हणून मग मी विचारत असतो तिला तिला वेडेपणा वाटतो हा माझा पण पाऊस येतोच दरवेळी...हो येतोच अगदी चिंब भिजवणारा पाऊस येतो ती भिजते कधीकधी...अगदीच नाही असं नाही पण खूप काम असतं तिला मग मी ही लागतो कामाला पाऊस मात्र येतो हां...नक्कीच येतो आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ! . . . कधी कधी मी रात्रही आणतो तिच्यासाठी थोडीशी जास्त बराच वेळ थांबतात मग चांदण्या आकाशात चांदण्यांना बोलता येत नाही आपण वर बघितलं की दिसतात त्या... माझं घर खूप खाली आहे कदाचित त्यामुळे दिसत नसाव्यात तिला चांदण्या मग मी एकदा आकाश आणलं खाली जरास्स लख्ख दिसायला लागलं होतं एकन्एक नक्षत्रं पण गजर वाजला तेव्हढ्यात गजराचं आभाळासारखं नसतं आभाळाला चालतं जरा मागं पुढं झालेलं समजूतदार असतं ते आणि त्यातून माझ्या शब्दाबाहेरही नाही! . . . ती नेहमी म्हणते मला लांबचच बरं दिसतं...आभाळ वगैरे, जमिनीवरच्या वस्तू तर शोधाव्या लागतात आता मात्र मी ठरवलय सगळं जागच्या जागी ठेवायचं सारखी शोधाशोध बरी नाही... तिलाही त्रास कमी. शिवाय, या सगळ्यामुळे एक झालंय मला आता उधाणलेला समुद्र आवरता यायला लागलाय ईतकच काय, परवा तर एक मोठ्ठी लाट विचारत होती, येऊ का म्हणून आता तर समुद्रही माझ्या शब्दाबाहेर नाही...!

प्रतिक्रिया द्या
1707 वाचन

💬 प्रतिसाद (10)

__/\__!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 05/21/2014 - 23:45 नवीन
__/\__!! शब्दच नाही....
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

आत्मशून्य
गुरुवार, 05/22/2014 - 00:44 नवीन
खतरनाक, बिनतोड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

आई ग्गं!!!

इन्दुसुता
गुरुवार, 05/22/2014 - 08:37 नवीन
आई ग्गं!!! रचना कासाविस करून गेली, तरीही आवडली.
  • Log in or register to post comments

जबरदस्त...!!!!!!

प्रचेतस
गुरुवार, 05/22/2014 - 09:26 नवीन
जबरदस्त...!!!!!!
  • Log in or register to post comments

सुंदर!

आतिवास
गुरुवार, 05/22/2014 - 09:30 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

रोमांच!!!!

स्पंदना
गुरुवार, 05/22/2014 - 10:55 नवीन
रोमांच!!!!
  • Log in or register to post comments

व्वाह!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/22/2014 - 11:12 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments

मस्तं !

अनुप ढेरे
गुरुवार, 05/22/2014 - 12:24 नवीन
मस्तं !
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त अतिशय आवडली,

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/23/2014 - 12:56 नवीन
ज ब र द स्त अतिशय आवडली,
  • Log in or register to post comments

वाह !

सस्नेह
Fri, 05/23/2014 - 17:48 नवीन
काय कॉन्फिडन्स आहे ! >>आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ!<< .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा