Skip to main content

पौष्टिक मेथी धिरडे

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 19/05/2014 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य मेथी धिरडे पीठः ६ वाट्या तांदूळ २ वाट्या तूरडाळ २ वाट्या चणाडाळ २ वाट्या उडीदडाळ २ वाट्या ज्वारी १ वाटी गहू १ वाटी धणे १/२ वाटी मेथीदाणे वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा. (प्रमाण आईचे आहे, त्याप्रमाणे मी पिठ दळून आणते व हवे तेव्हा ही धिरडी बनवते) साहित्यः २ वाट्या तयार धिरडे पीठ १०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते) १/२ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार २ चमचे तेल . पाकृ: पिठात हळद, लाल तिखट, ठेचलेले लसूण, मीठ व दोन चमचे तेल घालावे. एक वाटी पीठ असल्यास २ वाट्या पाणी असे प्रमाण आहे, त्याप्रमाणे पाणी घालून , नीट मिक्स करावे. नॉन-स्टीक तवा गरम करुन घ्यावा व मंद आच करून थोडे तेल ब्रश करुन, वाटीने पीठ ओतावे. थोडे तेल सोडून एका बाजूने छान होऊ द्यावे मग उलटवून दुसरी बाजू शिजु द्यावी. . गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. .

वाचने 16000
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

अशी सुरेख जाळी पडण्यासाठी पीठ एक तर रात्रभर भिजत ठेवावे लागते नाहीतर त्यात सोडा घालावा लागतो. सानिकातैंच्या हाताचा गुण म्हणून असली भारी जाळी पडली आहे.

In reply to by सस्नेह

ह्या पिठात न सोडा घातला ना रात्रभर भिजवले, सुरेख जाळी येण्यासाठी थोड्या वरुन वाटीने पिठ तव्यावर ओतावे निदान मलातरी असा अनुभव आहे :) धन्यवाद.

In reply to by सस्नेह

जाळी पडण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा भरपूर तापलेला असला पाहीजे. त्यावर तेल टाकून साधारण धूर सदृष तापमानाला आला की ताकासारखे भिजवलेले पीठ त्यावर टाकावे लगेच जाळी पडते. कारण असे की तापलेल्या तव्यावर पीठाची धार पडताच अतिउष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन बाहेर पडते आणि बाहेर पडताना धिरड्याला जाळी पडते. पीठ आणि पाणी ह्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे. पीठ घट्ट असेल तर विशेष जाळी पडत नाही आणि जास्त पातळ झाले तर धिरडे काढताना फाटू शकते. साधारण घट्ट ताकासारखे पीठ भिजवावे.

छळवादी मंडळींपैकी प्रमूख सुत्रधार. कठीण आहे. आत्ता आत्ता कुठे काही जण बॅचलर पा.क्रु. टाकत होते.... जावु दे, काय बोलणार?

In reply to by दिपक.कुवेत

तू गप रे, तुला अलाऊड नाही. तू पण त्यांच्यातलाच आहेस. 'प्रशांत भूषण/योगेन्द्र यादव' च्यामारी! ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह............... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.pngस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल शेवटच्या फोटूतून नजर हलत नाहीये! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

In reply to by स्पंदना

>>नाही जाळी पडतेच!! असेल असेल!! कोकणातल्या लोकांना घावन, आंबोळ्या, धिरडी करायची सवय असते. त्यामुळे जाळी आपसुक 'येते' पाडावी लागत नाही. म्हणून आम्ही आलीये म्हणतो. घाटावर महत्प्रयासाने पाडावी लागत असेल तर 'पडते' म्हणा. काहीही म्हणणं नाही. ;) ह. घ्या. हो. *mosking*

कोकणी अंबोळी ची पाकृ साधारण अशीच असते ना? बाकी तुझ्या पाकृला द्यायची माझ्याकडची विशेषणं तरी संपली ब्वा अता :)

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !!!!!!!!!!!!!

मस्त दिसतेय! पण फक्त १/२ कपात मेथीची चव लागेल का? धिरडे करतांना थोडी ताजी मेथी चिरून टाकली तर कसे लागेल?

In reply to by मनिष

१/२ वाटी मेथ्यांची छान चव लागते , करताना कधी ताजी मेथी घातली नाही तुम्ही ट्राय करु शकता, थोडीच घाला नाहीतर कडसर लागेल आधीच मेथीदाणे आहेत. धन्यवाद :)

माझे प्रमाण थोडे वेगळे आहे, यावेळी या प्रमाणात करून पाहते. मी दळताना मेथी नाही घालत, मुगडाळ, मसूरडाळ घालते.

मस्त धिरडे. पाणी सुटल. हा प्रकार मला खायला आवडतो. कार्यालयातून परतल्यावर बहुतेक कुठला न कुठला धीरडा महिन्यातून ५-७ वेळा तरी खायला मिळतो. हिरवी मेथी बारीक चिरून नुसत्या बेसन किंवा बेसन + तांदूळाच्या पिठात मिसळून धिरडी केली तरी मस्त लागतील.