पौष्टिक मेथी धिरडे
साहित्य मेथी धिरडे पीठः
६ वाट्या तांदूळ
२ वाट्या तूरडाळ
२ वाट्या चणाडाळ
२ वाट्या उडीदडाळ
२ वाट्या ज्वारी
१ वाटी गहू
१ वाटी धणे
१/२ वाटी मेथीदाणे
वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा.
(प्रमाण आईचे आहे, त्याप्रमाणे मी पिठ दळून आणते व हवे तेव्हा ही धिरडी बनवते)
साहित्यः
२ वाट्या तयार धिरडे पीठ
१०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते)
१/२ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल
पाकृ:
पिठात हळद, लाल तिखट, ठेचलेले लसूण, मीठ व दोन चमचे तेल घालावे.
एक वाटी पीठ असल्यास २ वाट्या पाणी असे प्रमाण आहे, त्याप्रमाणे पाणी घालून , नीट मिक्स करावे.
नॉन-स्टीक तवा गरम करुन घ्यावा व मंद आच करून थोडे तेल ब्रश करुन, वाटीने पीठ ओतावे.
थोडे तेल सोडून एका बाजूने छान होऊ द्यावे मग उलटवून दुसरी बाजू शिजु द्यावी.
गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
वाचने
15953
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
खल्लास ... धिरडे अतिशय आवडतात
आह्ह... काय मस्त जाळीदार
In reply to आह्ह... काय मस्त जाळीदार by मदनबाण
>>मस्त जाळीदार धिरडे झाले आहे
In reply to आह्ह... काय मस्त जाळीदार by मदनबाण
+१
In reply to +१ by सस्नेह
जाळी
In reply to +१ by सस्नेह
पीठ-पाणी-तापलेला तवा.
मेलो.
छळ मांडला...मांडला...
In reply to छळ मांडला...मांडला... by मुक्त विहारि
+१११
In reply to +१११ by प्यारे१
+१ माझ्याकडुनहि
In reply to +१ माझ्याकडुनहि by दिपक.कुवेत
तू गप रे, तुला अलाऊड नाही.
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
यम्मी.....
मस्त जाळीदार धिरडे
खल्लास.. कसली अप्रतिम
In reply to खल्लास.. कसली अप्रतिम by पिंगू
जाळी पडत नाही रे, जाळी येते.
In reply to जाळी पडत नाही रे, जाळी येते. by सूड
नाही जाळी पडतेच!!
In reply to नाही जाळी पडतेच!! by स्पंदना
>>नाही जाळी पडतेच!!
In reply to >>नाही जाळी पडतेच!! by सूड
+१
लै भारी !!
In reply to लै भारी !! by अजया
लै भारी !!
कोकणी अंबोळी ची पाकृ साधारण
अहाहा अप्रतिम
अगदी अगदी, हेच प्रमाण व
सुरेख फोटो.
सुरेख जाळीदार धिरडी...मस्तच..
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
मस्त दिसतेय! पण फक्त १/२ कपात
In reply to मस्त दिसतेय! पण फक्त १/२ कपात by मनिष
हो
यम्म्म्म
ए१ जाळीदार धिरडे... मस्तच.
वा!
छान
धिरडी
साधि, सोप्पी पण आरोग्यदायी पाक्रु!
आज पीठ करून ठेवलेय!
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by निंबुडा
एखादे करुन बघा....
मस्त धिरडे. पाणी सुटल. हा
आमच्या