मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नमो लाटेचे साईड ईफेक्ट

वॉल्टर व्हाईट · · काथ्याकूट
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.

वाचने 52181 वाचनखूण प्रतिक्रिया 204

In reply to by संपत

आतिवास Sat, 05/17/2014 - 23:26

In reply to by आतिवास

संपत Sat, 05/17/2014 - 23:52
चुका झाल्या पण तेव्हढे चालायचच. चुकांचा परिणाम भोगायला लागल्यानंतरच त्या चुका आहेत हे कळते. पण आपची मते विधानसभेपेक्षा ३ % ने वाढली आहेत.आप अजून काही काळ पक्ष म्हणून शाबूत राहील असेच दिसतेय. लढाई प्रदीर्घ व कठीण आहे, पण सर्वात महत्वाचे हे आहे कि आपने आपल्या तत्वांशी तडजोड न करणे.

In reply to by संपत

आत्मशून्य Sun, 05/18/2014 - 00:02
अक्कल. नुस्ती तत्वे कुरवाळुन उपयोग नसतो. विधेयक जर मंजुर करुन घेता आले नाही तर सत्त्ता सोडावी लागते ही वस्तुस्थिती आहेच त्यामुळे केजुचे जनलोकपाल संमत करुन न घेता आल्याबद्दल सरकार बरखास्त करणे योग्यच होते. पण विधेयक केंव्हा मांडावे याचे काही तारतम्य ? आता तर खान्ग्रेसला पर्यायी लिटमस म्हणून आपचा उदय झाला, अवेळी विधेयक मांडुन संमत करण्यास अपयशी ठरल्यावर राजिनामा दिला खरा पण वेळ चुकल्याने जनतेचा अतिशय मोठा भ्रमनिरास झाला ज्याचा संपुर्ण फायदा मोदीप्रतीमेला झाला. याची वेळही अशीए की जनतेच्या मनात ऐनवेळी सशक्त पर्यायच उभा दिसु नये म्हणून भाजपानेच आपसोबत राजिनामा नाट्याची सेटींग केली होती की काय याची शंका यावी. आप भाजपासेटींग नाही ही ठाम खात्री आहेच पण त्याचा विचार मनात यावा इतके विचीत्र टायमींग अरविंदाने राजिनाम्यासाठी निवडले हे आश्चर्यजनक आहे.

In reply to by आत्मशून्य

संपत Sun, 05/18/2014 - 10:24
नया हय यह. वेळ जाईल तशी अक्कल येईलच. पण अती अक्कल येऊन भाजप कोंग्रेस सारखे होऊ नयेत म्हणजे झाले. महत्वाचे म्हणजे ह्या वातावरणात देखील दिल्लीत आपची मते वाढली आहेत. म्हणजे माध्यमे म्हणताहेत तेवढा राग दिल्लीतील लोकांच्या मनात नसावा.

In reply to by संपत

आतिवास Mon, 05/19/2014 - 18:58
दिल्लीत आपची मतं विधानसभा २०१३ पेक्षा ३% ने वाढली म्हणजे ठीक आहे - असा माझाही समज होता. पण आजच्या हिंदुमधली ही बातमी पहा. लोकसभा मतदानात दिल्लीतल्या ७० पैकी ६० मतदारसंघात भाजपची आघाडी आहे, फक्त १० मध्ये आपला आघाडी आहे. जसजसे मतदानाचे आकडे सविस्तर कळतील - तसं विश्लेषणासाठी नवे मुद्दे समोर येतील!

In reply to by आतिवास

संपत Tue, 05/20/2014 - 12:03
निवडणुकांच्या दृष्टीने मतांच्या संख्येपेक्षा मतांचे वितरण महत्वाचे असते हे मान्य. पण आपने सत्ता सोडल्याने दिल्लीत आप विरोधी लाट उसळली आहे असे चित्र दाखवत होते त्यात तथ्य नसावे. अर्थात आपला दिल्लीत मोदिविरोधी एकगठ्ठा मुस्लीम मते मिळतील असाही अंदाज होता. त्याचा प्रभाव ह्या वाढलेल्या मतदानात किती आहे तेही पहावे लागेल.

In reply to by पिशी अबोली

रेवती Sun, 05/18/2014 - 17:34
नाय नाय मावशे, आहे हितेच! खंदी समर्थक नसले तरी बर्‍यापैकी समर्थक होते पण भाजपाशीही दुस्मनी केली नव्हती. या निवडणूक निकालाने मी खुस आहे, आणंद झालाय. ;)लवकरच वडोदर्‍याला जाऊन यावे असे वाटते. एकदा का मोदींनी विकास (मिपाकर विकासदादा नव्हे) केला की जुने शहर कसे होते हे बघायचे राहून जाईन म्हणून! ;)

In reply to by पिशी अबोली

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 16:58
दिल्लीत आपने प्रचार केला नाही म्हणून ते दोन नंबर वर आले. केला असता तर तीन नंबर वर गेले असते. पंजाब मधे लोकांना सॅड्-बीजेपी काँबोचा कंटाळा आलेला. शिवाय बंडाळी, इ. काँग्रेसला तर कोणत्याही हालतीत मत नाही द्यायचे. ईथे त्यांचा तुक्का लागला. पुढच्या वेळेस केजरीवाल पंजाब जीपमधे बसून केजरीवाल - "बीजेपी वाले मार रहे है, लुट रहे है, पीट रहै, कुछ करो" असा वाराणसीसारखा प्रचार करू लागला कि तिथेही हे लोक आपटतील.

चैदजा Sat, 05/17/2014 - 21:34
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी, उद्धव ठाकरे "करून दाखवले करून दाखवले" म्हणत होते, यावेळी त्यांनी विजय जनतेला अर्पण केला आहे.

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 21:53
१ एक जिवंत, मानवी पंतप्रधान बघायला मिळेल. गेली दहा वर्षे एक मक्ख चेहर्‍याचा, मृतप्राय, चेहर्‍यावरून माशी न उडवू शकणारा, बोललाच तर अत्यंत कंटाळवाणे काही तरी बोलणारा, बॅटरी लागत नाही पण रिमोट लागतो असा पंतप्रधान बघायची सवय झाली आहे. त्यात एक सुखद बदल होणार. २ सावरकरांचे नाव एक देशद्रोही म्हणून घेतले जाणार नाही. ३. माजी राजजामात, आदरणीय, गडगंजधनाधीश रॉबर्ट वदरा यांचे विमानतळावरील सुरक्षा तपासणीतून सवलत मिळणार्‍यांच्या यादीतून नाव पुसले जाईल. कदाचित ते नाव सी बी आयच्या योग्य त्या यादीत दिसू लागेल!

In reply to by हुप्प्या

बाळकराम Mon, 05/19/2014 - 16:35
क्रमांक १ आणि ३ बद्द्ल सहमत. विशेषतः ममोसिंगानी "गोगलगाय पोटात पाय" पद्धतीने कशी स्वतःकडे सहानुभूती घेतली त्याची आता माहिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळेही हा पंतप्रधान बदलल्याचे सुख आहेच. क्रमांक २ बद्दल मात्र असहमत. उलट आता सावरकर कसे संघकार्यकर्ते होते, त्यांनी संघाच्याच आदेशाने बोटीमधून उडी कशी मारली, भारतीय क्रांतिकारक कसे संघप्रेरित वगैरे होते अशा अनेक सुरस घटनांनी भारताच्या इतिहासात नवीन "भर" घातली जाईल, डाव्या आणि काँग्रेसी लोकांनी केलेल्या "चुका" आता "सुधरवण्यात" येतील. ते काम वाजपेयींच्याच काळात सुरु झाले होते पण नतद्रष्ट, कृतघ्न जनतेने २००४ आणि २००९ मध्ये हे पवित्र काम होउ दिले नाही, आता संपूर्ण बहुमताच्या जोरावर हे काम दुप्पट उत्साहाने सुरु होईल याचा विश्वास वाटतो.

वॉल्टर व्हाईट Sun, 05/18/2014 - 05:51
आतापर्यंत आलेल्या प्रतिसादात उल्लेखले साईड ईफेक्ट्स
  1. मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. (हुप्प्या)
  2. पासवान यांना बिहारमध्ये पुन्हा जिवदान मिळाले. राहुल बाबा ला सत्तेच्या विषाचा पेग घ्यावा लागला नाही. (जेपी)
  3. भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! (पिवळा डांबिस )
  4. गांधीशाहीपेक्षा महाभयंकर राणेशाही संपली! आता विधानसभेत ना. राणे आडवे झाले की काम तमाम!! (अनन्न्या)
  5. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट. (अर्धवटराव )
  6. प्रियांका लावो ,पार्टी बचाव (निनाद मुक्काम प... )
  7. जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. (विजुभाऊ )

वेताळ Sun, 05/18/2014 - 10:33
कॉग्रेसचे एक फाळकुट आहे.आताच आप मध्ये दिल्ली विधानसभेत परत कॉग्रेस बरोबर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत्.

In reply to by वेताळ

संपत Sun, 05/18/2014 - 12:26
हे तुम्ही कुठून ऐकलेत? मी तर आजच एका हिंदी वाहिनीवर ऐकले आहे कि निवडणुका टाळाव्या म्हणून कोंग्रेस तटस्थ राहणार आणि भाजप सत्तेवर येणार.

माहितगार Sun, 05/18/2014 - 11:55
२०१४ लोकसभा निवडणूकीची सांगता उरलेल कवित्व आणि विडंबनांनी होईल ! त्याचा मिपाच्या निवडणूक जिज्ञासूंकरता इकॉनॉमीक टाइम्स मधील एक नमूना, 'सांगता इलेक्शन डायरी !'.

धर्मराजमुटके Sun, 05/18/2014 - 13:15
मोदी पंतप्रधान झाल्यास मी देश सोडीन असे कमाल खान याने सांगीतले आहे. या दुव्यानुसार त्याने देश सोडला आहे. खरे खोटे देव जाणे. शारुक साहेबांनी पण असेच वक्तव्य केले होते असे ऐकतो.

In reply to by धर्मराजमुटके

इरसाल Tue, 05/20/2014 - 09:40
केआरके ने देश सोडला, आज भारत एका महान सुपरस्टारला मुकला आहे. सर्वधर्म समभाव व "सारे भारतीय माझे भाइ-बांधव आहेत" हे सिद्ध करणारा त्याचा "देशद्रोही" हा सिनेमा आपण पहावा ही माझी कळकळीची विनंती. देवा ह्यांना क्षमा कर हे काय करत आहेत हे त्यांना समजत नाही.

स्पार्टाकस Sun, 05/18/2014 - 15:58
राहुल गांधी रिटार्ड आहे हे सिध्दं झालं आणि 'आपटार्ड' झालेल्या लोकांचं विमान जमिनीवर आलं.!

राही Sun, 05/18/2014 - 18:44
मनसेचे इंजिन यार्डात गेले असा वर एक प्रतिसाद आहे. पण मला थोडी वेगळी शंका आहे. मनसेने मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपच्या विरोधात उमेदवार उभे न करता फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिले होते. शिवसेनेचे कमीत कमी उमेदवार मराठीमतविभाजनामुळे निवडून यावेत आणि केवळ भाजपचे वर्चस्व रहावे अशी रणनीती होती. शिवसेनेचे महत्त्व कमी करणे आणि भविष्यात त्यांच्याबरोबरची युती तोडणे हा मोदींचा दीर्घकालीन अजेंडा असावा. पण निदान मुंबईत तरी एरवी कधीही शिवसेनेला मत न देणार्‍या बिगर मराठी मतदारांनी, विशेषतः गुजराती, दक्षिणी,आणि यूपीबिहारवाल्यांनी ह्यावेळी निव्वळ भाजपयुती निवडून यावी यासाठी शिवसेनेला भरभरून मते दिली. हे आधीच्या निवडणुका बघता अनपेक्षित होते. ह्या घबाडामुळे काही मराठी मते गेली तरी काही बिघडले नाही आणि शिवसेनेला संजीवनी मिळाली. पण मोदींना जो निवडणूकपूर्व पाठिंबा राज यांनी जाहीर केलेला होता त्याचे काहीतरी फळ त्यांना मिळेलच. शिवाय मुंबईतल्या इनफ्लुएन्शिअल अशा गुजराती वर्तुळात आत्ताच 'स्वबळावर' अशी कुजबूज सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्राबल्य राहिले तर महाराष्ट्रात भाजपला सत्ता हवी तशी राबवता येणार नाही हे उघड आहे. आणि मुंबई महापालिकेच्या गेल्या तीस वर्षांच्या दिव्य कामगिरीवरून पुरेसे स्पष्टही आहे. पण एव्हढ्या लँड्स्लाइड विजयानंतर लगेच युती तोडणे भाजपला शक्य नाही. पुढे काय होते ते बघायचे.

In reply to by राही

आजानुकर्ण Sun, 05/18/2014 - 19:47
या निवडणुकीत संधीसाधू प्रादेशिक पक्ष व कम्युनिष्ट हरल्याचा आनंद आहे. दुर्दैवाने शिवसेनेला संजीवनी मिळाली व ममतादीदी-बीजद-अम्माही अजून आहेत याचे वाईट वाटते. प्रादेशिक पक्षांच्या अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्सला कुठेतरी चांगला चाप बसणे आवश्यक आहे. काँग्रेस व भाजपा अशा दोन पक्षांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षांनी निवडणुका पुढे लढवाव्यात असे वाटते. भाजपाची आर्थिक धोरणे काँग्रेसपेक्षा वेगळी नाहीत. फक्त सोशल कॉन्झर्वेटिझमला थोडे आवरुन धरले पाहिजे.

हुप्प्या Sun, 05/18/2014 - 23:25
मणी शंकर अय्यर सारखे लोक हे आपले पूर्वग्रह सोडणार नाहीत हे कळले. आपले काही चुकते आहे, नरेंद्र मोदी महाप्रचंड विजय मिळवतात याचा अर्थ त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असू शकते हे अय्यर मानायला तयारच नाहीत. मोदी म्हणजे हिटलर आहे हा त्यांचा सिद्धांत ते सोडणार नाहीत. आपल्या भूमिकेचे गुलाम बनले आहेत.

हुप्प्या Mon, 05/19/2014 - 08:07
स्वतः आणि काँग्रेस दोन्ही आपटल्यामुळे पाजी (आय मीन माजी) गृहमंत्री आता पक्षकार्यात झोकून देणार आहेत म्हणे. म्हणजे ज्या काही उरल्यासुरल्या सीटा आहेत त्याही गमावण्याची शक्यता! असो. पक्षकार्यात झोकण्याची इतकी सुरसुरी येण्यापूर्वी इतके दिवस काय केले? नुसतेच काहीबाही झोकले का? तर हा एक झोकेबाज साईड इफेक्ट.

पगला गजोधर Mon, 05/19/2014 - 09:47
आता तरी आशा आहे, कि स्युडो हिंदुत्वा वाले सुद्धा आपली पकपक बंद करून, मोदींना विकास कामांवर लक्ष देवू देतील,कि ज्याच्या आशेने लोकांनी मते दिली, आता तरी अश्या लोकांच्या लक्षात आले असेल,कि जे राम नाही देऊ शकला, ते विकास ने दिले. आणि हो साईड ईफेक्ट म्हणाल तर, भारतातली लोकं आता हेंल्थकॉन्शस झाली, टॉफी, चिकनसूप पेक्षा, ढोकळाचा यावेळी चांगला खप झाला, ढोकळा नव्हता तिथे बटाटेवडा घेतला. कारण यावेळी बटाटेवडासुद्धा ढोकल्याच्या पिठाचा व वाफवलेला होता, तेलकट नव्हता.

मृत्युन्जय Mon, 05/19/2014 - 10:55
यापुढे नेहमी विकासाचे राजकारण होइल. या निवडणूकीत कंग्रेस आपटली आणि भाजपा जिंकली कारण खंग्रेसने देशाचे अतोनात नुकसान केले आणि भाजपाने गुजरात मॉडेलचा दाखला देत विकासाचे राजकारण केले. यापुढे जात, धर्म, वंश, वर्ण, भाषा यावर अवलंबुन न राहता निवडणूका विकासावर होतील.

केजू आणि त्यांच्या सारख्या बोलबच्चन नेते मंडळींची टीवटीव आता वाचली की हसू येते, व ह्या मंडळींच्या वाचाळतेला किती महत्व दयायचे असा प्रश्न पडतो,

In reply to by भृशुंडी

ह्या आधी लादेन वर हल्ला करून मारले तेव्हा दाउद ने आपला तळ हलवला होता असे वृत्त आले होते. पुढे सी आय ए ला अल कायद्याच्या माणसांची माहिती देऊन दाउद ने स्वतःचा जीव वाचवला अशी एक थिअरि वाचयला आली , ज्या नावाव शरीफ जी औकात काढली त्याने मोदींना आपल्या देशात आमंत्रण दिले आहे. तेही पंत प्रधान होण्याच्या अगोदर

पगला गजोधर Wed, 05/21/2014 - 10:46
सापडले आणखी साईड इफेक्ट , भारताचे EVM मशीन कसे सहजच hack करता येते, निवडणूक आयोग कसा पक्षपाती वागतो वैगरे लिंक्स फेसबुकात यायचे बंद होतील. 'बाळासाहेबांचे स्वप्न साकार, केंद्रात आले मोदि सरकार' वै. फ्लेक्स चौकात लागतील. (च्याआईला हे आमास्नी ठाव नव्हत, कि बाळासाहेबांचे 'मोदि सरकार ' हे स्वप्न होतं, त्यांनी काय स्वप्नात येवून updates दिले कि काय ? का ह्यांनी प्लान्चेट करून जाणून घेतला ?)

In reply to by मराठी कथालेखक

तो लोकसभेच्या इलेक्शनातच लोकांच्या मुतात वाहून गेलाय..आणि वाकडतोंड्या आता आरक्षण ,बिग्रेड वगैरे नेहमी फंडे बाहेर काढण्याच्या तयारीत असणार....

In reply to by मराठी कथालेखक

तो लोकसभेच्या इलेक्शनातच लोकांच्या मुतात वाहून गेलाय..आणि वाकडतोंड्या आता आरक्षण ,बिग्रेड वगैरे नेहमीचे फंडे बाहेर काढण्याच्या तयारीत असणार....

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 05/21/2014 - 20:42
>>> तो लोकसभेच्या इलेक्शनातच लोकांच्या मुतात वाहून गेलाय..आणि वाकडतोंड्या आता आरक्षण ,बिग्रेड वगैरे नेहमीचे फंडे बाहेर काढण्याच्या तयारीत असणार.... माई, बरी आहेस ना? किती वेळा तोच तोच प्रतिसाद देतेस.

अहो इतके दिवस अनेक योजना संजय गांधी ह्यांचे नाव दिले ह्या माणसाने शास्त्री , राव ह्यांच्यापेक्ष्य कोणते मोठे कर्तुत्व गाजवले. केंद्रात हिंदुत्वादी सरकार येणे हे साहेबांचे स्वप्न होते जसे धर्म निरपेक्ष सरकार येणे पवार साहेबांचे स्वप्न भले ते अकार्यशं ,पैसेखाऊ असेल पण ते सरकार सेक्लुलेर असेल

In reply to by निनाद मुक्काम …

विकास Wed, 05/21/2014 - 16:28
मोदींनी मुख्यमंत्री म्हणून शेवटची सही ही वडनगर इथल्या ११८ कोटी रुपयांच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीवर केली. त्या कॉलेजचे नाव, वीर सावरकर यांच्यावरून असणार आहे.

पगला गजोधर गुरुवार, 05/22/2014 - 09:44
अवांतर: केंद्रात हिंदुत्ववादी सरकार यावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते मान्य, पण आज केंद्रात खरंच हिंदुत्ववादी सरकार आले आहे का ? (च्याआईला हे सुदिक आमास्नी नवीनच हाय, आमास्नी वाटल ग्रोथ का इकास का अच्छे दिन साठी लोकांनी, जाती विसरून (पहा बसप च्या जागा), धर्म विसरून (पहा सप च्या जागा ), घराणी विसरून (पहा भाराकॉ च्या जागा ), बुद्धिवाद विसरून (पहा आप च्या जागा ) सरकार आणलं ), तरी लोकं भगव्या बेन्टकुल्या का दाखवताय कळत नाही ! तुमच्याकडे आतली बातमी आहे का ? कि विकासाचा मास्क लावून मिळवायचं व प्रत्यक्षात हिडन अजेंडा राबवायचा ?

पगला गजोधर गुरुवार, 05/22/2014 - 10:39
पूर्वीचे सरकार मनमोहनसिंग सरकार म्हणून ओळखले जात होते, आजचं मोदिमोहनसिंग (मोदि, मोहन भागवत, राजनाथ सिंग )म्हणून ओळखले जाईल .

विटेकर गुरुवार, 05/22/2014 - 15:11
या निवडणुकीची उपलब्धी पुढील प्रमाणे आहे - १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वतःची ताकद समजली. एकाच दिशेने प्रयत्न केल्यास संघ परिवर्तन घडवू शकतो. तितकी संघाची आजची ताकद आहे. संघाच्या दृष्टीने ही अतिशय समाधान देणारी बाब आहे. म्हणजेच उद्या प्रचलित सरकार मस्ती करेल तर संघ पुन्हा परीवर्तन घडवू शकेल. हीच ताकद जर १९४७ साली असती तर भारत खंडीत झाला नसता ! त्या ही नंतर आणिबाणी मध्ये ही संघ हतबल झाला,काही करु शकला नाही. पण आता स्वयमसेवक ठरवतील ते घडू शकते.मोदी करिष्मा वजा केला तरी ही हा घट्क जाणवू शकतो. २.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद समाजाला समजली.सत-शक्तीचा विजय होऊ शकतो हा विश्वास समाजाला आला. पारंपारिक चारित्र्य मूल्यांची अवहेलना आता थांबेल. सज्जनांच्याबद्दल आदर वाढेल अशी आशा निर्माण झाली आहे. संघाची धोरणे ही काही प्रमाणात समाजमान्य झाली, स्वीकार्हायता वाढली आहे. राष्ट्रीय चारित्र्य आणि देशाभिमान ही दोन महत्वाची मूल्ये गेल्या ९० वर्षांपासून संघ समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याला मर्यादीत अर्थाने यश आले असे म्हणावे लागेल. राजसत्तेवर धर्मसत्तेचा ( आजच्या भाषेत लोकशाहीत - लोकांचा ) अंकुश असणे, धर्माचे ( = लोकांचे ) राज्य असणे आणि भारतीय समाज बलवत्तर होणे आणि त्यायोगे राष्ट्र परम वैभवाला नेणे हेच तर संघाचे ध्येय आहे.

In reply to by विटेकर

नानासाहेब नेफळे गुरुवार, 05/22/2014 - 15:50
आरेसेस ही एक तकलादू संघटना आहे, मोदींनी ती ८५ सालीच सोडली. आजचा विजय केवळ नरेंद्र मोदींचा आहे. संघाकडे जर एवढी ताकद आणि शिस्त होती तर २००४/०९ला ह्या गोष्टी विजयादशमीच्या मुहुर्तावर दहा वर्ष पुजायला ठेवल्या होत्या काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर गुरुवार, 05/22/2014 - 17:21
अभिनंदन नेफळे साहेब, एकदम बैलाचा डोळाच मारला की हो ! आरेसेस ही एक तकलादू संघटना आहे, तुम्ही एकदम निष्कर्षच काढला आहे ! आता काय बोलणार ? गेली ९० वर्षे सतत वृद्धींगत होणारी संघटना " तकलादू " आहे हे आम्हां अज्ञ लोकांना पटत नाही. जरा विदा द्याल का ? मोदींनी ती ८५ सालीच सोडली श्री. मोदींनी राजीनामा दिला का ? लिंक आहे का ? का सोडली संघटना मोदींनी ? संघाकडे जर एवढी ताकद आणि शिस्त होती तर २००४/०९ला ह्या गोष्टी विजयादशमीच्या मुहुर्तावर दहा वर्ष पुजायला ठेवल्या होत्या काय? माझा मुद्दा क्रमांक १ वाचावा . आपल्या ताकदीची सुद्धा जाणीव असावी लागते आणि सर्व ताकद पणाला लावावी अशी परिस्थिती यावी लागते !

हुप्प्या गुरुवार, 05/22/2014 - 19:41
आपले प्रकांडपंडित, महागहनविद्वान, सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ श्री मनमोहनसिंग यांनी एक अत्यंत निष्क्रिय, बेजबाबदार सरकार चालवले असा सार्वत्रिक समज आहे. पण अशी किंवदंता आहे की ह्या थोराने १९८४ च्या दंगलींचा सूड उगवण्याकरताच हे सगळे केले. तसे असेल तर हा एक जबरदस्त सूड उगवला म्हटले पाहिजे. आणि मग ही मोदी लाटच ह्या सूडाच्या प्रवासाचा साईड इफेक्ट म्हणावी लागेल! असो.