आज काल पुण्यात बर्याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला. इतका की मिपावर शेअर केल्याशिवाय राहवेना..
साहित्य-
१/२ वाटी साबुदाणे
१/२ वाटी उडिद डाळ
१ वाटी जाडे पोहे
४ वाट्या तांदूळ
१५-२० मेथीचे दाणे
हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते.
कृती-
हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे.
नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये.
त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे.
डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे.
इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही.
डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा.
डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे.
वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा रंग व टेक्श्चर दिसेल.
लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा.

वाचने
95116
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय छळ आहे हा? भरल्या पोटी पण
In reply to मस्तं झाला by सानिकास्वप्निल
+१०००
वा सुरेख ..खाण्याचा सोडा
हाहाहा आजकाल असल्या
In reply to वा सुरेख ..खाण्याचा सोडा by स न वि वि
सोड्याऐवजी इनो चालतं.. या
In reply to वा सुरेख ..खाण्याचा सोडा by स न वि वि
नाद कुळा
मिपा वरुन पाकृ विभाग बंद
सुपरहिट पाककृती. १४४९५ वाचने
धन्यवाद!!
In reply to सुपरहिट पाककृती. १४४९५ वाचने by कवितानागेश
आज पुन्हा हा दोसा केला.
कालच केला द्रोणागिरी डोसा
आंबोळ्या वाटल्या सुरुवातीला..
मी रेवाक्का बरोबरच बनवला होता
चला एवढ्या सगळ्या
करुन बघण्यात येईल...
आज मी करुन पहाणार आहे......
ही मिपावरची फार हीट पा.कृ
>>>मी सुद्धा करेनच!
In reply to ही मिपावरची फार हीट पा.कृ by पिलीयन रायडर
मी केला होता ... छान झाला
मी एकदा करुन झाला आहे इथले
अ प्र ति म !
बायको न पिडल rao reciepe हीच
करुन पाहिले. अप्रतिम झाले!
चला, उद्या आमच्याकडे हे दोसे
आमच्याकडेपण...
In reply to चला, उद्या आमच्याकडे हे दोसे by रेवती
हा धागा वर आला की दरवेळी
In reply to आमच्याकडेपण... by संदीप डांगे
कालच मासुंदा तलावासमोर या
डोसा स्पाँजी व्हायसाठीची एक
लगेचं पसरायचं.
In reply to डोसा स्पाँजी व्हायसाठीची एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
आज पुन्हा हा डोसा