Skip to main content

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

लेखक गुल-फिशानी यांनी रविवार, 11/05/2014 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय. त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं. मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत १-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला? २-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ? ३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ? ४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ? मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय. तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार? तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?

वाचने 39957
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by प्रभाकर पेठकर

"आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे" ही कुप्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे. असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जर एखादा धागा चर्चा या सदरात असेल तर त्यावर साधक बाधक अश्या दोन्ही बाजुंनी चर्चा होणार पेठकर काका. पण जेंव्हा लोक मुद्द्यावरुन गुद्द्यावर येतात तेंव्हा त्यांची अक्क्ल आपण समजुन घ्यायची असते. अन जोवर स्वत्;ला झळ लागत नाही तोवर नुसती चर्चा करुन मनोरंजन एव्हढाच उद्देश असतो. मग तेथे पोटतिडीकेने सांगणारे चेष्टेचा विषय बनतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे.
नाही हो पेठकर काका. आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? सतराव्या वर्षी नाही प्रेमात पडायचं तर कधी? निसर्ग कसा बदलणार आपण? शिक्षण पुरं होईपर्यंत, जबाबदारी उचलण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत मुलं होऊ देऊ नये म्हणणं निश्चितच पटत. पण त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत हो आजकाल.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी साहेब, >>>>आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? प्रेम करणं राहू दे बाजूला पूर्वीच्याकाळी आई-वडीलच मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेत. ते सर्व बाजूंचा विचार करण्यासाठी सक्षम असत, सुनेची आर्थिक जबाबदारी उचलण्याची ताकद त्यांच्याकडे असायची. मुलाने-सुनेने केंव्हा 'एकत्र' यायचे हेही तेच ठरवायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलाची-सुनेची राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था घरचेच पाहायचे. आता विभक्त कुटुंब पध्दतीत निर्णयक्षमतेपासून अमलबजावणीपर्यंत आणि त्या अनुषंगाने येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यापर्यंत प्रत्यक्ष मुला-मुलीलाच सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आजच्या काळात ठराविक काळापर्यंत संयम बाळगणे अत्यंत आवश्यक ठरते. आचारविचारांचे स्वातंत्र्य आधुनिक काळानुसार पाहिजे पण जबाबदार्‍या जुन्या काळाप्रमाणे घरच्यांनी उचलाव्यात ह्या विचारसरणीत विसंगती आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. आपल्याला त्या स्विकारल्याच पाहिजेत. आणि कायदा हातात घेऊन एखाद्याला मृत्यूदंड देणं केंव्हाही समर्थनिय नाही. जे चुक ते चुकच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. सहमत ! मागच्याच महिन्यात एक धक्कादायक बातमी वाचली होती :- Girl, 12, becomes Britain's youngest mother

In reply to by प्रभाकर पेठकर

आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे.
मी तर म्हणतो की आपण आपल्या मुलांवरही चांगलेबिंगले संस्कार करण्याच्या भानग्डीत पडु नये ... खलिल गिब्रान काय म्हणाला की तुम्ही पोरान्ना फक्त जन्म देवु शकता ...तुमचे विचार नाही ! थोड्या टेक्निकल भाषेत बोलायचे तर संस्कार करणे हे सुपरवाईझड लर्निंग झाले पण अनसुपरवाईझड लर्निंग हे मानवी मेन्दुचे ( आणि काहीच्यामते बर्‍याच विकसित प्राण्यांच्या मेन्दुचे ) डिफायनिंग फीचर आहे !! आपण पोरांपुढे फक्त आपले अनुभव ठेवुयात वाटल्यास चांगले साहित्य ठेवुयात बस्स ...बाकी त्यापुढे काय चांगले काय वाईट , कार करावे काय करु नये हे त्यांचे त्यांनाच ठरवुदेत !! उगाच संस्काराम्च्या मोल्डिंग मधुन काढलेल्या पोरापेक्षा स्वतःचे संस्कार स्वतःच्याच बुध्दीने विचाराने केलेली पोरं मला जास्त आवडतील !!

In reply to by प्रभाकर पेठकर

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. काय पेठकर साहेब, काही लोकांना मुळात कोणाचा तरी अपमान करायचा असतो. व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायची असते. मान-अपमान करायचा असतो, तेव्हा इतका काय विचार करायचा अशा लोकांचा. त्रास होतो थोडासा हे मान्य. मी अनेकदा अनेकदा म्हटलंय. आपण खूप जीवाला लावून घ्यायचं नाही. जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. आपल्याला काय वाटतं ते लिहून मोकळ व्हायचं. आपल्याला उपप्रतिसाद आला तर त्याला उपप्रतिसाद लिहित नाय बसायचा त्याला फाट्यावर मारायचं. दुर्लक्ष करण्यासारखं मोठं अस्त्र नाही, जालावर. आता तुम्ही काय नवीन नाही संकेतस्थळावर खूप दिवसांपासून वावरता, तेव्हा तुम्ही तरी असं लिहायचा नाद नाय सोडायचा. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत... @ पेठकर काका... मिठाई बरोबर पुठ्ठ्याचा खोका येतो.तो खोका फेकून द्या, आणि मस्त इथल्या लेखांची चव चाखा,जमल्यास आम्हाला पण एखाद्या लेखाची मेजवानी द्या. अहो, समाज म्हटले की, गहनविचारी माणसे येणारच. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसर, >>>जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन. तेच होऊ द्यायचं नाहिये मला. मी आहे तो ठिक आहे. कातडी अगदी गेंड्याची करायची वेळ आली तर मी संस्थळावर वावरणेच सोडून देईन. आहे काय आणि नाही काय. कितितरी वेळ वाचेल. असो. बिरुटेसर, मला पोलीसात उपनिरिक्षकाच्या जागेसाठी वर्णी लावण्यासाठी एका ओळखितल्या निरिक्षकाने मंत्र्यापर्यंत ओळख लावण्याची तयारी दाखविली होती. पण, 'पोलीसात लाच खावीच लागते. सुरुवातीला त्रास होतो पण पुढे पुढे मन मरतं.' अशा त्याच्या वक्तव्यामुळेच पोलीसखात्याच्या नोकरीकडे मी पाठ फिरविली. पोलीसखात्याच्या नोकरीसाठी 'लाच न खाण्याचं' तत्व मी सोडू इच्छित नव्हतो. असो. असतात कांही माणसं आडमुठी. जाउद्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

people laugh at me because I am different. I laugh at people because they are all the same. आपण का बदलायचे? शेवटी रात्री आपल्याला थंड झोप लागत असेल तर काय वाईट आहे. माझ्या मावशीचे यजमान ३६ वर्षे आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी करून फक्त निवृत्तीवेतनासहित निवृत्त झाले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विचारले साहेब तुमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांची पार्ले अंधेरीला तीन चार घरे/ सदनिका झाली तुम्ही असे राहून काय फायदा झाला? त्यांनी शांतपणे सांगितले ते लोक पैसे खाऊन थंड झोपू शकत असत. मी त्यातला नाही. पण माझ्या ३६ वर्षाच्या झोपेची किंमत काय कराल? (त्यांची मुले उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत गुणी निघाली आणि मुलांनी प्रचंड पैसा कमावला.) बापाचे काय नुकसान झाले?

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. काकाश्री असल्या वायझेड लोकांची मते कशाला मनाला लावुन घेता ? उलट त्यांचा उद्देशच अशाने सफल होतो. बरळणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया शक्योतो वाचायच्या टाळाच, आणि वाचल्याच तर हा वायझेड आहे समजुन दुर्लक्ष करुन टाका. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. बिरुडे सरांशी बाडिस... ज्याला योग्य प्रकारे लिहायचे असेल तर तो तसे लिहतोच आणि ज्याला वायझेडपणा करायचा आहे तो तसा करतोच ! आपण आपल्याला इथे आपले विचार मुक्त आणि स्वतंत्रपणे मांडायची मोकळीक आहे ती कोणा सोम्या-गोम्या मुळे का घालवायची ? मी तर कोण आला कोण गेला याचा विचार सुद्धा करत नाही. ज्याला लिहायची आणि मिपावर वावरायची इच्छा आहे त्याचे नेहमीच इथल्या सर्व लोकांकडुन स्वागत केले जाते... मग तो जुना असो वा नवा. उगाच फालतु माज करणार्‍यांना दुर्ल़क्षीत करणेच योग्य. जाता जाता :- असल्या लोकांना फाट्यावरच मारा. भले देउ कासेची लंगोटी|, नाठाळांच्या माथी हाणु काठी || हे तुकोबांचे वाक्य प्रमाण असावे. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हो. माझा संदर्भ चुकला आहे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी असे आहे ते, संपादकांना विनंती जमल्यास बदल केल्यास आभारी राहेन. :) धन्स पुपे.

मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी या वरील अभंगात संत तुकाराम यांनी वापरलेला मुळ शब्द "कासेची" हा नव्हता. विख्यात कादंबरीकार व लिंग्वीस्टीक्स मध्ये पी.एच्.डी. केलेले ( इथे पी.एच्.डी. चा विषय महत्वाचा आहे) यांनी आपल्या एका लेखात तुकारामांनी वापरलेला मुळ शब्द दिला आहे. आता मुळ शब्दा एवजी हा कासेची शब्द का वापरण्यात आला बदलण्यात आला यामागे काही महत्वपुर्ण अशी समाजशास्त्रीय कारणे आहेत. मी ही तो शब्द का देत नाहीये या मागे ही नेणीवे वरील तो दबाव कार्यरत आहे. भालचंद्र नेमाडेंच्या समीक्षा व तुकारामावरील त्यांनी लिहीलेले साहीत्य वाचलेले असल्यास मी काय म्हणत आहे याची कल्पना येइल.

ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा
कोण हो तो सदस्य ? नक्कि काय घडले होते की अशी प्रतिक्रीया दिली त्याने ?

भालचंद्र नेमाडे हा उल्लेख टंकायचा चुकन राहीला मी भालचंद्र नेमांडे विषयी बोलत होतो त्यांच्या लेखात याचा उल्लेख आहे.

जाता जाता -- एखाद्या मुलाने तुमच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याला मृत्युदंड देणे हे महाराष्ट्र पाचव्या शतकात असावा याचा पुरावा आहे. मुलाने किंवा मुलीने प्रेम करणे आणि त्यांनी लग्न करणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. अव्यक्त प्रेम हे साधारण ८० ते ९० टक्के( कदाचित १००%) लोक करतात.यातील एक दशांश लोकांचे प्रेम उघड होते किंवा व्यक्त केले जाते. यातील पाच टक्के लोकांचे लग्न होते. प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. एक नम्र सूचना -- मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. (मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते)

In reply to by सुबोध खरे

वरील एका प्रतिसादात पांथस्थ यांनी मार्टीन ल्युथर किंग चे हे सुभाषित दिलेले आहे. " History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people. - Martin Luther King, Jr." या किंग यांच्या प्रतिसादा चे उत्तम रीअल लाइफ उदाहरण म्हणजे या प्रतिसादातील हे सुबोध खरे यांच्या प्रतिसादातील खालील वाक्य -- पुरोगामी लोक= गुड पिपल ( आणि यांच अपालिंग सायलेन्स ते बाळगा हा आग्रह) मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते

In reply to by मारवा

मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल. काय कमाल आहे इतक्या जटील कॉम्प्लेक्स समस्ये च इतक सोप उत्तर होत कोणाच्याच कस लक्षात आल नाही आजतागायत ? मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देउन टाका म्हणजे या हत्या आणि वाद टळतील ? म्हणजे अशा हत्या या मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याच्या रागातुन झालेल्या आहेत ? यात वर्णव्यवस्था काम करत नाही का ? आऱक्षण झाले असते तर या संबधांना विवाहाला आनंदाने मान्यता मिळाली असती का ? खरे साहेब वर्णव्यवस्था जी खोलवर रुजलेली आहे ती इथे काम करत आहे आणि मराठा आरक्षणाचा आग्रह हा त्याने मिळणारया आर्थिक हीता च्या आकांक्षेतुन आहे तो मिळाल्यावर सर्वांना समान वागणुक देणे वा आपल्यापेक्षा खालच्या जातीत विवाह करणे इ. ला प्रोत्साहन मिळण्याचा काहीही संबध नाही. वर्ण व्यवस्था आपली उतरंड सांभाळण्याचे काम आरक्षणाचा लाभ मिळाला अथवा नाही मिळाला तरी थांबविणार नाही मुळ समस्या वर्णव्यवस्थेची आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही. डॉक्टर साहेब, प्रेम होऊच नये म्हणुन काही गोळ्या काही इंजेक्शन, काही जडीबुटी, साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या काही काढा देता येतील का येत्या पिढीला. म्हणजे, वय वर्ष तिशी-चाळीशीला पुन्हा अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. शिक्षण, नोकरी इतर जवाबदा-याही पार पडलेल्या असतील. मेंदुत असं एखादा बदल करायचा की बैलाला झापड लावल्यासारखं पोरं-पोरी एका सरळ एका रेषेत चालली पाहिजेत. पोरांकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही.पोरं मोकाट सुटणार नाहीत. मुलगी अजून घरी का आली नाही अशी चिंता पालकांना राहणार नाही. सारांश प्रेमभावना दडपून टाकता येतील असं काही करता येईल काय ? :) दार उघड चिऊताई चिऊताई दार उघड ! अस म्हणुन वाट पाहणा-या प्रियकराला चिऊताई म्हणते अरे बाबा ! आज लय काम आहेत, अरे बाबा आत्ताशी कुठं घर बांधतेय. अरे बाबा, आत्ताशी कुठं मुल मुलांची लग्न झालीत. आत्ताशी कुठं नवरा सासरा यांचं करते आहे, अरे नातु पणतु होऊ दे बाबा. चिमणा बिचारा वाट पाहुन 'उडुन जातो.' चिऊताय दार उघडते. मला वाट पाहणा-या त्या कावळ्याची खुप दया येते. डॉक्तर साहेब कसं थांबवता येईल हो हे ? पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं. तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं . चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही . तुझं दार बंद होतं. डोळे असून अंध होतं . बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल ? (मंगेश पाडगावकर) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो असं करता आला असतं तर प्रश्नच मिटला असता. आता बघा दिग्गीराजा साहेबाना या वयात ( फक्त ६७) सुद्धा प्रेम झालं. ttps://www.google.co.in/search?q=digvijay+singh+affair&rlz=1C2CHNY_en-ININ376&… मग १७ व्या वर्षी एखाद्या तरुण/ तरुणीला कसं काय थांबवणार?

धाग्याचा मुख्य विषय आहे त्या संबंधाने वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ होताना दिसतीए. मला पडलेले काही प्रश्न पडले ते असे एक. हे प्रकरण वाचताना कनीष्ठ महाविद्यालयही शाळेला जोडलेली असण्यापेक्षा वरीष्ठ महाविद्यालयांना जोडलेली असण अधीक श्रेयस्कर असत का हा विचार मनात तरळून गेला. वरीष्ठ महाविद्यालयांच्या सोबत एकतर अधीक चांगल्या दर्ज्याच्या शैक्षणिक वातावरणाची साथ मिळते ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अधिक चांगली वाचनालय सुविधा लॅब्स वगैरे उपलब्ध असण्याची शक्यता वाढते. आणि आयुष्याच पुढच ध्येयही खुणावत असतं. दुसर्‍या बाजूला पौगंडावस्थेतून संक्रमणशील अवस्थेतील मुलांची भावनिक अवस्था समजून सुयोग्य पाठबळ आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या अवस्थेतून पुढे गेलेला अनुभवी वरीष्ठ अनुभवी विद्यार्थी वर्ग तसेच व्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघांची प्रगल्भ समज वरीष्ठ महाविद्यालयीन वातावरणात अधीक बरी असण्याची शक्यता असू शकते का? दोन. या विशीष्ट प्रकरणात मुलगा आणि मुलगी दोघेही कायद्याच्या दृष्टीने नाबालीग आहेत म्हणजे कंसेंटची पुर्ण अधिकार नाही याचा अर्थ या वयात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही असे नाही. इन एनी केस इथे जबाबदारी शालेय प्रशासन आणि पालकांची दोहोंची आहे. त्या संक्रमणावस्थेतील वयातील भावनांचा आदर ठेऊन आकर्षण आणि प्रेम यातील सुक्ष्म भेद समजावून देणे तसेच अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने सुयोग्य समुपदेशन उपलब्ध करणे हि जबाबदारी जशी शालेय व्यवस्थापनाची आहे तशी पालकांची आहे पण हे करण्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता शहरांमध्येही पुरेशी नाही ग्रामीण क्षेत्रात आहे का ? इथे ग्रामीण भागातही मुलांच शिक्षणाच आणि लग्नाच वय सावकाश का होईना वाढत आहे, बालविवाहांच प्रमाण कमी होत आहे आणि हि सामाजिक बदलांनी समोर उभी टाकणारी आव्हान पालकांना आणि शालेयव्यवस्थापनांना सांभाळायची आहेत याबाबत सजगतेची गरज असू शकते का ? तीन. यात सामाजिक दुराव्यांचा संबंध नाही असाही एक दावा पुढे येतो आहे, त्यात प्रथम दर्शनीतरी तथ्य जाणवत जे कुटुंबच बाहेर गावातून येऊन राहील आहे त्याच्या आडनावावरून जात समजली असेल आणि असली तरी ती अबकड आहे का हळक्षज्ञ या पेक्षा आपल्या बहिणीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे दोन मुद्दे अधिक प्रभावी असू शकतात तरी हे मुद्दे सोडवण्याची प्राथमिक जबाबदारी शालेय व्यवस्थापन पालक आणि सुरक्षा व्यवस्थांच सहकार्य याच्याशी संबंधीत आहेत. अर्थात इथे नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेताना आपण हे विशीष्ट प्रकरण जरा बाजूला ठेऊन विचार केला की; मुलगा आणि मुलगी दोघेही अबकड सामाजिक गटाचे अथवा दोघेही हळक्षज्ञ सामाजिक गटाचे आहेत अशा स्थितीत प्रकरणे या टोकाला जाण्याच प्रमाण सहसा कमी असेल किंवा कमी ऐकण्यात असेल. समजा (अशा कोणत्याही प्रकरणातील) मुलगा हा मुलीच्या भावाचा मीत्रांपैकी/नातेवाईकांपैकी समजा मामेभाऊ असता तरीही प्रकरण अशाच पद्धतीने हाताळल गेल असत का ? सहसा मीत्रवर्ग एकाच समाजाचा असतो का ? मग एकाच सामाजिक गटाची प्रकरणे टोकाच्या मार्गाने तडिस न नेणे आणि सामाजिक गटात फरक झाला की प्रकरण हाताळणी टोकाच्या मार्गाने होणे असे काही होते आहे का ? समाजशास्त्रातील तज्ञानी हा सामाजिक अभ्यास करण्याची गरज आहे का ? चार. या विशीष्ट प्रकरणात सामाजिक दुरावा हे कारण नाही हे क्षणभर मान्य जरी केल, तरीही सामाजिक दुराव्यांच्या बाबतीत सर्वच आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? समजा हि मुले कायदेशीर दृष्ट्या (लिगली) कंसेंटीग अ‍ॅडल्ट असती तर त्यांना स्वतंत्र पणे त्यांचे निर्णय घेऊ देण्या इतपत भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाने प्रगती साधली आहे म्हणण्याची परिस्थिती निश्चीत आहे का ? ऐतिहासिक सांस्कृतीक सामाजिक पुरोगामीत्वाच मापच लावायच झाल तर तामीळनाडू महाराष्ट्राला उजवा ठरावयास हवा पण विवाह आणि सामाजिक दुरावा आणि बंधने आणि तामीळनाडूतील काही विभागातील हिंसा हि चिंतनीय बाब आहे. महाराष्ट्रात सामाजिक दुराव्याचे प्रश्न अस्तीत्वातच राहीलेले नाहीत हि भूमीका वास्तव आहे का ? नगरजिल्ह्याचेच (दुसर्‍या खेड्यातील) उदाहरण घ्यावयाचे झाल्यास स्मशानभूमीत अबकड समाजाचे लोक हळक्षज्ञ समाजाची प्रेते आमच्या समाजाच्या स्मशानभूमीत आणू नका म्हणतात म्हणजे मेलेल्या माणसांच्या बातीतही जर आम्ही सामाजिक दुरावा सांधू शकलो नसू तर जिवंत माणसांच्या बाबतीत सामाजिक सर्व दुरावे सांधले गेले आहेत हे दावे आत्मपरिक्षणाने तपासण्याची कोणत्यातरी अंशातून जागा शिल्लक आहे का ? पाच. अधिक व्यापक स्तरावर विचार केला असता. खरेतर एका यरलव दिवशी प्रेम व्यक्तकेले जाणे हे एक सामाजिक आव्हान म्हणून भारतीय समाजापुढे आल तेव्हा यरलव दिवस 'भारतीय संस्कृतीचा भाग नाही', एवढी भूमिका घेऊन सामाजिक स्थित्यंतराने पुढे येत आसलेल्या काळानुरुप पुढे येणार्‍या मुख्य सामाजिक प्रश्नांची अधिक व्यवस्थित चिकित्सा करून व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या सर्व परिघांचा समतोल साधण्याच्या प्रयास करण्या एवजी, डिनायलीझम वापरून भारतीय समाजाने बगल देण्याचा प्रयत्न केला आहे का ? कि ज्या मुळे बदलत्या काळास आवश्यक व्यक्ती आणि सामाजास आवश्यक संवाद कौशल्य आणि सुरक्षा विषयक आवश्यकतांकडे दुर्लक्षतर झालेले नाही ?

नगर बद्दल इतके पण..... मुझफ्फर नगर बद्दल कुणीच बोलत नाही. असो.... कालाय तस्मै नमः

टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला? बाकी हे प्रकार कोणत्याही जाती-धर्मात चालूच असतात. प्रत्यक्ष घडलेल्या घटना बघून हे प्रकार मराठ्यांमध्ये जास्त'च' असतात हे सांगू शकतो. एका मित्राच्या भावाला दुसर्‍या मुलीशी लग्न करायला बळंच तयार केलेलं अगदी जवळून पाह्यलंय. असं का विचारल्यावर, 'अरे, त्याचं जिच्याशी अफेअर आहे ती मुलगी जयभीमवाली आहे' असं सांगितलेलं पाह्यलंय. आणि दलितही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. एकाने मराठ्याची लेक आणून तिच्याशी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांचं अख्खं घर हे सर्वांना कौतुकाने सांगत होतं. मराठ्यांच्या, ब्राह्मणांच्या लेकींना पळवून नेऊन लग्न करणं म्हणजे फार काहीतरी शौर्य केल्या सारखं मानतात आजही हे लोक. तेवढंच कशाला एका देशस्थाच्या प्रेमविवाहात मुलीचं आडनाव जरा हटके, म्हणजे ब्राह्मणांपै़की वाटणार नाही असं होतं. तो मात्र ती मुलगी कोब्रा असल्याचं सांगत होता. ग्रूपमधल्याच सर्व मुलांच्या आया मग ही देवरुख्यांची असेल का, कर्‍हाड्यांची असेल का? अशा चर्चा करत होत्या. एकीने तर, 'अगं कुणब्याची असेल' अशी कमेंट पास केली होती. मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे. आता मी स्वतः जिथे याबाबतीत आग्रही आहे तिथे दुसर्‍यांनी तसं वागू नये हे सांगण्याचा अधिकार मला नाही.

In reply to by सूड

टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला?
हे अतिशय जबरदस्त. मान गये सूडराव!!!!

In reply to by सूड

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
भावाला काय वाट्टेल तो उपदेश कराल राव ... स्वतःच काय ते सांगा *biggrin* हलके घ्या .

In reply to by सूड

आपल्या पुर्ण मताशी सहमत नसलो तरी आपल्या मताचा आदर आहे :)

In reply to by सूड

थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर पहायची होती सूड तुम्ही. अन जे अवघड असत ते करायला कोणी जात नाही, पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. अन ज्या वयाच्या मुलांची ही कहाणी आहे त्या वयाच्या मुलांना जरा दम धरा म्हणण्या ऐवजी उलट संदेश पोहोचतो अश्या गल्लाभरु तुफान चालणार्‍या पिक्चर्स नी. आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. गुंडगिरी करत रस्त्याने फिरण हे सुद्धा चित्रपटांचीच देणं आहे. बाकी तुमच्या विचार करुन वागण्याच कौतुकच आहे. घरात फक्त दोन माणस अन चार भिंती असण वेगळ, अन त्याच घर असण वेगळ हे समजलेलं दिसतय तुम्हाला.

In reply to by स्पंदना

>> पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. असो. प्रेम होणं इतकं सोपं असतं? >>आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. त्या स्वत:ची अक्कल गहाण टाकलेल्यांनी केल्या असतील. माझ्यापेक्षा चार पावसाळे कदाचित जास्त पाह्यले असाल तुम्ही, पण प्रतिसाद पटला नाही. माझं म्हणणं इतकंच आहे सो कॉल्ड वाईट चित्रपट पाहून जर लोक तसे वागायला प्रवृत्त होत असतील तर चांगलं बघून त्याचासुद्धा परिणाम झाला पाहिजे. तसं होत नसेल तर एखादी गोष्ट, चित्रपट जबाबदार नसून लोकांच्या मनोवृत्ती त्यासाठी जबाबदार आहेत.

In reply to by सूड

सूड साहेब, मुले घरी आई बाप म्हणत असलेले श्लोक शिकत नाहीत पण शिव्या मात्र पटकन शिकतात. हे forbidden fruit सारखे असते. म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. चित्रपटात सिगारेट ओढणे किंवा दारू पिणे याचे अतिरिक्त दर्शन करू नये असे जगभरातील संशोधन दाखवते आणि त्या गोष्टींच्या जाहिराती आणि उदात्तीकरणाला जगभरातील संशोधकांनी यासाठीच विरोध दर्शविला आहे. मुळात सिगारेट( किंवा दारूचा ग्लास) हातात धरून "आधुनिक" फार पटकन होता येते. पण आपल्या बायकोला/ आईला/ बहिणीला समान दर्जा देण्यासाठी त्याग करावा लागतो. modernism is not just smoking/drinking. It is a state of mind प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. अवांतर -- बाकी मी कोणताच सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमात काय दाखविलेले आहे याबद्दल मला सांगता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

>>म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. मान्य!! मग दोष चित्रपटांना द्यावा का? हाच माझा प्रश्न होता आणि आहे. वाईट गोष्टी लोक पटकन आत्मसात करत असतील तर तो चित्रपटाचा दोष कसा काय होऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

>>प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. माझ्या दृष्टीने हा स्वैराचार आहे, प्रेम नव्हे.

In reply to by सूड

भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान सौन्स्क्रुतीप्रमाने प्रेम ह्योच एक स्वैराचार हाये नै का? शहाणी मुलं असल्या प्रेमाबिमाच्या भानगडीत पडत नैत, हो की नै?

In reply to by बॅटमॅन

@सौन्स्क्रुतीप्रमाने>>> *biggrin* आपल्याला सौन्स्क्रुती"गंडा"प्रमाने, असं म्हनायचं हुतं का??? http://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gif

In reply to by सूड

आमचा एक मित्र "वास्तू"चा सल्लागार आहे. तो कोरेगाव पार्क च्या एका बंगल्यात गेला होता. तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले. माझ्या एका नातेवाईकाची मुलगी कॉलेजात शिकते. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. हा मुलगा बारावी नंतर दोन वर्षे ड्रोप घेऊन घरी असतो. त्याचे वडील नाहीत आई आहे आणि त्याचे घर त्याच्या लग्न झालेल्या बहिणी पाठवत असलेल्या पैश्यात चालू आहे. माझ्या नातेवाईकाचे आंतरधर्मीय(प्रेमविवाहच ) लग्न आहे त्यामुळे त्याचा जाती धर्मा बद्दल काही म्हणणे नाही परंतु मुलमध्ये काहीतरी कर्तृत्व असावे एवढेच त्याचे म्हणणे आहे. माझ्या बायकोला एक वर्ष मागे असलेल्या एका डॉक्टर मुलीने कॉलेज समोर असलेल्या पानवाल्याशी लग्न केले. दोन वर्षाचा संसार आणि एक मुल पदरात आल्यावर ती आता आपला व्यवसाय करीत मुलाला वाढविते आहे. आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. अशा अनेक सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत. शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी लग्न नक्की का केलं हे जर माहीत नसेल, आणि तसं होण्यामागे त्या 'वास्तुचा' दोष आहे असं वाटणारा बाप असेल तर त्या मुलीचीच दया वाटते. च्यायला सिनेमामुळे पोरं बिघडतात यापेक्षा ही विचित्र थियरी आहे! अहो, तुम्ही डॉक्टर असून त्याला समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला का दिला नाहीत? वास्तुतज्ञाला काय शष्प तरी कळतं का मुली कोणाशी बापाच्या मनाविरुद्ध का लग्न करतात ते?

In reply to by राजेश घासकडवी

सॉरी टाइप केलं आणि नंतर लक्षात आलं की तो बंगलेवाला तुमचा मित्र नव्हता तर वास्तुवाला तुमचा मित्र होता. त्यामुळे तुम्ही सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मी तुुम्ही सल्ला देण्याबद्दलचं विधान मागे घेतो. बाकीची विधानं मात्र योग्य आहेत.

In reply to by सुबोध खरे

>>तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले.>> आपली लेक कोणाशी लग्न करायला जातेय हे ठाऊक नसेल तर तो वास्तूचा की सिनेमाचा दोष? माझी लेक असती तर तो दोष माझा म्हटलं असतं मी. कारण लेकीने हे सांगण्याइतपतही तिला अवघड जात असेल तर तिचा विश्वास मिळवण्यात मी कुठेतरी कमी पडलो. >>आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. हे त्या मावशींनी कोणता सिनेमा बघून केलं ते कळलं तर तुमच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल. >> शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही. मग फायनली काय ठरलं, निसर्ग जबाबदार की चित्रपट??

In reply to by सूड

ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा? कारण सिनेमात "झोपडीमे रहनेवाला उन्ची हवेलीमे रहनेवाली"से प्यार करता है तो दिलवाला वगैरे असतो आणि शेवटी श्रीमंत होऊन सासर्याला धडा शिकवतो. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी आणि भीषण असते . व्यंकटेश माडगूळकरांच्या एका सत्यकथेत गावचा एक मुसलमान एका मराठ्याच्या मुलीबरोबर मुंबईला पळून येतो. (आपला गाव आणि माणसे सोडून). काही वर्षांनी माडगुळकर त्याच्या घरी जातात तेंव्हा त्याची झालेली परवड त्यांनी यथातथ्य शब्दात लिहिली आहे. शेवती तो माणूस म्हणतो," साहेब, जवानी फार खराब चीज आहे. माणूस बोकडाचा सुद्धा मुका घेतोय. ते काही खरं नाही" विशीत प्रेम किंवा मृत्यू हि एक सुंदर कविता असते. चाळीशीत ते एक रुक्ष गद्य होऊन जाते

In reply to by सुबोध खरे

विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. पाशवी आणि दानवी(!) शक्ती कुठे आहेत?

In reply to by सुबोध खरे

प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.
या वाक्यावर आक्षेप. इथे मुलं म्हणजे भुकेलेले कुत्रे असल्यासारखे लिहिले आहे. याचा दूसरा अर्थ असा की 'मुलं कायम तयार असतात' ही अतिशय चुकीची पद्धत झाली विचार करण्याची. वरून 'मुलगी तयार असेल तर' म्हणजे काय हो ? केली एखाद्या मुलीने दोन चार प्रेम-प्रकरणं, अगदी तुमच्या शब्दातली 'मजा' पण केली तिने.. मग काय बिघडलं इतकं ? त्यतून ती शिकेल बर्‍याच गोष्टी. यात सर्वात तिच्या महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्याबद्दल तिला जबाबदारीची जाणीव असणे महत्त्वाचे. सर, तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून काही सांगू पाहतोय. 'मजा' हा शब्दप्रयोग खटकला..

In reply to by हाडक्या

वरील प्रतिसादातील प्रत्येक शब्दास अनुमोदन. स्त्री म्हणजे भोगवस्तू आणि पुरुष म्हणजे भोगवादी हे वर्गीकरण डोक्यात तिडीक आणते.

In reply to by स्पंदना

किती शाळकरी निष्कर्ष काढावेत याला सीमा नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो, बाकी चालू द्या.

In reply to by बॅटमॅन

समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात जाउन समजायला सुद्धा वय असाव लागतं. बर्‍याच गोष्टी अनुभव शिकवतात. त्या अश्या बसल्या बसल्या कधीच येत नाहीत. बघालच आता टवाळ मुलांच्या तथाकथीत प्रेमाच्या गोष्टी समोर यायला लागतील. चित्रपट हे फार मोठं सामाजीक संवादाच साधन आहे. अन त्यातल्या जमतील त्या गोष्टी घेणं हे ही काही फारस नवं नाही. कपडे बदलले, हेअरस्टाइल बदलल्या, मानसिकता बदलली. अन हे सगळ चित्रपटांनी झटपट साध्य केलं. चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं.

In reply to by स्पंदना

स्वतःच्या वैयक्तिक अनुभवापलीकडे जाऊन बघायला पण एक मॅच्युरिटी असावी लागते. स्वतःचाच चष्मा योग्य असे म्हणत बसलो तर कितीही अनुभव असला तरी तो शष्प कामाचा नाही. आणि हो, पिक्चर नसतानाचा समाज काय धुतल्या तांदळासारखा होता अशी गैरसमजूत असेल तर हॅ हॅ हॅ. धन्यवाद चकटफू मनोरंजनाबद्दल.

In reply to by स्पंदना

>>चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!! हलकं लवकर उचललं जातं हा दोष कोणाचा? उचलणार्‍यांचाच ना? दाखवणार्‍यांनी सांगितलंय का आम्ही सांगतो तसं वागा? आपणच ठरवतो ना तसं वागायचं की नाही ते?

In reply to by सूड

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
उपरोक्त वाक्यावर "पितृसत्ताक रुढींनी लादलेल्या अपेक्षा" च्या समकक्ष आक्षेपांचा अभाव म्हणजे मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :)

In reply to by माहितगार

मिसळपाव हा समाजाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. - मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अंमळ जुने दिवस आठवले आदिती तै .. :) काय त्या लढाया, काय ते आवेश, काय त्या पाशवी शक्ती ! बाब्बौ..!! *biggrin* आता उरलंय फक्त अनाहिता महिला मंडळ आणि कंपुबाजी हो.. ( हव्या त्या स्माईली कल्पा इथे.. ) ( बादवे धाग्याची जाहिरात समजावी काय? )

In reply to by नानासाहेब नेफळे

काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना! माणसानं प्रामाणिक असू नये का काय? स्वतःची भूमिका स्वतःला ठरवणं ह्यात काय आला पुरोगामी अथवा प्रतिगामी पणा? दुसर्‍यानं कसं वागावं हे नाही ठरवू शकत पण स्वत:चं मत मांडणं म्हणजे 'नळी फुंकली सोनारे'?????? सूडनं प्रामाणिक मत मांडलंय त्याबद्दल त्याचं अभिनंदन. ह्यामागं 'माझ्या मते' सामाजिक विचार असतो. जिथं दोन पोटजाती मध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात तिथं वेगळ्या जाती अथवा धर्माच्या रुढी, रीतीभाती अगदीच वेगळ्या असतात. नव्या सून/ जावयानं त्या आत्मसात करणं अपेक्षित असतं. घराण्याचं पाठबळ अशा घटनांमधून त्या नव्या व्यक्तीला मिळत असतं. अगदी 'बघून' आणलेली सून जेव्हा एक गोष्ट चुकते तेव्हा तिच्या घराचा उद्धार बर्‍याच ठिकाणी होतो इथं सगळंच वेगळं असल्यानं सगळ्याचाच उद्धार होणार. ही मानसिकता आहे. सगळ्यांचीच. आधी मानसिकता बदलली जावी, गरज असेल तर. अन्यथा उगाच पुरोगामीत्वाचा आव आणू नये. सरधोपट वाट सोडून बिकट मार्गाला वहिवाट बनवण्याची कुवत सगळ्यांची नसते, गरज देखील नाही.

थोडे प्रश्न, थोडे धक्के, थोड्या वेदना इथेही पोहोचलेल्या, थोडे हुंकार मग तिथेच दडपलेले. थोड्या संतापाला मौनात म्यान केलेले, किंचित ओले बाजूला वळवलेले. उद्याही असेल मी थोडासा जिवंत आजही फक्त थोडासाच तर मेलोय!

In reply to by एस

:)

श्री नमोजी यांस, पंतप्रधान म्हणून खालील विनंतीवर कार्यवाही करणेचे आदेश आपल्याच अखत्यारीत असलेल्या समाजकल्याण मंत्रालयास देणेचे करावे. तात्पुरता उपाय म्हणून नगरच्या घटनेस कारणीभूत असलेल्या फँड्री, बालक-पालक, शाळा व टाईमपास या मराठी चित्रपटांवर लागलीच बंदी आणावी. त्याचबरोबर कायमचा उपाय म्हणून अशा स्वरुपाचे सिनेमे रिलीज करण्यास बंदी आणावी. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बोंबाबोंब होऊ नये म्हणून असे सिनेमे येणार असतीलच तर प्रियकर व प्रेयसी एकाच जातीचे असावेत असा नियम करावा म्हणजे जातीभेद व दलितांवरील अत्याचाराचे निर्मूलन होईल असे वाटते. सदर निष्कर्ष सखोल चर्चा व काथ्याकुटातून काढण्यात येत आहे. आपला विश्वासू, आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

यापेक्षा सरळ मिपा वाचण्याची शिफारस करावी. गल्लीतल्या दीडदमडीच्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या आर्थिक घडीपर्यंत सर्व गोष्टींचा अक्सीर इलाज मिपावर मिळेल यात सौंशय नाही.

In reply to by आजानुकर्ण

व्यक्ती द्वेषाचा कहर ! अहो ज्या महाराष्ट्रात घटना घडली त्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहा ना हे पत्र.... पण ते तुम्हाला जमणार नाही , मोदीचा जमेल तसा जमेल तिथुन द्वेष करणे आणि ते कसे "जातीयवादी" "धर्मांध" आहेत हा कोळसा उगाळत बसणे येवढेच तुम्हाला जमते वाटते . आणि हो , मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत त्यामुळे तुम्ही असले उपरोधिक पत्र खरेच जरी लिहिलेत तरी त्यांना मुळ प्रसंगाचे गांभीर्य कळेल .... असो . देव तुमचे भले करो .