मोकल / मोकळी भाजणी
अजून एक झटपट, पौष्टीक, खमंग पाककृती :)
साहित्यः
१ वाटी थालीपिठाची भाजणी
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
चिमूट्भर ओवा
सजावटीसाठी ओले खोबरे व चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
भाजणीत लाल तिखट, मीठ व थोडे पाणी घालून सरसरीत भिजवावे.
पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, ओव्याची फोडणी करावी.(कढीपत्ता हवे असल्यास तो ही घालावा)
हिंग, हळद व कांदा घालून परतून घ्यावे.
त्यात भिजवलेली भाजणी ओतून एकत्र करावे.
झाकून वाफ काढावी.
भाजणी पूर्ण शिजली की गॅसवरुन उतरवावी.
वरुन ओले खोबरे व कोथींबीर पेरावी व आलं+मिरची वाटून लावलेल्या ताकासोबत सर्व्ह करावी.
ही भाजणी मोकळी व खमंग लागते. नाश्त्याला, मधल्या वेळचे खाणं म्हणून झटपट बनवता येतं.
थालीपिठाला, वड्यांना चांगला पर्याय आहे.
पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, ओव्याची फोडणी करावी.(कढीपत्ता हवे असल्यास तो ही घालावा)
हिंग, हळद व कांदा घालून परतून घ्यावे.
त्यात भिजवलेली भाजणी ओतून एकत्र करावे.
झाकून वाफ काढावी.
भाजणी पूर्ण शिजली की गॅसवरुन उतरवावी.
वरुन ओले खोबरे व कोथींबीर पेरावी व आलं+मिरची वाटून लावलेल्या ताकासोबत सर्व्ह करावी.
याद्या
10780
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
सानु, दोरखंडच घेऊन येते आता …
आई ग्ग!! भाजणीचं फक्त
क्लास!
_/|\_
छान.....!
सुरेख फोटू. खमंग पाकृ!
सानिकातै, तुम्ही आता प्रसिद्ध
मस्त पा.क्रु.
उत्तम पाकृ!
एक शंका
संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.
In reply to एक शंका by धर्मराजमुटके
संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)अगदी अगदी
In reply to संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. by डॉ सुहास म्हात्रे
छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग
In reply to अगदी अगदी by सानिकास्वप्निल
स्वागतचं आहे
In reply to छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग by डॉ सुहास म्हात्रे
अरे वा मोकळ भाजणी
आमच्याकडे पण …
हो
In reply to आमच्याकडे पण … by Prajakta२१
सनिका तै, कुहुप मत्स. तुमे
कईती चहान लिहईता थुमई!!
In reply to सनिका तै, कुहुप मत्स. तुमे by बालगंधर्व
थुमई.....
In reply to कईती चहान लिहईता थुमई!! by सूड
तुम्ही काहीही लिहा हो.....
In reply to सनिका तै, कुहुप मत्स. तुमे by बालगंधर्व
सुंदर ग
मस्तच गं... भुक लागली आता.
आवडता पदार्थ!
भन्नाट दिसते आहे पाकृ!
खूप छान
ही आज बनवलेली मोकळी भाजणी.
चला....
In reply to ही आज बनवलेली मोकळी भाजणी. by सूड
अरे वाह!
In reply to ही आज बनवलेली मोकळी भाजणी. by सूड