मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाळकांद्यांचं लोणचं

आदूबाळ · · पाककृती
बाळकांदे म्हणजे shallots. a साहित्य - बाळकांदे - २ लिंबांचा रस - लोणचे मसाला - फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे कृती बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले. लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल. कांद्याचे पापुद्रे थोडे मोकळे होतील आणि कांदे छान marinate होतील. साधारण दोन तास हे मिश्रण विश्रांतीअवस्थेत ;) ठेवल्यावर आता फोडणी घाला. मिसळून घ्या. लोणचं तय्यार!! a सुगरण्याचा सल्ला #१- लोणच्यांवर फोडणी गार करून घालावी म्हणजे ज्यावर घातली आहे ते जळत नाही. सुगरण्याचा सल्ला #२ - हे लोणचं वास घेताक्षणी नाकात आणि डोक्यात झिणझिण्या उत्पन्न करतं. या हिशोबाने फेसलेली मोहरी या लोणच्यात मस्त लागेल. (पण मला मोहरी फेसता येत नसल्याने हे करू शकलो नाही…) (टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत ;) )

वाचने 10871 वाचनखूण प्रतिक्रिया 28

पैसा Mon, 05/05/2014 - 15:58
मस्त पाकृ! तळटीपा पण भारी आहेत. मोहरी फेसायची सोप्पी आयड्या. घरात मिक्सर आहे ना? जरासं पाणी घालून मोहरी घुसळून घ्या. मिक्सरचं भांडं उघडताना मात्र सावध. नाहीतर पहिला फटका तुम्हालाच बसेल!

सूड Mon, 05/05/2014 - 16:48
>>टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत फोटो काढताना ठीकै, रेशिपी करताना कापलेली होतीत का? आणि रच्याकने, फोटो दिसत नाहीयेत.

दिपक.कुवेत Mon, 05/05/2014 - 17:25
नाकानी सोलले असतेस तर?? (हलके घे हो आदुबाळा). वेल आता पाकृ बद्दल. सोपी, छान आणि सुटसुटित. ईकडे मद्रासी कांदे मीळतात ते बघुन केल्या जाईल. पण लोणच्याचा मसाला घरी नाहिये (आता झाला का लोच्या). ईथे मिळणहि दुरापास्त सबब त्याला पर्याय असेल तर सांग.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा Mon, 05/05/2014 - 17:37
सर्वप्रथम गुगल सर्चवर 'लोणच्याचा मसाला' असं सर्च करा. त्यापैकी जी मानवेल ती रेशिपी वाचून काढा. त्यात दिलेल्याप्रमाणे लागेल तेवढा मसाला तयार करा. हाकानाका!

कवितानागेश Mon, 05/05/2014 - 18:49
छान आहे लोणचं. मिपा विश्रांती अवस्थेत गेल्यानी आदूबाळला नखे कापायला आणि लोणची घालायला वेळ मिळाला असावा असं दिसतंय.

सस्नेह Mon, 05/05/2014 - 22:15
बाळकांदे हा प्रकार प्रथमच ऐकला. पातीचे कांदे चालतात का ? अन या लोणच्याला कच्च्या कांद्याचा वास नाही का येत ? किती दिवस टिकते ?

In reply to by सस्नेह

मुक्त विहारि Tue, 05/06/2014 - 15:23
पण आज काल कुणाला "बाळकांदे" समजत नाहीत.... "मद्रासी कांदे" असे विचारा,,,,आमच्या गल्फ मध्ये ह्यांना "मद्रासी कांदे" असेच म्हणतात.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Tue, 05/06/2014 - 19:07
"वो छोटा कांदा हय काय?" असे विचारले तर तो टपरी वाला बघत पण नाही. पण, "वो मद्रासी कांदा हय काय?" असे विचारले तर लगेच उत्तर देतात.

In reply to by मुक्त विहारि

सखी Tue, 05/06/2014 - 23:15
दक्षिण भारतात हे अख्खे कांदे (सोलुन) सांबारमध्येही घालतात, फार छान चव येते. पाकृ चवदार असावी, सुगरण्याचा सल्लेही आवडले.

मितान Tue, 05/06/2014 - 10:00
लोणचं आवडलं. माझी सिंधी मैत्रिण यात विनिगर घालते. ते बरेच दिवस टिकते. यात लिंबू आहे. जास्त दिवस टिकेल ना ?

आदूबाळ Wed, 05/07/2014 - 15:04
सर्वांना धन्यवाद! मिपावरच्या दिग्गज सुग्रणींनी आणि बल्लवांनी माझं कौतुक करणं म्हणजे सचिन तेंडुलकरने स्वप्नील अस्नोडकरला "बरा कवर ड्राईव मारतोस रे" असं म्हणण्यासारखं आहे. व्याक्सिंगचा सल्ला मनावर घेतल्या जाईल. ;)

इरसाल Sat, 05/17/2014 - 21:11
सध्या बाळकराम नामक आयडीने दिलेले प्रतिसाद पाहता मला वाटले उसकाइच लोणचा बनाया हे! अवांतरः लगेहात कांद्यांचेहे