Skip to main content

सये...

सये...

Published on शुक्रवार, 02/05/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता. तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता , तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता
लेखनविषय:

याद्या 2330
प्रतिक्रिया 4