शांत अरनब गोस्वामी ,निश्चल वागळे आणि साधेसुधे भारतीय न्युज चॅनेल्स
भारतीय टी.व्ही न्युज चॅनल्स च्या संख्येत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय/अनाकलनीय/असहनीय वाढ झालेली आहे. त्यात मी केवळ हिन्दी-मराठी-इंग्रजी न्युज वाहीन्यांवीषयी बोलतोय. बाकी सध्या बाजुला ठेउयात. तर या नव्या मीडीयाने अनेक नवनिवेदकांची सुनामी आलेली आहे. अनेक नव्या चेहरयांना संधी मिळालेली आहे व अति उत्साहाने सारेच कामाला लागले आहेत. व सध्याचा निवडणुकी चा सीझन तर वृत्त निवेदकांचा (विणीच्या हंगामा सारखा) हंगाम असतो. यात निवेदकांच्या प्रतिभेला जणु नवा जन्म लाभतो.
यात प्रथम भारतीय न्युज चॅनल्स ची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती बघुयात. भारतीय न्युज चॅनल्स मध्ये संगीताची म्युझिकल बॅक्ग्राउंड ची फ़ार फ़ार मजा असते. म्हणजे आखिर कहॉ गई आजम खान की वो भैस ? या विशेष अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात सतत एक करुण संगीत बॅकग्राउंड मध्ये वाजविण्यात येत असते. ज्याने कीतीही नाही नाही म्हटल तरी आजम भाई च्या असीम आणि म्हशी च्या आजमभाई शी विरह या ( वेदना- असीम + विरह) प्रेक्षक हमखास एकरुप होतो. आणि त्याचे हात आकाशाकडे अथवा जुळुन अथवा क्रॉस (आपापल्या धर्म प्रेरणे नुसार ) हालचाल प्रतिक्षिप्त होते. व तो प्रेक्षक नकळत प्रार्थना करु लागतो की या अल्ला भैस मिला दे या अल्ला भैस मिला दे. प्रिंट मिडीया ने जळफ़ळाटातुन अशी बातमी दिलेली आहे की चॅनल्स चे संगितकार हे ए.आर. रहेमान इ. बॉलिवुड मधील प्रख्यात संगितकारच आहेत. ते गुप्तपणे आपली सेवा या चॅनल्स ला देतात म्हणे त्या बदल्यात त्यांना स्टींग (दंश) मुक्त ठेवण्याची हमी दिली जाते म्हणे. मागे एकदा नदीम श्रवण मधल्या नदीम ने नकार देउन पाहीला परीणाम तुमच्या समोर आहे. असो चॅनल्स विषयी इतक खोलात जाउ लागलो तर माझे खरे नाव व इतर कोणत्या आयडीने मी इथे लिहीतो ते उघड होउ शकते. तर ही गौरवशाली संगित नाटका सारखीच संगित समाचार ही आपली जिव्हाळ्याची व युनिक परंपराच आहे. तुम्ही बीबीसी सीएनएन अलजझिरा सारखे कीरकोळ प्रादेशिक चॅनल्स बघितले तर तुम्हाला ते कीती संगीतहीन पातळीवरुन बातम्या देतात. हे लक्षात येईल. व इमोशन हा अतिशय महत्वाचा भारतीय गुणाचा त्यांना गंध ही नसतो हे चाणाक्ष प्रेक्षकांना चटकन कळेल.
न्युज मध्ये भावनेला जे सार्थ महत्व भारतीय न्युज चॅनल्स देतात त्याला अखिल विश्वात तोड नाही. परत एकदा वरील किरकोळ प्रादेशिक चॅनल्स बघा कधी एक कीमान एक तरी मानवी भावनेच दर्शन तुम्हाला बीबीसी वा सीएनएन च्या निवेदिके च्या चेहरयावर बघितल्याचे आठवतेय तुम्हाला? रोबोटीक भावनाहीन असतात ते निवेदक. एकदम रटाळ. भारतीय निवेदकांचे संपुर्ण शरीर भावनेने ओथंबुन जाउन व्यक्त होत असते. उदा. निखील जी वागळेंना बघा भावातिरेकाने त्यांचे हात तोंड डोळे शरीराचा अर्धा वरील भाग सतत मुव्हमेंट करीत असतो. कधी कधी तर मला निखील ची काळजीच वाटते हो.
न्युज मध्ये टायटल्स जे पडद्यावर लिहुन येत असतात ते तर सर्जनशील लेखकांच्या कविंच्या अभिजात साहीत्याशी स्पर्धा करीत असतात. संगिताची साथ अर्थातच असतेच तर कधी टायटल यमक जुळवत येते जसे अखिलेश भय्या पर मंडराया मुजफ़्फ़रनगर का साया कधी टायटल सस्पेन्स निर्माण करतात वो कौन है जिससे डरता है दाउद ? कधी टायटल लाडाने चुचकारतात दिल्लीवालो जश्न के लीये तैयार हो आ रहा है.... कधी धमकावतात १२ दिसंबर को क्या खत्म हो जायेगी कायनात? कधी आव्हान देतात क्या आप को मालुम है आप के बच्चो को रोज जहर खिलाया जा रहा है? कधी काय तर कधी काय असे अभुतपुर्व टायटल्स सातत्याने वापरले जातात. दुरदर्शन नावाचा एक गरीब नाकासमोर चालणारा मुलगा होता या चॅनल्स च्या नादी लागुन तो ही बिघडलाय.
थोड निवेदकांविषयी बोलु या यात ही एक भाग समजुन घेण्यासारखा आहे इंग्रजी हे सर्वात श्रेष्ठ मध्यम हिंदी व कनिष्ट मराठी अशी वर्णव्यवस्था माध्यमात आहेच. त्यात ही कुमार केतकरांसारखा एखादाच अपवाद सर्व वर्णव्यवस्थेच्या भिंती मोडुन मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही ठीकाणी चर्चेत सहभागी होतो यांना इंग्रजी वाले ही चर्चा पंगतीत बसवितात. तर वागळे सारखा मजबुत मराठी गडी त्याच्या चॅनल च्या चावडीत नॅशनल इंग्रजी स्टार्स ना ओढुन आणुन मुलाखतीला बसविण्याचे कर्तुत्व दाखवितो. (पुर्वी वागळे हिंदी चॅनेलवरचे बसल्याचे स्मरते सध्या कार्यबाहुल्याने बहुधा बसत नाही) एक दंतकथा अशी ही आहे की हिंदी चर्चेत वागळे जे शब्द बोलायचे त्यांनी म्हणे एकदा त्यांचा अपमान झाला तेव्हापासुन यांनाच माझ्या चॅनेल चावडीवर बस्वाउंगा आणि प्रतिक्रीया लेउंगा अशी काहीतरी प्रतिज्ञा त्यांनी घेतली हे ( टाटांनी ताज हॉटेल बांधण्याची तसेच गांधीजींनी डब्या बाहेर फ़ेकल्या नंतर इ. ची आठवण ताजी होते.)
तर इंग्रजी त काही महान न्युज निवेदक आहेत अरणब गोस्वामी हा त्यापैकी एक. यांचे मुर्ख टीकाकार त्यांच ऑक्सफ़र्ड च शिक्षण मुद्दाम झाकुन तो कीती सारखा किंचाळत असतो तो ज्येष्ट व श्रेष्ठ अशा पाहुण्यांना मध्येच तोडत त्यांचा पाणउतारा कसा करतो याची च फ़ार तक्रार करतात. अहो पण पाहुणे बाकी काय ग्रेट ग्रेट जमा करतो हा हे तर बघा या न्युज अवर च्या चावडी वर कोण कोण येत स्वपन दासगुप्ता. मेहता (लिस्ट भोत लंबी है) सारखे ग्रेट पत्रकार, एकाहुन एक तज्ञ इतकी मोठी मोठी नाव की आजपर्यंत ही वर्तमानपत्रात च वाचत होतो ती याची देही याची डोळा पाहायला मिळतात. दुसर इंग्रजी भाषेचा अफ़ाट श्रवणानंद जो मिळतो त्याला तोड नाही. मात्र अरणब कोंबड्या झुंजविण्याची परंपरा कमी कडव्या रीतीने पाळतो त्याहुन मला जे आणि ज्या शब्दात उत्तर पाहीजे ते वदवुन घेण्यातच त्याला फ़ार रस असतो. एखाद्या कोंबडा कोबडीने असे ओकावयास नकार दिल्यास मग तो चलाखीने त्याला दुसरयांशी झुंजवतो. वर म्हणालो तशी भावनिकतेच्या आवेगा च्या बाबतीत तर आमचा मराठी मावळा वागळे च त्याला थोड्याफ़ार प्रमाणात टक्कर देउ शकतो.
हिंदी त थोडे ए बी व सी कॅटेगरी असे चॅनेल आहेत उदा. ए मध्ये झी एन डी टी ही ईंडीया एबीपी तर सी कॅटेगेरी मध्ये न्युज एक्स्प्रेस न्युज नेशन असे जरा कमजोर प्लेयर येतात. यांच्या सी दर्जाच्या न्युज चॅनेल मध्ये कोंबड्या अत्यंत अटीतटीने अहमहमिकेने झुंजविली जातात. यांचे निवेदक/ दिका एकदम झणझणीत असतात. यांच्या चर्चांमध्ये नॉइज लेव्हल एका उंची पर्यंत च असते त्या खाली ते स्तर घसरु देत नाहीत म्हण्जे उंची वाढवत नेणे हे महत्वाचे असते. पण इन बिचारो को ए ग्रेड के मुर्गे मुर्गीया नही मिलते उदा. स्टार प्लेयर ए दर्जाचे चॅनेल पसंत करतात म्हणजे नेता वा चर्चक जितका मोठा तितका तो ए क्लास चे चॅनेल निवडतो बडे मुर्गे फ़ाइट के लीए झी एबीपी पे बैठेंगे बाकी चिल्लर सी लेव्हल चॅनेल पे मिलेंगे. प्रेक्षक आपापल्या चॉइस प्रमाणे बोरडम च्या प्रभावात रीमोट ने चॅनल फ़िरवत राहतो. माझा एक मित्र एकाच विषयाची चर्चा पोटातील द्रव्याच्या प्रमाणावर ए बी सी कॅटेगरी त कुठे पाहायची ते ठरवितो.
बाकी कोंबडी झुंज पाहणे हा भारतीयांचा अत्यंत आवडता उद्योग निवेदकांना याची पुर्ण जाणीव असते फ़ाडुन खाल्ला मजा आ गया, क्या सुनाया यार ,असा चढला तो त्याच्यावर अशा प्रेक्षक प्रतिक्रीया कॉमन असतात. अर्थात काही सन्माननीय अपवाद असतात्च
माझ व्यक्तीगत मत अस आहे की एन डी टी व्ही इंडीया हा हिंदी चॅनेल आणि खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो.
असो आता उरलेला काथ्या तुम्ही कुटावा ही विनंती!
प्रतिक्रिया
मला ndtv news सगळ्यात चांगला
विनोद दुआंचा जायका हा
विनोद दुआ
छान खुसखुशीत लेखन. पु.ले.शु.
रविश आणि अभिज्ञान
अगदी ….
अगदी अगदी ….
मला निधी कुलपती फार पहिल्या
तबला अफलातून वाजवला आहे.
मदनबाण सर, माझ्या
अच्छा ! हे मला माहित नव्हते..
हाहा!
खास पुरुषी विषय.
याशिवाय
बैल
सर्वात फालतू आणि वेळेचा अपव्यय करणारा....
अर्णवची वाजवणारा एकच बंदा
तशी तर मोदीनेही त्याची वाजवली
न्युज चॅनेल जास्त पाहण्यात येत नाही
साउंड डिले
मराठी