चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे.
रसिक बलमा.... हे गाणं अजब आहे. स्वरांवरचा ठहराव आणि आंदोलने यांची एक मजेदार जुगलबंदी बघायला मिळते.
गाण्याच्या सुरवातीला " रसिक बलमा ........ मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.
गाण्याच्या नंतररच्या ओळींत मात्र हे स्वर थोडे बदललेले आहेत. "नेहा लगा के हारी.." म्हणताना लताबांईंच्या स्वरातून सतारीची आठवण होते. अर्थात तेच स्वर त्यानंतर रसीक बलमा...... ओळींनंतर सतारीतुन उमटतात.
शंकर जयकिशनच्या पोतडीतुन निघालेल्या या हिर्याला तितक्या ताकदीचे जबरदस्त कोंदण लताबाईच्या आवाजे दिलेले आहे.
" आजा सनम मधूर चांदनी मे हम" या गाण्याची वेगळीच गम्मत आहे. या गाण्यात अॅकॉर्डीयन या एका वाद्याने जी जादू साधली आहे ते
अर्थात एखाद्या गाण्यात एका ठरावीक वाद्याने बाजी मारुन जाणे हे फार कमी वेळा घडते. शंकरजयकिशनच्या वाद्यमेळ असणार्या संगीतात तर फारच कमी वेळा. गाण्यात अॅकॉर्डीयनसोबत बासरी , मेंडोलीन आणि व्हॉयलीन वापरले गेले आहे . मात्र लक्षात रहाते ते अॅकॉर्डीयन. लताबाईंचा स्वच्छ सूर आणि मन्नाडें ची तितकीच भन्नाट साथ. एकोणीसशे छप्पन सालातली ही गाणी . जवळजवळ साठ वर्षे होत आली. पण या गाण्यांतली जादू अजून काही ओसरत नाही.
वाचने
6641
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला आठवणारी अशीच काही
शुद्ध कल्याण...
सुजन कसा
In reply to शुद्ध कल्याण... by चौकटराजा
मस्तच आहे.
"घन तमी शुक्र बघ राज्य करी"
रसिक बलमा
तसे नसावे
In reply to रसिक बलमा by तिमा
प्रदीपजी
In reply to तसे नसावे by प्रदीप
गोंधळ
In reply to प्रदीपजी by तिमा
"ये जिंदगी उसी की है " या
मूर्तीमंत भीती उभी
In reply to "ये जिंदगी उसी की है " या by विजुभाऊ
मूर्तिमंत चा धागा
In reply to मूर्तीमंत भीती उभी by रमेश आठवले
मूर्तिमंत
In reply to मूर्तीमंत भीती उभी by रमेश आठवले
फक्त पाहिली ओळ
In reply to मूर्तिमंत by तिमा
आणि " लग जा गले " गाण्याची
लेखाचा मूळ हेतू शब्दांवरील
होय. "घन तमी शुक्र" गाण्यात
In reply to लेखाचा मूळ हेतू शब्दांवरील by विजुभाऊ
विजुभाऊ सापडला व्हिडीओ
In reply to होय. "घन तमी शुक्र" गाण्यात by शुचि
यातील संगीत " नदीला पूर आलेला
In reply to विजुभाऊ सापडला व्हिडीओ by शुचि
ऐकते. धन्यवाद.
In reply to यातील संगीत " नदीला पूर आलेला by विजुभाऊ
वो विजूभौ...
रसिक बलमा
थोडेसे अवांतर पण अँड्रॉईडवर
वा, यशोधरा!
In reply to थोडेसे अवांतर पण अँड्रॉईडवर by यशोधरा
मस्त धागा!