मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पैसा म्हणजे ...

असहकार · · काथ्याकूट
पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य , पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख , पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू , पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती , पैसा म्हणजे दुधाची वाटी , पैसा म्हणजे शाळेची पाटी , पैसा म्हणजे तरूणाची लाठी , पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी , पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी , पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती, पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर, पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त , पैसा म्हणजे इंधन , पैसा म्हणजे वंगण , पैसा म्हणजे मित्र, पैसा म्हणजे शत्रू, पैसा म्हणजे देव, पैसा म्हणजे दानव , पैसा म्हणजे गुरु , पैसा म्हणजे प्रतिष्ठा , पैसा म्हणजे ताकद , पैसा म्हणजे आशिर्वाद, पैसा म्हणजे तळतळाट , पैसा म्हणजे स्वप्न , पैसा म्हणजे ध्येय , पैसा म्हणजे त्याग , पैसा म्हणजे आनंद, पैसा म्हणजे लढाई , पैसा म्हणजे संघर्ष, पैसा म्हणजे जीवन, पैसा म्हणजे गरज, पैसा म्हणजे हौस, पैसा म्हणजे खाज, पैसा म्हणजे पाप, पैसा म्हणजे पुण्य, पैसा म्हणजे वेळ,पैसा म्हणजे स्थेर्य, पैसा म्हणजे सवय , पैसा म्हणजे अक्कल , पैसा म्हणजे सोय,पैसा म्हणजे माप , पैसा म्हणजे संधी, पैसा म्हणजे आव्हानं , पैसा म्हणजे प्रयत्न, पैसा म्हणजे उर्जा , पैसा म्हणजे अनुभव, पैसा म्हणजे असूया , पैसा म्हणजे द्वेष, पैसा म्हणजे मह्त्वाकांक्षा ,पैसा म्हणजे सृजन , पैसा म्हणजे स्वातंत्र्य , पैसा म्हणजे बेडी, पैसा म्हणजे योगदान, पैसा म्हणजे वीष, पैसा म्हणजे अमृत पैसा म्हणजे गूढ ....

वाचने 28845 वाचनखूण प्रतिक्रिया 32

In reply to by पैसा

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:10
या निमित्ताने आम्हा (नव)सभासदांना तुमच्या नावामागचे रहस्य सांगा ना. दरवेळी विचार पडतो की आपण या नावाचा आयडी का घेतला?

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि गुरुवार, 05/01/2014 - 00:12
अभिषेक पैसाची माहीती पहा ना राव -
माझ्या आयडीबद्दलः मिपाचे मालक बदलले नेमके त्याच काळात मी सदस्यत्वासाठी विनंती करत होते. माझ्या नावाने केलेली विनंती त्या मधल्या गोंधळात अ‍ॅप्रुव्ह झाली नाही. मग मी वैतागले. म्हटलं की इथे फक्त विचित्र नावं पाहिजेत असं वाटतंय आणि पैशाने सगळी दारं उघडतात, हे उघडतं का पाहू म्हणून जी विनंती केली ती अ‍ॅप्रुव्ह झाली! म्हणून माझा आयडी पैसा. तसाही पैसा कोणाला नको असतोय!

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:25
ओह्ह हे पाहिले नव्हते, इथे असे काही सापडेल अशी कल्पना नव्हती. फार्रफारर वर्षांपूर्वी ऑर्कुटच्या काळात हि अशी सवय होती मला, असे लोकांचे प्रोफाईल धुंडाळत फिरायची ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि गुरुवार, 05/01/2014 - 00:27
मला प्रोफाईल वाचायला आवडते कारण बरेचदा, प्रश्नांना खूप "विटी (चतुर)" उत्तरे दिलेली असतात.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:31
खरेय, मी सुद्धा तेव्हा याच हेतूने बघायचो, सोबतीला त्या व्यक्तीची माहितीही मिळायची. तसेच माझे प्रोफाईल देखील अश्याच अतरंगी माहितीने सजवले होते. आणि त्याचा हेतू मुलींना ईंम्प्रेस करणे वगैरे मध्ये यायचा. आता ते कारण तर आयुष्यातून बाद झाले. मात्र इथेही लोक्स वाचत असतात प्रोफाईल हे समजल्याने किमान माहिती तरी लिहितो लवकरच.

पैसा आहे एक दुधारी साधन ना पांढरा, ना काळा त्याच्या नोटांचा रंग बहुदा लाल, हिरवा, निळा पैसा ना चांगला ना वाईट ना समजूतदार ना हेकट ना सज्जन ना शठ ना हुशार ना माठ त्याला वापरून काहीही करा पैसा तसाच राहतो लाल, हिरवा, निळा... किंवा आजकाल 'व्हर्चुअल'सुद्धा मात्र ते साधन वापरणारा त्याला कमावण्यासाठी त्याला साठवण्यासाठी त्याला लपवण्यासाठी त्याला वापरण्यासाठी वापरतो ती पद्धत असते बरी नाहीतर वाईट म्हणजेच केवळ वाच्यार्थाने... पांढरी नाहीतर काळी उगाच पैशाला दोष लागतो आपण त्याला पांढरा-काळा म्हणतो... या जगात सत्याकडे बघायला वेळ आहे कुणाला ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शुचि Wed, 04/30/2014 - 19:52
त्याला वापरण्यासाठी वापरतो ती पद्धत असते बरी नाहीतर वाईट म्हणजेच केवळ वाच्यार्थाने... पांढरी नाहीतर काळी

रेवती Wed, 04/30/2014 - 18:50
मला वातलं पैसाताईच्या कामाबद्दल आभार मानायला काकू काढलाय की काय. असो. पैशाला आलेले जास्तीचे महत्व लेखनातून व्यक्त झालेले दिसत आहे. एक्कासाहेबांची कविताही तसेच काहीसे सांगणारी.

भाते Wed, 04/30/2014 - 19:50
इतक छान मुक्तक लिहिलंय मग ते काथ्याकूट सदरात कशाला? काव्य सदरात टाकायचे होते ना! धाग्याचे शिर्षक वाचुन संपादकांविषयी आभारप्रदर्शन आहे का असे वाटले. एक्काकाका, तुम्हीसुध्दा छान लिहिलंय. मस्तच.

पैसा मंज्जे सापै ...( साप आहे साप, साऽऽऽप.. आपला तो लांबड्या नागाचा भौ.) जेव्हा बार्टर सिस्टिम सुरु झाली, तेव्हाच माणसाची अधोगती सुरु झाली. त्या आधी सगळं फुकटात होतं.रानात जा कीती ही कंदमुळं खा.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:06
एक दिवस येईल जेव्हा पैश्याला काहीच किंमत उरणार नाही ! लवकरच तो एक दिवस येईल जेव्हा आठ आण्याचे नाणेही चलनातून गायब होईल आणि सारे व्यवहार रुपयांमध्येच करावे लागतील !

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/01/2014 - 10:03
सब पैसे कू है मान जगत मे पैसा बना भगवान! ही ताशा संबळ व सुंदरी या वाद्यवृदांवर गावाकडे मिरवणूकीत वाजवल जायच त्याची आठवण येते.

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/01/2014 - 11:42
माझी इथली पहिली पोस्ट याच विषयावर होती अणि त्यात सुरुवातीला या ओळी होत्या: श्वासात अडकला पैसा, पैश्यात अडकला श्वास; श्वासने सार्थक पैसा की, पैश्याने चाले श्वास?

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:24
पैशाने माणूस विकत घायल, पण माणुसकी ? पैशाने बेड विकत घ्याल, पण झोप ? पैशाने औषध विकत घ्याल, पण आरोग्य ? पैशाने नाती विकत घ्याल, पण प्रेम ?