फणसाच्या आठ्या आणि सोडे.
ध्यानी मनी नसताना आणि फणसाचा हंगाम नसतानाही या एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच फणस खायला मिळाला. फणसाच्या रसाळ गर्यांच्या जोडीने त्यांच्या आठ्या (बीया) ही आमच्या घरात सगळ्यांना प्रिय आहेत. नुसत्या उकडुन आणि वरुन थोडंसं मीठ भुरभुरुन उत्तम लागतातच पण मला त्या नुसत्या उकडुन खाण्यापेक्षा सुकट टाकुन केलेल्या कालवणात जास्त आवडतात. यावेळी येताना आईने आठवणीने सोडे दिलेत.
साहित्य :
फणसाच्या आठ्या सोललेल्या.
सोडे, गरम-कोमट पाण्यात १५-२० मिनीटे भिजवलेले.
प्रत्येकी २ मध्यम आकाराचे कांदे, बटाटे, टॉमेटो, वांगी.
आवडत असल्यास भिजवलेले वाल (सालां सकट.)
२ मोठे चमचे तेल, १ लहान चमचा हळद, ३ मोठे चमचे मसाला, मीठ चवी नुसार.
चिंचेचा कोळ. १-२ चमचे आलं-लसुण वाटण.
२-३ मोठे चमचे तांदळाची पीठी.
कृती :
आठ्या हलकेच ठेचुन, एका शिट्टिवर उकडुन घ्याव्या.
तेलावर कांदा परतुन घ्यावा. गुलाबी झाला की त्यात आलं लसुण वाटण, हळद, मसाला, किंचीत मीठ टाकून, मसाल्याचा खमंग वास दरवळे पर्यंत परतत रहावं.
मसाला तेल सोडू लागला की त्यात वाल आणि बटाटे टाकुन परतावं. थोडं पाणी टाकून भांड्यावर झाकण ठेऊन मध्यम आचेवर बटाटे आणि वाल शिजू द्यावे.
वाल शिजले की मग वांगी आणि टॉमेटो टाकावे. वांगी अर्धवट शिजली की मग भिजवलेले सोडे आणि उकडलेल्या आठ्या टाकाव्या. आच लहान करुन वांगी शिजू द्यावी. वांगी शिजली की मग चिंचेचा कोळ टाकून एक उकळी आणावी. चवी नुसार मीठ घालावं.
तांदळाची पीठी अर्ध्यावाटी पाण्यात मिसळुन टाकावी. परत एक उकळी आणावी आणि आचं बंद करावी.
याच्या जोडीला मसाला फ्राय सुके बोंबील हे हवेच.
तांदळाच्या भाकरी सोबत वा भाता बरोबर गरमागरम ओरपावे.
वाचने
25457
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
मस्त
लै भारी.
हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्तो
छान आहे पाक्रु पण मला मसाला
In reply to छान आहे पाक्रु पण मला मसाला by जेनी...
आज्जे आधी
वा! मस्त!
आठ्या कि आठ्ल्या ?
In reply to आठ्या कि आठ्ल्या ? by खटपट्या
गोट्या
सुरेख
In reply to सुरेख by दिपक.कुवेत
अरे ते ओले वाल आहेत. तुझा
आमच्याकड कदी फणस मिळेल अस
अरे देवा!
In reply to अरे देवा! by स्पंदना
अपर्णे …. कधी येतेस? चांगली
In reply to अपर्णे …. कधी येतेस? चांगली by भावना कल्लोळ
चला! धाटी मोटी व्हायला जाते.
In reply to चला! धाटी मोटी व्हायला जाते. by स्पंदना
सध्या आमच्याकडं 'चल रे
पदार्थ अनवट वाटला तसेच
आठळ्या.
In reply to आठळ्या. by प्रभाकर पेठकर
+१
आता लक्ष्य एकच!
मि.पा.खाद्य मोहोत्सव...!
मि.पा.खाद्य मोहोत्सव...!
मि.पा.खाद्य मोहोत्सव...!
हे पदार्थ चांगले दिसतायत पण
आम्ही
अहाहा!
अगदी वेगळी आणि चविष्टं पा. कृ
वा!!
मी फक्त सोडे वगळून बाकी मस्त
क्लास !!
सर्व श्री/सौ मुवि, एक्का काका
In reply to सर्व श्री/सौ मुवि, एक्का काका by गणपा
कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का?
In reply to कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? by प्यारे१
येस तोच. पोपटी करताना वापरतात
In reply to येस तोच. पोपटी करताना वापरतात by गणपा
आइंग.
In reply to आइंग. by प्रचेतस
याच पोपटीतल्या बीया नंतर
In reply to याच पोपटीतल्या बीया नंतर by गणपा
ओह्ह. ओके. धन्स रे.
In reply to ओह्ह. ओके. धन्स रे. by प्रचेतस
होय वालाचं बिरडं खासच लागतं.
In reply to याच पोपटीतल्या बीया नंतर by गणपा
वालपुराण...
In reply to कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? by प्यारे१
कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का?
कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का?ही एकाच कुटुंबातली पण वेगळी व्दिदल कडधान्ये आहेत. कडवा वाल आकाराने किंचीत लहान असतो. वाळल्यावर वालाच्या सालाचा रंग लाल-तपकिरी होतो तर पावट्याचा पांढरा होतो. चविला साधारण तसेच असले तरी वालाला एक खास स्वाद असतो त्याची सर पावट्याला नाही.सोडे !!!!!!!
मला वाटते
नेहमीप्रमाणेच वेगळी व छान
जीवघेणी पाककृती.... गणपा द
पोपटी
आमच्या समोरचे मालवणी
झक्कास!
मसाला
In reply to मसाला by राही
आमच्याकडे वर्षाचा मसाला एकदाच
घरी सोडे आहेत. आता करुन बघते
अरे दादा!!!