नॉस्टॅल्जिआ
आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
कोरा करकरीत, घडी न मोडलेला,
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्या झाडावर
-नी त्याच्याच मागील खिडकीवरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्यावर येणारी चहाची वाफ हुंगत,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु खिडकीत आलीस
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?
=======
आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
एकदाच घडी मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्या कुकरच्या शिटीकडे दुर्लक्ष करत,
मुलीच्या शाळेच्या तयारीवर
-नी मागून येणार्या बांगड्यांच्या किणकिणाटावर-
एक डोळा ठेवून,
तु पिठाने भरलेल्या हातून दिलेला,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तुझ्या हातचा चहा प्यायल्यावर
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?
========
आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीपर्यंत पोचून,
तिथे पडलेला, कुठला का असेना
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडायला जमवत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्या आवाजांकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्या झाडावर
-नी त्याहून अधिक काही दिसलं तर इतर कशावरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्यावर येणार्या चहाच्या वाफेचा अंदाज घेत,
स्वतःच केलेल्या चहाचा,
चटका न बसता, न सांडता,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु आठवणीत आलीस नी
वेगळे नॉस्टॅल्जिक व्हायचे राहुनच गेले!
ह्म्म !!
मुळ कवितेची कल्पना तशी वाटत
नीट कळले नाही
छान आहे...
>> और फिर जाईये याद जाने के
धन्स!
आवडली. शुचिमामीने दिलेला अर्थ
कविता आवडली
आज मी नॉस्टॅल्जिक होणार नाही असे ठरवले.
मस्त...
अगदी आवडली कविता.
कभी तनहाईयोंमे...हमारी याद आयेगी...
कविता आवडली.
छान
छान
मस्त! जाम आवडली..... मस्तच्च