अपघात
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मुंबई पुणे एक्प्रेस हायवे वर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच रस्त्यावर एके दिवशी माझ्या आतेभावाचा देखील अपघात झाला आणि त्यातच तो गेला . मागच्या डिसेंबर महिन्यात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा याच रस्त्यावर अपघात झाला ज्यात हे दोनही गुणी कलावंत प्राणास मुकले . त्यानंतर बरोबर एका महिन्याने अगदी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात माझा भाऊ यज्ञेश्वर फाटक हाही गेला . अत्यंत दुर्दैवी अशी हि घटना झाली .
आम्ही त्याला बंडू दादा म्हणायचो . तो LIC मध्ये कामाला होता . त्याची बदली वाशी ला झाल्याने शुक्रवारी तो वाशीहून पुण्याला यायचा आणि सोमवारी परत वाशीला जायचा . जाताना हायवे वर उभा राहायचा आणि मुंबई पुणे करणाऱ्या गाड्यांपैकी एक गाडी त्याची रोजची ठरली होती तिने तो वाशीला जायचा . वहिनी पण LIC मधेच होती . तिची बदली नगर ला झाली होती . दोन्ही मुली पुण्यालाच होत्या . आजी त्यांच्याकडे बघायची.मोठी पूजा T Y B Com ला होती आणि धाकटी अनुजा १० विला. त्या वेळी हि तो असाच सोमवारी त्याच्या ठरलेल्या गाडीने जायला निघाला आणि गाडीला अपघात झाला . समोरून येणार्या गाडीचा ताबा सुटून ती यांच्या गाडीवर आदळली . आणि गाडीतली सर्वजण जागच्याजागी गेले .
खरी परीक्षा तर पुढेच होती . सगळ्यांचे मृतदेह जवळच्या इस्पितळात आणले गेले . दादाचा मोबाईल मात्र बाहेर पडल्याने शाबूत होता . त्यात शेवटचा लावलेला मोठ्या मुलीचा पूजाचा नंबर होता . पोलिसांनी तिला फोन केला . ती lecture ला असल्याने तिने आधी फोन उचल नाही . नंतर बघितालन तर ४/५ मिसकॉल होते . तिने फोन लावल्यावर पोलिसांनी फोन उचालाल आणि अपघात झाल्याची माहिती दिली . वहिनी देखील नगर ला गेली होती त्यामुळे घरी येउन तिने शेजारच्या काकाना सांगून घरून त्याच्या गाडीने इस्पितळात निघाली . जाताना बाबान किती लागले असेल याचा अंदाज नाही म्हणून तिने बाबांचे कपडे , थोडासा जेवणाचा डबा , एक पांघरून अशी सगळी तयारी करून ती निघाली . मात्र तिथे पोचल्यावर तिला धक्काच बसला . बाबांचा मृतदेह समोर बघून थोडा वेळ ती सुन्नच झाली . अपघातात मृतदेहाची फार वाट लागली होती . तशा अवस्थेत आपल्या बाबांना बघून तिला काय करावे कळेनाच पण मग सावरली . दादाच्या मृतदेहाची ओळख पटवणे , तो तब्येत घेणे हे सगळे सोपस्कार तिनेच पार पाडले . मग मोठ्या दादाला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली . मोठ्या दादाने सगळ्यांना फोन करून तो स्वतः तिच्या बरोबर इस्पितळात गेला . मग रुग्णवाहिका बोलावून घरी आली .आणि मग पुढचे सोपस्कार पार पडले .
आम्हाला सर्वांनाच तिचे खूप कौतुक वाटले . अशा परिस्थितीत तिने फार खंबीरपणे पावलं उचललन . आम्ही नंतर तिला विचारलं कि कस काय केलास हे ?तिने दिलेलं उत्तर खूप छान होत . म्हणाली , " बाबांच्या जागी जर मला असा अपघात झाला असता आणि बाबांवर अशी वेळ आली असती तर ते मला अस इथे टाकून गेले असते का ?त्यांनीही हे सगळ केलच असत ना ?" आम्हाला खरच कौतुक वाटल . दोन्ही मुली अचानक पने मोठ्या झाल्या . समंजस झाल्या . आपण रडत बसण्यापेक्षा आईला आधार देन महत्वाच हे त्यांना न सांगताच कळल . आता तिघीही सावरल्या आहेत . शिवाय सगळ कुटुंब आहेच त्यांच्या पाठीशी . दादाने छोट्या मुलीच्या १० वीच्या परीक्षेसाठी महिनाभराची रजा टाकली होती . ज्या दिवशी तो गेला त्याच दिवशी दुपारी त्याची रजा मंजूर झाल्याचा फोन आला आणि तो ऑफिस ला का नाही याला चौकशी झाली . झाला प्रकार त्यांना कळल्यावर त्यानाही धक्का बसला आणि वाईटही वाटल . जर सकाळी सकाळी त्याला फोन केला असता तर झाला प्रकार कदाचित टळला असता अस वाटून गेल .
प्रतिक्रिया
सुन्न !!!
सुन्न..!!!
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.
हा धागा आठवला
आई ग्ग!
कमाल उत्तर दिले आहे त्या
+१