Near Death Experience.. अनुभवलाय कधी..?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
______________________________________
Dyatlov Pass आणि सध्याचे कांही धागे वाचून सुचलेला विषय..
______________________________________
शनिवार, २७ मार्च २०१०, कोर्टयार्ड मॅरीयॉट, हिंजवडी.
प्रत्येक महिन्यातून (पूर्ण) दोन दिवस चालणारी क्लायंट मिटींग नेहमीपणे सकाळी सुरू झाली. मागच्या महिन्याचा प्रोजेक्ट परफॉमन्स, रीजनल परफॉमन्स, पुढची टारगेट्स वगैरे नेहमीचे विषय रवंथ करत करत एकदाचे रात्रीचे आठ वाजले व मिटींग संपली.
कॉकटेल / मॉकटेल प्रकार सुरू झाले. रंगलेल्या गप्पा ऐकत शांतपणे एखाद्या मॉकटेलचा आस्वाद घेण्यातला आनंद वेगळाच!
अचानक टूम निघाली, ई स्क्वेयरला रात्री ११:३० च्या शो ला जायचे, बहुदा Terminator Salvation असावा.
हो नाही करत ६ जण तयार झाले, एका उत्साही मॅनेजरने लगेचच बहुतेक फोनवरून बुकींग केले व आम्ही गडबडीने जेवणाकडे मोर्चा वळवला.
जेवण आवरतानाच कसे जायचे व कुणाच्या गाड्या घ्यायच्या वगैरे बोलणे झाले. निष्कर्ष काय निघाला तर सहा जणांसाठी चार चारचाकी पळवायच्या.. माझी दुचाकी वेगळीच.
रूमजवळच सोयीच्या ठिकाणी माझी गाडी पार्क करून मी एका कारमध्ये बसलो.
आम्ही ५० / ६० च्या वेगाने चाललो होतो, पस्तीशीचा कलीग कार व्यवस्थीत चालवत होता. एका वळणावर अचानक काहीतरी चुकले आणि क्षणार्धात आम्ही समोरून वाहने येणार्या लेनमध्ये आलो..
सावरायचा वेळ मिळालाच नाही. टाटाची मोठ्ठी बस समोरून येत होती.. आमच्या दिशेने.. आमच्या इतक्याच वेगात.
पुढचा क्षण अन् क्षण लख्ख आठवतो...
पहिले दिसले दोन प्रखर हेडलाईट, रेडीएटर समोरची जा़ळी, ब्रेकचा कचकचाट, शेजारून कानावर आलेला फ*
आणि मो S S S ठ्ठा आवाज.
Head On क्रॅश.
कारच्या सर्व संरक्षण उपकरणांनी वेळेवर व व्यवस्थीत काम करून आम्हाला ओरखडाही पडून दिला नव्हता. दोघेही ठणठणीत होतो. खाली उतरून आणखी एकदा खात्री करून घेतली. गाडीचे बरेच नुकसान झाले होते पण एका बाजूने धडक झाल्याने गाडी सुरू होत होती व गुरगुरत पुढे जावू शकत होती.
बसवाला पळून गेला होता. पोलीस, पंचनामा वगैरे कटकट नको म्हणून आम्हीही गाडी जवळच एका सुरक्षीत ठिकाणी लावली, माझ्या दुचाकीपर्यंत पायपीट केली व तिथून ११:३० चा शो गाठला.
आजही गाडीचा वेग वाढवताना ते दोन प्रखर हेडलाईट आठवतात.
______________________________________
तुमच्याही आयुष्यात असे काही अनुभव असतील तर येवूद्या, लिहीताना निगेटीव्ह वाटेल, Depressing वाटेल पण लिहा.
त्यातून घेतलेल्या धड्यासकट लिहीले तर उत्तमच.
______________________________________
प्रतिक्रिया
बाब्बौ!! मी एकदा चालत्या
भयानक .... मला स्कूटी
हम्टी डम्टी...
गाडी कोणती होती तेही लिहावे
केस का ठोकली नै ?? वन मिलियन
आईवर गेलाय!
>>त्यातून घेतलेल्या धड्यासकट
मृत्यु हा एक शिक्षक
Near Death Experience..
"ते" अवजड वाहन म्हणजे ट्रकच
त्याच्याही पुढचा प्रकार.
असंच एक धाडस / मुर्खपणा
असंच एक धाडस / मुर्खपणा
जवळपास असाच माझा अनुभव
चुकीचा सल्ला.
तेव्हा अचानक एका मित्राचा
बरोबर आहे...
+१
२-३ वेळा
पुरावा
अॅ!
भयानक...
मी PMT ने जातो. तेसेही
मला भरपुर आहेत असे
मग लिहा की मास्तर...
असा अनुभव हि असावा...........
लहानपणी एकदा असाच 3D एक्शन
मोदका , तुला..
तुम्ही म्हणताय तसे आसु शकेल
रोज
अनुभव!
एकूण माझ्यासकट बर्याच जणांना
प्रतिसाद
मास्तर मरण आ्णि जन्म या
होय
लोकल मधून पडताना वाचलेय खूप
माझा अपघात
आमचा
१. प्रगती एक्स. ने मुंबइला
भयाण !
=))))))))))))))))))))))))))))
बिका'दा तुम्हारा चुक्याच!
हो हो! एकदम खरं आहे!
बाब्बौ...
हे सगळे
आला की !!
थरारक!
N. D. E. साठी १४०८ हा
गावातल्या विहिरि मध्ये पडलो
थोडे अनुभव माझे आहेत.. तर
Pagination