जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये,
खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये !
रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये
श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये !
फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ?
भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ?
मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ?
नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान
बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे,
बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2101
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येक गोष्टीचे काळे आणि
भावना पोहोचल्या
In reply to प्रत्येक गोष्टीचे काळे आणि by ज्ञानोबाचे पैजार
त्या अमिश का कोण त्याच्या
In reply to प्रत्येक गोष्टीचे काळे आणि by ज्ञानोबाचे पैजार
अरे वा!
प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to अरे वा! by पैसा