रमज़ान व विजयादशमी निमित्ताने...
राष्ट्रवादी मुस्लिमांचे कर्तव्य
पुण्यातल्या राष्ट्रवादी मुसलमानांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा दुष्ट प्रवृत्तींना आळा घातला नाही तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम राष्ट्रवादी मुसलमानांनाच भोगावे लागतील. मुस्लिम वस्त्यातून राष्ट्रविरोधी प्रचार केला जातो का? असा प्रचार करणारे कोण आहेत? त्यांना आधार देणारे कोण आहेत? यांची माहिती राष्ट्रवादी मुस्लिमांनी मिळवायला हवी देशातील अनेक घटनांचे धागेदोरे पुण्यात आढळलेले आहेत. त्यामुळे अशा विषयांशी संबंधित व्यक्तींच्या कारवायांवर लक्ष ठेवायला पोलिसांना वा गुप्तचर यंत्रणेला आवश्यक मदत करायला मुसलमान राष्ट्रवादी व्यक्तींना पुढे यायला हवे. पुण्या-मुंबईलाच नव्हे तर देशात अशांतता माजणार नाही घातपात घडणार नाही म्हणून हिंदूंपेक्षा मुसलमानांनीच अधिक दक्ष, अधिक सावध अन् अधिक सक्रीय राहाण्याची जरूरी आहे. मुसलमान अशा प्रकारे वागतील तर देशात होणारे घातपात टळतील. घातपात करणाऱ्यांसाठी येणाऱ्या आणि साह्य करणाऱ्या देशद्रोहींना छपवण्याचा प्रयत्न मुसलमानांना धोकादायक ठरेल. प्रत्येक बॉम्ब स्फोटाच्यामुळाशी एकजात मुस्लिम आरोपी आहेत. कोंढव्यातील आरोपी शोधताना पोलिसांना मुस्लिम समाजानेच मदत केल्याची घटना यादृष्टीने महत्वाची आहे. बहुसंख्य मुसलमानांना इथे कुठलाही प्रक्षोभ माजावा, अशांतता निर्माण व्हावी, तणावाचे वातावरण राहावे असे वाटत नाही. अशा कारवायांना साथ देण्यात आपण उध्वस्त होऊ याची कल्पना इथल्या मुसलमानांना आहे. भारताशी बेईमान होणे त्यांना मंजूर नाही. अशा मुसलमानांनी सावधपणे वागून, राष्ट्रद्रोही कारवायांना उघडे पाडण्यात पुढाकार घ्यायला हवा. घातपात घडल्याने जो प्रक्षोभ निर्माण होईल त्याला आवर घालणे सोपे नक्कीच नाही. घातपात होऊ न देण्यासाठी जागरूक रहाणे सोपे व शहाणपणाचे आहे. वस्तीत रहायला येणारा कोण आहे, काय करतो याची माहिती ठेवणे जरूरी आहे. कोंढव्यात ही अशी मंडळी राहतात याची माहिती पोलिसांपर्यंत कोणी पोहोचवली नाही या अन अशा घटनांनी मुसलमानांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी रा्ष्ट्रवादी मुसलमानांनी अशा राष्ट्रद्रोहींची माहिती द्यायला हवी अन् राष्ट्रीय प्रवाहात आम्ही आहोत हे दाखवून द्यायला हवे. एवढीच अपेक्षा विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनाच्या निमित्ताने व्यक्त करायला हवी.
वाचने
6252
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत ----- आम्
सहमत परंतू
मलाही
In reply to सहमत परंतू by ऋषिकेश
अवांतरः
In reply to मलाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
रमजान दसरा
सहमत
मी
हे विचार दसऱ्यालाच का?
सहमत आहे
In reply to हे विचार दसऱ्यालाच का? by शशिकांत ओक
घाटपांडे यांनी चांगली माहिती
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
+१ , सहमत आहे ...
In reply to हे विचार दसऱ्यालाच का? by शशिकांत ओक
गैरसमज
गैर समज
गोडवा
@कोंढव्यातील आरोपी शोधताना
> ज्याने भारतीय ईतिहासातील
ते एक विणोदी पुस्तक आहे. सबब
In reply to > ज्याने भारतीय ईतिहासातील by आशु जोग
चला म्हणजे हे पुस्तक या देशात
In reply to > ज्याने भारतीय ईतिहासातील by आशु जोग
@गोडवा....
हि मुलख्त बघा