Skip to main content

(आनंदाने)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/10/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2755
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वा रंगाशेठ, बरेच दिवसांनी मिपावर आल्याच सार्थक केलेत.. एकदम झकास विडंबन.. (निवृत्त)केशवसुमार स्वगत: बाकी हल्ली जे काही लेखन या नावाखाली चाललं आहे त्याची उबग आली होती..

हा हा हा... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... ...मस्त!!! मुमुक्षु

पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... मस्त रे! रंगा... :) तात्या.

:) सह्ही.. फर्मास विडंबन -('मिसळ'लेला) ऋषिकेश

झकास विडंबन.. आवडले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

झकास विडंबन.. आवडले. सहमत. --शाल्मली.

In reply to by शाल्मली

सहमत