युरोपांश - स्विट्झर्लंड
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं.
पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते. कायमस्वरुपी वस्तीला असलेली भिकार्यांची कुटुंबं, दूरुनच नुसत्या वासाने ओळखू येणारी प्रसाधनगृह, काय बोलताहेत हे कळू नये असे ध्वनीक्षेपक आणि रांगेत ताटकळत असणार्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करून गप्पा मारणारे कर्मचारी ह्या आठवणी आहेत. गॅरे दे लिऑन स्थानकात शिरल्याबरोबर समोरच आरक्षण कक्ष, तिकिटे विकत घ्यायचे कक्ष, पर्यटन माहिती केंद्र, प्रसाधन गृह आणि गाड्यांची स्थिती दर्शविणारे मुख्य इलेक्ट्रॉनिक फलक (इंडिकेटर्स) ह्यांची माहिती देणारे, नजरेत भरणारे, फलक पाहावयाला मिळतात. तुम्हाला जिथे जावयाचे असेल (स्थानकावर) तिथपर्यंत हे माहिती फलक तुमची साथ करतात. आरक्षणाचा फलक पाहात पाहात मी आरक्षण कचेरीच्या दाराशी पोहोचलो. माझा युरेल पास दाखवून तो कार्यान्वित करण्याची विनंती केल्यावर तिथल्या महिलेने (हो सर्व आरक्षण केंद्रांवर प्रवाशांच्या आरक्षण विषयक समस्या सोडविण्यासाठी महिलाच होत्या.) तात्काळ माझा पास कार्यान्वित करून दिला. मला स्विट्झर्लंडच्या 'ल्युझर्न' शहरी जायचं होतं. पण अति आत्मविश्वासाने किंवा कशाने असेल माझा गंतंव्य स्थानाचा उच्चार 'लुसान' असा झाला. बाईंनी मला आरक्षणाचे तिकीट हाती ठेवले. गाडी तासाभराने होती. बाहेर स्थानकावर येऊन मोकळ्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. विचार करीत होतो बरे झाले वेळेवर पोहोचलो. आरामात गोष्टी पार पाडता आल्या. उगा धावपळ झाली नाही. समोरच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर गाड्यांची नांवे, गंतव्य स्थान, वेळ आणि फलाट क्रमांक दाखवले होते. २० मिनिटे आधी फलाट क्रमांक दर्शविला जातो. आमच्या गाडीचा फलाट क्रमांक केंव्हा लागतो हे पाहात बसलो असताना एक लक्षात आलं मला जायचं होतं त्या शहराचं नांव आणि आरक्षण तिकिटावरील शहराचं नांव ह्यात किंचित फरक होता. मनांत शंकेची पाल चुकचुकली. पुढे जाऊन गोंधळ होऊ नये म्हणून पुन्हा एकदा त्या आरक्षण महिलेकडे गेलो आणि माझी शंका तिला बोलून दाखवली. तेंव्हा 'ही दोन वेगळी शहरं आहेत, तुम्हाला कोठे जायचे आहे?' असे तिने विचारल्यावर मी तिला माझ्या जवळील, माझ्या मित्राने दिलेले, माहिती पत्रक दाखविल्यावर तिने मला 'धीस इस 'ल्युझर्न', यू सेड 'लुसन'' असे म्हणून माझी चुक माझ्याच गळ्यात बांधली. तिची माफी मागून नवे आरक्षण मिळविले आणि परतलो. अजून २५ मिनिटे वाट पाहणे होते.
वेळेवर प्रवासाला सुरुवात झाली. डब्यात अवजड बॅगांसाठी वेगळे सामानकक्ष होते. तिथे आमच्या बॅगा ठेवून स्थानापन्न झालो. गाडी अत्यंत स्वच्छ, प्रशस्त होती. प्रवास अतिशय सुखाचा होता. रुळांचा खडखडाट नाही, जास्त हेलकावे नाहीत पण वेग प्रचंड होता. ह्याची तुलना भारतातल्या 'शताब्दी एक्स्प्रेस'शी होऊ शकेल. समोर टिव्हीच्या पडद्यावर पुढच्या स्थानकाचे नांव, आत्ताचा गाडीचा ताशी वेग, थोड्याफार त्यांच्या सोयी सुविधांची जाहिरात वगैरे चालू होते. स्विट्झर्लंडचे पहिले दर्शन बर्फाच्या अस्तित्वाने अधोरेखित झाले. गॅरे दे लिऑन ते बॅसल ते ल्युझर्न ते एंजलबर्ग असा प्रवास झाला. एंजलबर्गला आधीही एकदा भेट दिलेली असल्याने चालण्याफिरण्यात सराईतपणा होता. स्थानका बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्यास निवासाचा पत्ता दाखविल्याबरोबर त्याने 'माहित आहे' अशा अर्थी मान हलवून सामान त्याच्या टॅक्सीच्या सामानाच्या कप्प्यात ठेवले. फक्त पाचच मिनिटात आम्ही टेकडीवरच्या आमच्या निवासास पोहोचलो.
दुसर्या दिवशी उजाडल्यावर खिडकितून बाहेर पाहिलं आणि धन्य धन्य झालो. दूरवर डोंगराच्या शिखरापासून उतरणीपर्यंत पसरलेलं बर्फ थेट आमच्या निवासाच्या खिडकीपर्यंत आलं होतं.


दूरवर दिसणार्या एंजलबर्ग खेड्याच्या आपण प्रेमात पडतोच पण एवढ्यात जाणवत आपल्या आजूबाजूला मस्त बर्फाळ गालीचा पसरला आहे आणि आपण वेड्यासारखे पाहतच राहतो.









वाचने
12893
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
आज जेपी ला मागे टाकून मी पहिला
पेठकर काका फोटो मस्त, वाचतोय
In reply to आज जेपी ला मागे टाकून मी by खटपट्या
मस्त ट्रिप काका.
@ खटपट्या वेलकम टू " मी पयला क्लब "
=))छान !पण या वेळी वर्णन जास्ती रंगवलं नाही .बर्फाने (हिम )गारठलं .
In reply to छान !पण या वेळी वर्णन जास्ती by कंजूस
हो ना! मलापण तसच वाटलं. मोनालीसाबाई नसल्यामुळे का काय?
पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना? की इतक्या निर्मळ अस्पर्श निसर्गाने आ वास्ला गेला तो लिखाणात पण उतरला की काय?
In reply to हो ना! मलापण तसच वाटलं. by स्पंदना
+१
प्रपेकाकांच्या बॅटींगची उणीव जाणवली खरी ! चित्रे मात्र मस्त आहेत !
पण हा प्रवास खरंच अवाक् करणारा आहे ! मी तर गाडीच्या जोडलेल्या डब्यांतून पुढेमागे जात बहुतेक सगळा वेळ दोन्ही बाजूंचा निसर्ग पहात घालवला... आठपैकी सहा तास उभा अथवा चालतच होतो !
एक आटोपशिर दम मिळाला असेल .पुढच्या कट्टयाला गराडा पडेल भोवती त्यावेळी ऐकवतील .लिहिण्याबोलण्यात हातभर अंतर ठेवणार आता बहुतेक .
छान फोटो.
स्वीसचे वर्णन, रेल्वे स्टेशनमधील सोयी, आरक्षणातील चूक ई रंजक आहे. एक चौकशी- सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की
काय फायदा झाला. म्हजे पुणे येथे न राहाता खडकीला राहून दर्जेदार पण स्वस्त होटेल मिळवायचे असा काही फंडा होता का? आपण एका गावाचा उच्चार स्पेलिंगप्रमाणे " चुर" असा करू तो क्वार असा आहे.त्यामुळे तिक्डे फिरताना ते लोक एखाद्याठिकाणाला काय म्हणतात हे ही महत्वाचे ठरते. उदा .आपण ज्याला रोम म्हणतो ते तिथे रोमा असू शकते.
बाकी काल तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही.
खटपट्या, कंजूस, aparna akshay, प्रमोद देर्देकर, चौकटराजा - धन्यवाद.
कंजूस - >>>>पण या वेळी वर्णन जास्ती रंगवलं नाही .बर्फाने (हिम )गारठलं
खरं आहे. पॅरीसच्या तुलनेत इथे लिहीण्यासारखं जास्तं कांही नव्हतं. बर्फ 'पाहणे', 'अनुभवणे' एवढाच उद्योग होता. माउंट टिटलिस आणि ग्लेशियर एक्स्प्रेस व्यतिरिक्त स्विट्झर्लंड मध्ये पाहण्याजोगे, वर्णन करण्याजोगे बरेच कांही आहे पण ते उन्हाळ्यात. हिरवागार निसर्ग आणि माफक बर्फ अशा समतोल दृश्यांनी स्विट्झर्लंडचे सौंदर्य आणखिन खुलते. ते परत कधीतरी. (उन्हाळ्याच्या काळात निवांत भेट दिल्यावर).
aparna akshay - >>>>पण प्रपेकाका वाईन तर दिली होती ना? मग जरा लिखाणात फटाके फुटयला हवे होते ना?
हा: हा: हा: का कोण जाणे, मला 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला.....' ही म्हण आठवली.
चौकटराजा - >>>>सेलीरिना येथे राहाण्यामुळे नक्की काय फायदा झाला.?
स्किईंगच्या मौसम मुळे मोठ्या शहरातील बहुतेक निवासस्थानं (आपल्याला परवडणारी) भरलेली होती. फक्त एक रात्र पाठ टेकायला निवासाची गरज होती. मुख्य शहरापासून जरा दूर (एकच स्थानक), कमी महत्त्वाच्या गावी अशी सोय होऊ शकत होती म्हणूनच 'ताश' आणि 'सेलेरिना' निवडलं.
>>>>तुमचे पॅरिस मधील होटेल आतून बाहेरून स्ट्रीट व्हू मधे पाहिले पण आसपास इन्दियन रेस्तरो अशी पाटी असलेले काही सापडले नाही.
निवासाच्या इमारतीतून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला पहिल्या गल्लीत दुसरे (किंवा तिसरे) दुकान आहे ते.
पेठकरकाका मस्त चाल्लीये सहल,
पायाला भिंगरी बांधलीत जणु, मुंबईत घारापुरी कट्टा, तिकडुन युरोप दर्शन + युरोपात कट्टा, पुण्यात कट्टा, चिंचवड्मधे उपस्थिती... मानलं तुमच्या उत्साहाला.
लगे रहो.
भरपूर मजा आली वाचताना.. धन्यवाद.
आठवणी जाग्या झाल्या.. अगदी याच दिवसांमधे पण आदल्या वर्षीचे याच ठिकाणांचे काही फोटो इथे पेस्टवतोय.

आणखी एकदोन आयफेल टॉवरचेही..
थंडीने बर्फ झाला होता या ठिकाणी..
फोटोतला बर्फ बघितल्यावर खुप गार गार वाट्ल. आमच्याकडे खुप गरमी आहे.
फोटो पाहुनच "गाssssर" पडलो. पण अजुन हवे होते असं वाटतय.
लिखाण वाचले. आवडले. आमचीही तीच गोड तक्रार. आतषबाजी कमी आहे. पुरुष विभाग काढा रे कुणी तरी!
गविंचे फोटो देखील छानच.
वाचतीये. सफर आवडतीये.
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास राहणार्या मुलांचा हेवा वाटायचा. असं वाटायचं त्यांची काय मजा असेल. कुठलीही एखादी काडी तोडायची, हिमालयातील बर्फाचा गोळा बनवून त्याला लावायचा आणि साखरेचं रंगीत पाणी त्यावर टाकायचं. झाला बर्फाचा गोळा तयार. तोही फुकटाSSत.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात - उद्योजकता, व्यावहारीक काटकसर
पेठकरशेठ,
मस्त चाललाय प्रवास! वर्णन आणि चित्रे दोन्ही झकास.
प्रवासवर्णन छानच आहे पण आत्ता फोटो दिसत नाहीत. काय कारण असेल?
In reply to प्रवासवर्णन छानच आहे पण आत्ता by पाषाणभेद
गणेशा फिव्हर असं म्हणतात याला.
In reply to गणेशा फिव्हर असं म्हणतात याला by रेवती
हा तेच म्हणणार होतो. आता फोटो दिसत आहेत.
बाकी आपला गणेशा कुठे आहे सध्या? दिसत नाही येथे.
झकास प्रवासवर्णन
पु,भा,प्र.
इथे मुंबईत उकाडयाने जीव हैराण झालेला असताना हे फोटो पाहुनच छान गारगार वाटलं.
आता जर्मनीची (प्रवासवर्णन) वाट पाहतो आहे.
काकांच्या पाककृतीचे अस्मादिक पंखा होतोच आता लेखन शैलीचा सुद्धा झालो , भारत भेटीवरून आताच परत सोन्याच्या पिंजर्यात परत आलो आहे तेव्हा मनात दाटून आलेले मळभ काकांच्या प्रवास वर्णनाने दूर झाले.
तू अनुभवलेलं 'खच्चून बर्फ' आम्हीही - लिखाणातून व फोटोंतून - अनुभवलं. असाच 'लिहिता' रहा.
सहल मस्त चालली आहे :-)
मस्त सफर एकदम ... पुढच्या भागाची वाट बघतोय :)
मस्त ..हा हि भाग आवडला ...
In reply to मस्त ..हा हि भाग आवडला ... by आरोही
+++१११ 
पुढच्या भागाची वाट पाहतोय.
नेमकं पण ओघवतं वर्णन आणि मोहक फोटोजमुळे दोन्ही प्रवासवर्णनं आवडली.
फोटो पाहुनच समाधान करुन घेत आहे. :)
झकास भटकंती!! तुमचं स्वित्झर्लंड तिकडे सानिकाताईंचं नेदरलँड!! खर्चात पाडणार आम्हाला!!
बाकी बर्फाच्या गोळ्याची कल्पना वाचुन 'असामी असामितले हिमालयमंदी गुरुदेव आणि.. दूध कोल्ड्रिंक' आठवले :-)
:)
छान, ट्रेनचा रंग मस्तय, लालभडक! बर्फात तर आणखीनच उठून दिसत असेल.
जर्मनीच्या प्रतीक्षेत.
प्रवासवर्णन छानच आहे आणि फोटो सुद्धा सुंदरच आहेत.
बर्फाचे फोटो बघूनच बरं वाटलं. इथे नुसतं शिजायला होतंय.
आल्प्स आवडला!!
:)
छान भटकंती. पॅरिस चे प्रवासवर्णन जास्त आवडले.
आवडला हाही भाग. चित्रे देखील मस्त. धन्यवाद.
फोटो छान आहेत.छान सफर घडवली.
आता वसंतामधील स्विट्झर्लंड आणि यशचोप्रा तळे/Lake पहा:
http://www.youtube.com/watch?v=gRwKOaoA33Y#t=49
आज जेपी ला मागे टाकून मी