युरोपांश - स्विट्झर्लंड
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं.
पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते. कायमस्वरुपी वस्तीला असलेली भिकार्यांची कुटुंबं, दूरुनच नुसत्या वासाने ओळखू येणारी प्रसाधनगृह, काय बोलताहेत हे कळू नये असे ध्वनीक्षेपक आणि रांगेत ताटकळत असणार्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करून गप्पा मारणारे कर्मचारी ह्या आठवणी आहेत. गॅरे दे लिऑन स्थानकात शिरल्याबरोबर समोरच आरक्षण कक्ष, तिकिटे विकत घ्यायचे कक्ष, पर्यटन माहिती केंद्र, प्रसाधन गृह आणि गाड्यांची स्थिती दर्शविणारे मुख्य इलेक्ट्रॉनिक फलक (इंडिकेटर्स) ह्यांची माहिती देणारे, नजरेत भरणारे, फलक पाहावयाला मिळतात. तुम्हाला जिथे जावयाचे असेल (स्थानकावर) तिथपर्यंत हे माहिती फलक तुमची साथ करतात. आरक्षणाचा फलक पाहात पाहात मी आरक्षण कचेरीच्या दाराशी पोहोचलो. माझा युरेल पास दाखवून तो कार्यान्वित करण्याची विनंती केल्यावर तिथल्या महिलेने (हो सर्व आरक्षण केंद्रांवर प्रवाशांच्या आरक्षण विषयक समस्या सोडविण्यासाठी महिलाच होत्या.) तात्काळ माझा पास कार्यान्वित करून दिला. मला स्विट्झर्लंडच्या 'ल्युझर्न' शहरी जायचं होतं. पण अति आत्मविश्वासाने किंवा कशाने असेल माझा गंतंव्य स्थानाचा उच्चार 'लुसान' असा झाला. बाईंनी मला आरक्षणाचे तिकीट हाती ठेवले. गाडी तासाभराने होती. बाहेर स्थानकावर येऊन मोकळ्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. विचार करीत होतो बरे झाले वेळेवर पोहोचलो. आरामात गोष्टी पार पाडता आल्या. उगा धावपळ झाली नाही. समोरच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर गाड्यांची नांवे, गंतव्य स्थान, वेळ आणि फलाट क्रमांक दाखवले होते. २० मिनिटे आधी फलाट क्रमांक दर्शविला जातो. आमच्या गाडीचा फलाट क्रमांक केंव्हा लागतो हे पाहात बसलो असताना एक लक्षात आलं मला जायचं होतं त्या शहराचं नांव आणि आरक्षण तिकिटावरील शहराचं नांव ह्यात किंचित फरक होता. मनांत शंकेची पाल चुकचुकली. पुढे जाऊन गोंधळ होऊ नये म्हणून पुन्हा एकदा त्या आरक्षण महिलेकडे गेलो आणि माझी शंका तिला बोलून दाखवली. तेंव्हा 'ही दोन वेगळी शहरं आहेत, तुम्हाला कोठे जायचे आहे?' असे तिने विचारल्यावर मी तिला माझ्या जवळील, माझ्या मित्राने दिलेले, माहिती पत्रक दाखविल्यावर तिने मला 'धीस इस 'ल्युझर्न', यू सेड 'लुसन'' असे म्हणून माझी चुक माझ्याच गळ्यात बांधली. तिची माफी मागून नवे आरक्षण मिळविले आणि परतलो. अजून २५ मिनिटे वाट पाहणे होते.
वेळेवर प्रवासाला सुरुवात झाली. डब्यात अवजड बॅगांसाठी वेगळे सामानकक्ष होते. तिथे आमच्या बॅगा ठेवून स्थानापन्न झालो. गाडी अत्यंत स्वच्छ, प्रशस्त होती. प्रवास अतिशय सुखाचा होता. रुळांचा खडखडाट नाही, जास्त हेलकावे नाहीत पण वेग प्रचंड होता. ह्याची तुलना भारतातल्या 'शताब्दी एक्स्प्रेस'शी होऊ शकेल. समोर टिव्हीच्या पडद्यावर पुढच्या स्थानकाचे नांव, आत्ताचा गाडीचा ताशी वेग, थोड्याफार त्यांच्या सोयी सुविधांची जाहिरात वगैरे चालू होते. स्विट्झर्लंडचे पहिले दर्शन बर्फाच्या अस्तित्वाने अधोरेखित झाले. गॅरे दे लिऑन ते बॅसल ते ल्युझर्न ते एंजलबर्ग असा प्रवास झाला. एंजलबर्गला आधीही एकदा भेट दिलेली असल्याने चालण्याफिरण्यात सराईतपणा होता. स्थानका बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्यास निवासाचा पत्ता दाखविल्याबरोबर त्याने 'माहित आहे' अशा अर्थी मान हलवून सामान त्याच्या टॅक्सीच्या सामानाच्या कप्प्यात ठेवले. फक्त पाचच मिनिटात आम्ही टेकडीवरच्या आमच्या निवासास पोहोचलो.
दुसर्या दिवशी उजाडल्यावर खिडकितून बाहेर पाहिलं आणि धन्य धन्य झालो. दूरवर डोंगराच्या शिखरापासून उतरणीपर्यंत पसरलेलं बर्फ थेट आमच्या निवासाच्या खिडकीपर्यंत आलं होतं.


दूरवर दिसणार्या एंजलबर्ग खेड्याच्या आपण प्रेमात पडतोच पण एवढ्यात जाणवत आपल्या आजूबाजूला मस्त बर्फाळ गालीचा पसरला आहे आणि आपण वेड्यासारखे पाहतच राहतो.









वाचने
12893
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
आज जेपी ला मागे टाकून मी
In reply to आज जेपी ला मागे टाकून मी by खटपट्या
मस्त ट्रिप काका.
@ खटपट्या वेलकम टू " मी पयला क्लब "=))छान !पण या वेळी वर्णन जास्ती
In reply to छान !पण या वेळी वर्णन जास्ती by कंजूस
हो ना! मलापण तसच वाटलं.
In reply to हो ना! मलापण तसच वाटलं. by स्पंदना
+१
एक आटोपशिर दम मिळाला असेल
छान फोटो.
मस्त..
धन्यवाद.
पेठकरकाका मस्त चाल्लीये सहल,
भरपूर मजा आली वाचताना..
आणखी एकदोन आयफेल टॉवरचेही..
फोटोतला बर्फ बघितल्यावर खुप
वॉव सींपली ग्रेट
लिखाण वाचले. आवडले. आमचीही
वाचतीये. सफर आवडतीये.
लहानपणी मला हिमालयाच्या आसपास
झकास!
प्रवासवर्णन छानच आहे पण आत्ता
In reply to प्रवासवर्णन छानच आहे पण आत्ता by पाषाणभेद
गणेशा फिव्हर असं म्हणतात याला
In reply to गणेशा फिव्हर असं म्हणतात याला by रेवती
हा तेच म्हणणार होतो. आता फोटो
मस्त
फोटो छान आहेत.
काकांच्या पाककृतीचे अस्मादिक
तू अनुभवलेलं 'खच्चून बर्फ'
सहल मस्त चालली आहे
मस्त सफर एकदम ... पुढच्या
मस्त ..हा हि भाग आवडला ...
In reply to मस्त ..हा हि भाग आवडला ... by आरोही
+++१११
झक्कास प्रवास वर्णन.
प्रभाकरजी,
फोटो पाहुनच समाधान करुन घेत
झकास भटकंती!! तुमचं
छान प्रवासवर्णन आणि फोटो
छान, ट्रेनचा रंग मस्तय,
प्रवासवर्णन छानच आहे आणि फोटो
मस्तच!
आल्प्स आवडला!!
छान भटकंती. पॅरिस चे
सुंदर ....
छान सफर घडवली.