Skip to main content

फैसला

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 12/04/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव
लेखनविषय:

वाचने 1599
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे -दिलीप बिरुटे

मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे
हा आवडला.