Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्मिता श्रीपाद on Tue, 04/08/2014 - 12:11
केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय.... आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ? हे पण कळलं नसेल तिला.... रोज भेटणारे बसमधले काका आपल्याशी असे का वागले हे पण कळलं नसेल..... कसं सहन करायचं ते तिनं..... चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढवलेल्या प्रसंगाने अस्वस्थ झालेय मी कालपासुन.... माणसं इतकी विक्रूत का होत असतील.....? कालच्या ईसकाळ मद्धे मी ही बातमी वाचली....आणि मनात खुप प्रश्ण निर्माण झाले..... काल घरी गेल्या गेल्या माझ्या ३.५ वर्षाच्या मुलीला पोटाशी घेउन बसले.....डोकं सुन्न झालं होता.....माझ्या ईतक्याश्या पिल्लाला मी हि घटना समजावुन सांगु शकत नाही..... असे लोक समाजात असतील तर आमच्या मुलीला आम्ही कसं जपायचं.....? कुठल्या भाषेत समजावायचं इतक्या चिमुकल्यांना....? अनोळखी माणसांशी बोलु नका , त्यांच्याकडुन काही घेउ नका हे तर कधीच सांगुन आणि शिकवुन झालय....पण ओळखिची माणसं पण असं काही वागत असतील तर ? अशावेळी काय शिकवायचं मुलांना.....? ३-४ वर्षांच्या छोट्या मुलांना स्वतःचा बचाव वगैरे करण कसं काय जमेल....? मग आम्ही त्यांना कसं समजावणार जपुन रहायला....? आणि कोणाकोणापासुन ? मिपा वर विविध क्षेत्रातले तज्ञ आहेत.... छोट्या मुलांना या बाबतीत सावध रहायला आम्ही कसं शिकवु याबद्दल कोणी मार्गदर्शन करेल का प्लीज ? - एक अस्वस्थ आई....
  • Log in or register to post comments
  • 34074 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on Wed, 04/09/2014 - 04:35

Permalink

काल वाचल्या पासून संतापाने मन

काल वाचल्या पासून संतापाने मन भरुन गेलय. अश्या परिस्थीतीत काही न लिहीणच उत्तम म्हणुन गप्प बसलेय. कारण आताश्या कश्याबद्दल बोलायच म्हणजे लगेच नाही नाही ते आरोप अन लात मारायची प्रवृत्ती बळावलेय. स्मिता भावना समजल्या. मनात त्याच भावना आहेत. आई म्हणुन मुलीची तशीच मुलाचीही काळजी वाटते. मी माझ्या गरजा कमी करुन मुले झाल्यापासुन घरीच रहाते. काय नाही जाता येणार हॉलीडेजना. नाही वापरायला मिळणार गॅजेटस. मुलांनाही मी याची सरळ जाणीव करुन देते की आपण सिंगल पर्सन अर्निंग फॅमिली आहोत. आता मुलगा थोडा मोठा होतोय. आता बघेन काही करता येते का.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 04/09/2014 - 05:33

Permalink

आपणही कितीही गोड मूल असले तरी

आपणही कितीही गोड मूल असले तरी दुरुनच त्याच्याशी बोलण्याची शपथ घेऊ या आणि तशीच संस्कृती निर्माण करु या म्हणजे मुलांना अनावश्यक स्पर्शाबद्दल लगेच कळेल. काही लोक गोड मूल दिसले की पापे घेणे, जवळ घेणे असे प्रकार करतात. भावना कितीही शुद्ध असली तरी असे करणे टाळणेच उत्तम. मुलांना तशी सवय नसणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 04/09/2014 - 06:39

Permalink

संतापजनक कृत्य

लेखात मांडलेल्या काळजीयुक्त भावनांशी सहमत. प्रतिसादांतून चांगली चर्चा झाली आहे. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोंडस लहान मुले दिसतात. त्यांना आम्ही दुरूनच हाय हॅलो करतो. त्यांचा व त्यांच्या पालकांचाही त्याला प्रतिसाद मिळतो. पण इथल्या संस्कृती / पद्धतींनुसार चुकूनही जवळ जात नाही. अंगवळणी पडलेल्या या सवयीमुळे भारतीय मंडळी दिसली तरी या आचरणात फरक पडत नाही. नाईलाजाने का होईना हिच पद्धत भारतातही मोठ्या प्रमाणावर पाळली जाऊ लागणे हेच इष्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 04/09/2014 - 07:42

Permalink

असाच प्रकार ठाण्यामधील एका

असाच प्रकार ठाण्यामधील एका शाळेत घडला आहे. आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणे वगैरे सर्व तसच घडले आहे. काय करावे सुचत नाही. माझही मुलगी हि त्याच शाळेत जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 04/09/2014 - 09:22

In reply to असाच प्रकार ठाण्यामधील एका by खटपट्या

Permalink

माझे व्यक्तीगत मत

थोड्या फार प्रयत्नाने शक्य असल्यास शाळा बदलावी. कदाचित सध्याची चांगलीही असेल, अधिक सुरक्शीततेची शाळा काळजीही घेत असेल पण ऑफीसात काम करताना मन मात्र चिंतेने व्यस्त राहण्या पेक्षा घाई न करता अधन मधन दुसर्‍या शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून शाळा बदलण्यास हरकत नसावी. तसे शक्य नसेल तर सध्याच्या शाळेच्या व्यवस्थापनात स्वतः किंवा कुटूंबीयांनी आणि इतर ओळखीच्या पालकांनी वेगवेगळ्या प्रकारे सहभाग वाढवावा जेणे करून पालकांचा दबदबा वाढेल. आणि केवळ काळजी करण्या पेक्षा काळजी घेतल्याचे समाधान वाढेल ते महत्वाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 04/09/2014 - 09:37

In reply to माझे व्यक्तीगत मत by माहितगार

Permalink

धन्यवाद माहितगार

धन्यवाद माहितगार
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Fri, 04/11/2014 - 12:31

In reply to असाच प्रकार ठाण्यामधील एका by खटपट्या

Permalink

शाळेचे नाव द्या कि . लाजू /

शाळेचे नाव द्या कि . लाजू / घाबरू नका .. एखादेवेळेस हा मेसेज शाळे पर्यंत पोचून शाळा सुधारेल पण.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 04/11/2014 - 22:43

In reply to शाळेचे नाव द्या कि . लाजू / by अभिजित - १

Permalink

सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे

सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 04/11/2014 - 22:47

In reply to सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे by खटपट्या

Permalink

मला वाटत होतं तुम्ही नाही

मला वाटत होतं तुम्ही नाही देणार. अजूनही माझं मत आहे संपादित करुन घ्या अन नावे द्यायचे टाळा. बाकी तुमची मर्जी :(
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 04/09/2014 - 09:11

Permalink

शाळा निवड..

महत्वाचे मुद्दे: घरापासून लांब असेल पण नावजलेली आहे म्हणून अश्या शाळेत पाठवू नका. जर मोठे मूल त्या शाळेत अगोदरच (किमान १०-१२ वयाचे) असेल तर्च छोटुल्याला त्याच शाळेत पाठवा. घरापासून १ते२ किमि परिघात शाळा असावी ईतर बाल्-विकास अतिरिक्त "छंद्-आवड" वर्ग लावून जोपासता येतात. शाळा लांब असेल तर शाळेशी/शिक्षकांशी वारंवार संपर्क राहत नाही. यात मतमतांतरे अशू शकतील्.पण मी हे केले आहे. एक बे*जबाबदार पालक (बे*-२ मुलांचा)) ईतरांचे सजगतेचे विचार वाचण्यास ऊत्सुक (छोट्या परीचा काळजी बाबा)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/09/2014 - 10:19

Permalink

यात नविन ते काय ? असे अतिशय

यात नविन ते काय ? असे अतिशय खेदाने विचारावेसे वाटते ! :( अशा लोकांना तुडवुन तुडवुन ठार मारणे हाच काय तो उपाय वाटतो. नाशकात गुंडांच्या त्रासाने विटलेल्या जनतेने असेच ठेचुन मारले होते. तुम्ही अशा विकॄत माणसांना नराधम म्हणता ना ? मग त्यांना दया-माया दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 04/09/2014 - 10:28

Permalink

आजही वर्तमानपतात बातमी आहे की

आजही वर्तमानपतात बातमी आहे की प्रचार करणार्‍या जीपखाली चिरडून ५ वर्षांची मुलगी ठार आणि अजून पिल्लू जखमकार्जीपमधील कार्यकर्ते मद्यधुंद होते!:अशा बातम्या वाचूनही संताप होतो आहे! इतकी बेपर्वाई!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना मन्दार on Wed, 04/09/2014 - 11:46

Permalink

६ बलात्काराचे गुन्हे

काल पुण्यात सहा बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.. खूप सन्ताप आणि दु़ख़़् होतय हे वाचुन :-( कुठे चालला आहे पुणे?? आणि कुठे चालला आहे आपला देश?? :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/09/2014 - 12:20

Permalink

आपल्या देशात माणसांना सोडुन

आपल्या देशात माणसांना सोडुन इतर सर्व गोष्टींना किंमत आहे, हे सत्य जर तुम्हाला उमजले नसेल तर तुम्ही कुंभकर्णा सारख्या गाढ निद्रेत आहात असे समजा. अराजकता अराजकता म्हणजे नक्की काय हे अश्या आणि रोजच्या अनेक बातम्या वाचुन सुद्धा तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही धॄयराष्ट्रा पेक्षा जास्त आंधळे आहात असे खुशाल समजा. जाता जाता :- पुढचे कारगिल अंदमान-निकोबार मधे घडेल असे कोणी कोणाला सांगितले हे जाणुन घेण्यासाठी गुगलबाबाला विचारणा करुन पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 04/10/2014 - 08:44

Permalink

अधिक माहिती करीता

एक संबंधीत दुवा : नॅशनल कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स
  • Log in or register to post comments

Submitted by _मनश्री_ on गुरुवार, 04/10/2014 - 14:46

Permalink

........

माझा धाकटा भाऊ ज्या शाळेत जायचा तिथे एक व्हॅन चालक लहान मूली आणि मुलांशी वाटेल ते चाळे करायचा ,मांडीवर घेऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा ,मिठया मारायचा आणि बरच काही ते सुध्दा ओपनली पण शाळेच सम्पूर्ण दुर्लक्ष त्यामुळे मी रोज त्याला आणायला आणि सोडवायला जायचे आणि दुसर्या वर्षी आम्ही त्याची शाळा बदलली अशा नराधमांना फक्त फाशी ही एकच शिक्षा असली पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 04/10/2014 - 16:59

Permalink

एक प्रश्नः-

एक प्रश्नः- इथे अवांतर वाटत असेल तर दुसर्‍या एखाद्या संबंधित धाग्यावर हलवावा.. माझा मुलगा अत्ता पावणे दोन वर्षाचा आहे. तो एका पाळणाघरात जातो त्यामुळे तसाही दिवसभर लहान मुलांमध्ये असतो. तिथे दर महिन्याचा अभ्यासक्रम असतो. त्यानुसार मुलांना त्या महिन्यामधल्या विशेष गोष्टी (सण, ऋतु इ.), ठराविक आकडे, गाड्या, अवयव इ ची ओळख, चित्रकला, हातांचे ठसे इ मधुन चित्र बनवणे, बागेत खेळायला जाणे, गाणी म्हणणे इ शिकवतात.. सध्या माझ्या मुलाला १-१० आकडे, सगळे वार, पुस्तकातली चित्रे वगैरे ओळखणे, गाण्यातल्या १-२ ओळी म्हणणे जमते.. ३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का? विचारण्याचे कारण की मुलगा कंपनीच्याच पाळणाघरात जातो, त्यामुळे माझ्या सोबत येतो आणि जातो.. पण त्याला ह्या व्यतिरिक्त अजुन दुसर्‍या शाळेत घातले तर (कदाचित) मला त्याला व्हॅन / बस लावावी लागेल.. इतक्या लहान मुलाला असे शाळेत पाठवणे मला पटत नाही. आणि २ तास त्या शाळेत नक्की तो काय वेगळं शिकणारे ते कळत नाही.. जे काही अभ्यासक्रमात फरक असतील ते जर पालकांनी घरी शिकवुन भरुन काढले तर मुलाला उशीरा शाळेत घालता येते का? म्हण्जे हे बस मधुन इतक्या लहान वयात पाठवणे टाळता येईल..
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 04/10/2014 - 17:11

In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर

Permalink

माझ्या अंदाजाप्रमाणे काही

माझ्या अंदाजाप्रमाणे काही अडचण येऊ नये. शाळेत घालायचं सर्कारी वय "चार पूर्ण" आहे. त्याआधी केज्याबिज्या निव्वळ टाईमपास असतो. अभ्यासक्रमात फरक वगैरेचं लोड इतक्यात नका करुन घेऊ पिरातै. एकाच गोष्टीची खात्री करा. शाळांना केजी जोडून असते. त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात. "चांगली" शाळा हा निकष असेल तर त्या शाळेत केजीत घालणं चांगलं.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 04/10/2014 - 17:16

In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे काही by आदूबाळ

Permalink

त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश

त्यामुळे थेट पहिलीत प्रवेश मिळण्याचे वांदे असतात
हं हेच.. हाच प्रॉब्लेम मला वाटत होता.. पण त्यातही ट्विस्ट आहे.. माझी कंपनी २-३ वर्षांसाठी दुसर्‍या लोकेशनला जात आहे.. जे माझ्या घरापासुन १५ किमी वर आहे. कंपनीच्या बसने मी मुलाला स्वतःसोबतच नेऊन दिवसभर तिथेच पाळणाघरात ठेवु शकते.. आता जर शाळेत घालायचं झालं तर कोणत्या घालावं? घरा जवळच्या (कारण अल्टीमेटली कंपनीसुद्धा ३ वर्षांनी घराजवळच येणार आहे..)? की सध्या जिथे स्थलांतर होणार आहे तिकडच्या? (पण मग २-३ वर्षांनी परत शाळा बदलावी लागणारच..)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/10/2014 - 18:18

In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर

Permalink

आत्ता आणि पुढे काही वर्षे

आत्ता आणि पुढे काही वर्षे आईवडीलांची सोय, बाळाची सुरक्षितता याशिवाय इतक्या लहान वयात तरी काहीच महत्वाचे नाही. अभ्यासाची इतक्यात काळजी करावी असे वाटत नाही. आपण बाळापर्यंत १० मिनिटाच्या अंतरात असणे फायदेशीर आहे. नेहमीच शक्य नसते पण तुला शक्य आहे तर त्याचा फायदा घ्यावास असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 04/10/2014 - 18:26

In reply to आत्ता आणि पुढे काही वर्षे by रेवती

Permalink

माझंही हेच मत आहे रेवती..

माझंही हेच मत आहे रेवती.. कारण अभ्यास काय घरातही होईल. तेवढ्यासाठी इतक्या लहान मुलाला उगाच २ तास बस मध्ये घालवायला लावणे असुरक्षित आणि मुलाला दमविणारे आहे. माझा चांगलीच शाळा (म्हणाजे बेस्टच हवं..वाला) अट्टाहास नाही.. फक्त पुढे जाऊन अ‍ॅडमिशनला खुप त्रास होईल का अशी शंका वाटते..
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 04/10/2014 - 18:34

In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर

Permalink

धन्यवाद...माझ्या मनातील

धन्यवाद...माझ्या मनातील प्रश्न विचारला नेमका.
३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का?
चर्चा वाचत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 04/12/2014 - 00:27

In reply to धन्यवाद...माझ्या मनातील by शिद

Permalink

वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे..

इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 04/12/2014 - 00:33

In reply to वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे.. by बहुगुणी

Permalink

मला देखिल हाच प्रश्न पडलाय.

मला देखिल हाच प्रश्न पडलाय. जरा समज आणि ताकद येइपर्यंत मुलांना एकट्याना कुठेही पाठवणं नको होतं.. शिवाय निदान लहानपणीतरी मुलांना मोकळेपणानी घरी खेळू द्यावं असं पण वाटतं. त्यांची दप्तरे बघवत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 04/12/2014 - 00:43

In reply to मला देखिल हाच प्रश्न पडलाय. by कवितानागेश

Permalink

माझ्या एका मैत्रिणीने आपल्या

माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलासाठी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. तिच्याशी बोलताना समजलं की पुण्यामध्ये बर्‍याचजणांनी सद्ध्या हा पर्याय निवडला आहे आपल्या पाल्यांसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Sat, 04/12/2014 - 01:04

In reply to माझ्या एका मैत्रिणीने आपल्या by यशोधरा

Permalink

अधिक माहिती मिळू शकेल का?

म्हणजे होम स्कूलिंग साठी कोठे नोंदणी करावी लागते का? अभ्यासक्रमाचे तपशील कोठे आणि कसे ठरतात? परीक्षा कोठे देणार? पालकांचा अथवा जो कोणी शिक्षक आहे त्यांची काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता हवी का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 04/12/2014 - 01:04

In reply to माझ्या एका मैत्रिणीने आपल्या by यशोधरा

Permalink

चर्चा भरकटत आहे...

पण होम स्कूलिंगचा पर्याय निवडणार्‍यांचे अभिनंदन व कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Sat, 04/12/2014 - 02:16

In reply to चर्चा भरकटत आहे... by आत्मशून्य

Permalink

मान्य आहे, धागा भरकटायला नको.

पण होम स्कूलिंगचा पर्याय निवडणार्‍यांचे अभिनंदन व कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 04/12/2014 - 06:18

In reply to मला देखिल हाच प्रश्न पडलाय. by कवितानागेश

Permalink

त्यांची दप्तरे बघवत नाहीत.

त्यांची दप्तरे बघवत नाहीत. मलाही ती दप्तरे बघवत नाहीत. आजच खांदे दुखण्याची तक्रार आमच्याघरी आलीये.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 04/14/2014 - 13:17

In reply to वर विचारलेलाच प्रश्न परत विचारतो आहे.. by बहुगुणी

Permalink

नाही.. मला होम स्कुलींग

नाही.. मला होम स्कुलींग करायचं नाही.. माझा मुलगा शाळेत जायला हवाच आहे.. कारण शाळेत मुलं अजुन मुलांना भेटतात.. त्यांच्यात जास्त रमतात.. रोज नियमित कुठेतरी ठरल्या वेळेला जाण्याची सवय होते.. आणि जगात आपण एकमेव मुल नाही ह्याची जाणिव होते! माझा मुद्दा असाय की माझा मुलगा तसाहि ८ तास पाळणाघरात असतो.. तिथेही त्याला अभ्यासक्रम आहेच.. कदाचित शाळेएवढा भरीव नसेल पण बेसिक शिकवत आहेतच.. मग आणखिन "शाळा" म्हणुन वेगळ्या ठिकाणी पाठवायची खरच गरज उरते का? अभ्यासक्रमातला फरक मी घरी भरुन काढु शकेन आणि शाळेचे बाकी फायदे पाळणाघरात आहेतच.. होम स्कुलिंग बद्दल मितान सांगु शकेल..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/10/2014 - 18:27

Permalink

नुकत्याच झालेल्या

नुकत्याच झालेल्या पेनसिल्वेनिया स्टॅबिंग केसमुळे कालची संध्याकाळ मुलाला इंन्स्ट्रक्षने देण्यात गेली. शिवाय माझा मुलगा व त्याचा मित्र एकदा बंदुकीबद्दल (सहज) बोलत होते तरी ते ऐकून एकाने तक्रार केली व आम्हाला शाळेकडून तसे कळवण्यात आले होते. त्यावेळी लगेच पोहोचता येण्याचे मह्त्व समजले. नंतर माझा मुलगा व त्याच्या मित्राला ३ दिवस आपापल्या आईवडीलांनी शाळेत सोडावे असे सुचवण्यात आले. त्यामुळे असे बोलणेही लोकांना किती घाबरवू शकते हे त्यांना समजले. आज त्याच्या प्रॉजेक्टचा काही भाग शाळेच्या मैदानावर जाऊन करायचा आहे तरी मला धाकधुक वाटत आहे. मागल्या वर्षी कनेटिकट येथे बंदुकीने विद्यार्थ्यांची टीनएजरने केलीली कत्तल, काल परवाचे स्टॅबिंग अशाने शाळेकडून, समाजाकडून आपण, आपल्याकडून मुलांनी, मुलांकडून आपण/ शिक्षकांनी नक्की काय अपेक्षा करावी हेच समजेनासे होते. आता पिक अपला आईवडील पोहोचण्यापूर्वीचा थोडा वेळ मुलांनी शाळेच्या आत उभे राहणे सुरक्षित की बाहेर? काही सुचत नाही. हे असले विचार डोक्यात होते म्हणून पहाटेच दचकून जाग आली.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 04/10/2014 - 18:39

In reply to नुकत्याच झालेल्या by रेवती

Permalink

बापरे.. इतकी भीती आहे तिकडे

बापरे.. इतकी भीती आहे तिकडे पालकांच्या मनात... अवघड आहे असं तर मग..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/10/2014 - 18:45

In reply to बापरे.. इतकी भीती आहे तिकडे by पिलीयन रायडर

Permalink

सतत भीतीच असते असे नाही पण

सतत भीतीच असते असे नाही पण काही घडले की बरेच दिवस काळजी करण्यात आणि घेण्यात जातात. लहान मुले निदान आपल्या नजरेसमोर असतात पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 04/10/2014 - 18:48

In reply to सतत भीतीच असते असे नाही पण by रेवती

Permalink

+१

पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.
खरं आहे. कालच मुलगी म्हणत होती की १६ वर्षाची झाली की ती कार शिकणार्/चालवणार वगैरे. मी एकदम काळजीची प्रतिक्रिया दिली. त्यावर ती म्हणते - Mama, you cannot keep me kid all the time. मी म्हटलं - Unfortunately not :(
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 04/10/2014 - 18:56

Permalink

मूखवटे आणि चेहरे

३० एक वर्षापूर्वी मी आणि मा़झे काही मित्र एका 'सिंहांच्या' मंडळाचे नाममात्र वर्गणी भरुन 'छावा' सदस्य झालो. वैद्यकिय शिबिरे, अपंगांना चाकांची खुर्ची वाटप अशी अनेक सामाजिक कार्यक्रमात आम्ही छावे भाग घ्यायचो. सिंह् सदस्य हे समाजातील सर्व थरातील प्रतिष्ठित व्यक्ति होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मजा वाटत होती. आजुबाजूचे आमच्याकडे आदराने बघायचे. एकदा एका अनाथाश्रमाला मदतीच्या कार्यकामाला आम्ही गेलो होतो, अनाथाश्रमातील मुलींनी सांस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम आटोपल्यावर आश्रमातील महिला कर्मचार्याबरोबर आमचे 'सिंह' सभासद एका खोलीत मिटिंगसाठी गेले व दरवाजा बंद केला . थोडया वेळाने एका महिलेबरोबर आश्रमातील १०-१२ तरुण मुली त्याच खोलीत शिरल्या व दरवाज्या आतून बंद केला. बराच वेळ झाला तरी मिटिंग संपत नव्हती, आमच्यातील एकाने कुतूहल म्हनून त्या खोलीकडे गेला व दरवाज्याच्या फटितून आत बघितले, त्याने हळुच आम्हाला खुणेने बोलावले, आम्ही फटितून जे काही बघितले ते पाहुन आम्हालाच शरम वाटली. जे हात एरवी सराईतपणे शस्त्रक्रिया करत तेच हात आज कोवळ्या शरिरावरुन फिरत होते. आश्रमाच्या मदतीच्या बदल्यात तेथील महिला व्यवस्थापक मंडळाने कोवळ्या कळ्या कुस्करायला मदत केली. त्या मुली सुरक्षित हातात नव्ह्त्या. आम्ही सर्वकाही चोरुनच बघितले होते, व जाब विचारण्याईतके 'मोठे' ही झालो नव्हतो. हळूहळू आमच्यातील एक एक छावा मंडळ सोडू लागला शेवटी फक्त सिंह्च उरले, सिंह कसले लांडगेच होते ते. पालकांच्या पंखाखाली जी मुले सुरक्षित नाहीत तेथे अनाथ मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोशावर सोपवावी ?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 04/10/2014 - 18:58

In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे

Permalink

अहो .. वाचुन धडधडतय मला..

अहो .. वाचुन धडधडतय मला.. तुम्ही का नाही तक्रात केलीत?? का नाही पोलीसात कळवलत? किती भयंकर गोष्ट आहे ही.. मला लिहीतानाही त्रास होतोय..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/10/2014 - 19:02

In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे

Permalink

...

...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 04/11/2014 - 22:50

In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे

Permalink

बापरे. खूपच भयानक आहे.

बापरे. खूपच भयानक आहे. तुम्हाला तो लांडग्यांचा क्लब माहित असेल तर अजून सुद्धा तुम्ही त्यांचा बुरखा फाडू शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 04/12/2014 - 00:24

In reply to बापरे. खूपच भयानक आहे. by खटपट्या

Permalink

Absolute must!

तुमची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना/ महिला आयोगाला कळवा; ती कळवल्याने आजही तुम्ही काही अश्राप स्त्रियांना वाचवू शकता (ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल!) (त्या 'संस्थे'चं नाव इथे जाहीर करण्याचं टाळा; मिपा व्यवस्थापनाला विनाकारण बदनामीकारक मजकूर पसरवण्याबद्दल गोत्यात येऊ शकेल असं वाटतं.)
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sun, 04/13/2014 - 16:33

In reply to Absolute must! by बहुगुणी

Permalink

ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल

तुमचे म्हणणे मान्य आहे. ३० एक वर्षापुर्वीची ही घटना. आमच्यातील एका मित्राला समाजसेवेची आवड होती, तो घुसला त्याने आम्हालाही खेचले. आमच्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते कमी व माझ्यासारखे खोगिरभरती कार्यकर्ते जास्त होते. मोठ्या होटेलातील मिटिंग व तेथिल मेनुचे आकर्षण अधिक. त्या वयात अशा घटना हाताळण्याचे कौशल्य निदान माझ्याकडे तरी नव्हते. परंतु १० वर्षापुर्वी आमच्या रहिवासी सोसायटित एकाने अनधिकृत ट्रांसपोर्ट सुरु केले होते. त्यांच्या कामगारांमुळे सोसायटितील माहिलांना त्रास होत असे. तक्रार करुनहि सोसायटीने कोणतीहि कारवाही केली नाहि. अखेर मी व माझ्या वडिलांनी एके दिवशी त्याच्या कर्मचार्यांना शिवागीळ करुन धमकावले. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. व तेथेच मिटले. व ते कार्यालय कायमचे बन्द झाले. सोसायटितील महिला सुरक्षित झाल्या. त्या पापातून थोडं तरी मुक्त झालो. परंतू अपराधि भावना कायम आहे. तुम्ही जाणीव करुन दिल्यापासून ती अधिकच वाढली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 04/12/2014 - 23:29

In reply to मूखवटे आणि चेहरे by मार्मिक गोडसे

Permalink

हम्म असे सिंह अन सिहींणी...अन छावे.

रच्याकने कंच्या गावच्या कट्याची गोश्ट हाये ही ? न्हाइ लै परतिषीस्टीत लोग्जस या कट्याचे सडस्य गावोगावी असतात म्हणौन इचारले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 04/11/2014 - 09:09

Permalink

आपल्या देशातील *** राजकारणी

आपल्या देशातील *** राजकारणी ! बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी-मुलायम यालाच म्हणतात "यादवी माजणे". माझा आपल्या देशातील राजकारण्यांवर राग या आणि अशाच अनेक कारणांसाठी आहे.ही राजकारण्यांची हरामखोर अवलाद आपल्याच देशातील जनतेचे आणि देशाचे लचके तोडण्यास बसलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 04/11/2014 - 10:29

In reply to आपल्या देशातील *** राजकारणी by मदनबाण

Permalink

फक्त मतांचं राजकारण

आरोपी (गुन्हेगार) एका विशिष्ट धर्माचे असल्याने हे सेक्युलर मसीहा असले बोलत आहेत. मुल्ला यम सिंगांचा इतिहास बघता ते स्त्रियांबद्दल सहानुभूतीसुद्धा बाळगून कधीच राहिले नव्हते. त्यांच्या स्वतःच्या २ बायका अनेक वर्षे एकाच वेळी जिवंत होत्या. या लोकांना सामान्य लोकांचे कायदे लागू होत नाहीत बहुतेक. त्यांची पहिली पत्नी प्रदीर्घ मानसिक आजरानंतर कोणत्याही उपचारांशिवाय २००३ साली वारली. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या? :(
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 04/11/2014 - 23:01

In reply to फक्त मतांचं राजकारण by पैसा

Permalink

?

कुठल्या बलात्कार खटल्यातील आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत? (मुलायमची प्रतिक्रिया मूर्खपणाची आहे हे अधोरेखित करतो.) राजकारणी लोकांच्या बायकांबाबत सहमत. मुलायम-करुणानिधीसारखे दोनदोन बायका करतात किंवा इतर नेत्यांसारखे असलेल्या बायकांना परित्यक्ता करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 04/11/2014 - 23:34

In reply to ? by आजानुकर्ण

Permalink

सगळे सारखेच

मतांसाठी कायपन! आणि खाजगी वागणूक कशी असेल ते मात्र कोणी विचारू नये. सामान्य लोकं बसतात भांडत, अमका पक्ष बरा आणि तमका नेता वाईट म्हणत. :(
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 04/11/2014 - 23:42

In reply to सगळे सारखेच by पैसा

Permalink

मान्य

मूळ आक्षेप विशिष्ट धर्माचेच लोक जास्त बलात्कार करतात व मुलायम अशा धर्मीयांची मते मिळवू पाहण्यासाठी बलात्काराचा गुन्हा सौम्य करु पाहतो या (व अशा सौम्यीकरणाला विशिष्ट धर्माचे लोक बळी पडून व मतेही देतील असे गृहितक असणाऱ्या) आरोपाला आहे. पुण्यातील मुलीसंदर्भात झालेला प्रकार किंवा मुंबई/दिल्लीतील घटना यात या एका विशिष्ट धर्माचेच लोक जबाबदार होते असे आढळले नाही. खाजगी वागणूक कोणाचीही विचारु नये. मोदी असो वा मुलायम हे मान्य.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 04/11/2014 - 19:41

Permalink

कठीण आहे

http://www.cnn.com/2014/04/11/world/europe/vatican-pope-sex-abuse/index.html?hpt=hp_t2 चर्चच्या पाद्र्यांनी लहान मुलांचे जे लैंगिक शिषण केले, त्याबद्दल पोपने माफी मागितली व हेही सांगीतले की गुन्हेगारांना शिक्षा होइल व असे प्रकार झाल्यास चर्चवर निर्बंध घातले जातील, यापुढे चर्च कर्मचार्‍यांना ट्रेनिंगही देण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अगोचर on Sat, 04/12/2014 - 03:00

Permalink

सहमत (आणि अस्वस्थ)

लहान मुलामुलिंना काय शिकवावे आणि कसे शिकवावे या बद्दल माहिती इथे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/12/2014 - 08:34

Permalink

काळजी करणे आणि काळजी घेणे यातील फरक

या धाग्यावर आलेले काही प्रतिसाद 'काळजी घेणे' पेक्षा 'काळजी करणे' कडे झूकलेले वाटतात त्यात काही ठिकाणी सेपरेशन अँक्झायटीही दिसते. समस्या असतात नाही असे नाही तरीपण बहुतांश वेळा बहुतांश जग व्य्वस्थीत चालू असत याचा नकारात्मक बातम्यांच्या भडीमारा खाली विसरही पडू देऊ नये. आयूष्यात जोखीम ही सर्वत्र असते ती दारी असते तशी घरीही असते. जोखीमीच्या स्थिती कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण महत्वाचे. सांगण्याचा उद्देश प्रोटेक्शन आवश्यक असतेच पण केअर अँड प्रोटेक्शन ओव्हरप्रोटेक्शन मध्ये एंड अप होऊ नये. बंधने घालताना मुले त्यांच्या नैसर्गिक विकासापासून वंचीत होणार नाहीत धीट होतील याचा समतोलही सर्व पालक पाहतच असतात तरी पण एक स्मरण करणे गरजेचे म्हणून हा प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 04/12/2014 - 08:58

Permalink

रोज एक वैताग देणारी गोष्ट

रोज एक वैताग देणारी गोष्ट कळतेच. लहान मुलाला किंवा मुलीला थेट चॉकलेट न देता पालकांकडे देण्याची प्रथा मी माझ्यापुरती सुरु केली ती याच कारणामुळे. पण जर फक्त आई - मूल दोघेच असतील तर पंचाईत. म्हणजे आईचा भलताच गैरसमज व्हायचा आणि फटके पडायची वेळ येईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com