मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कलिया

चिन्मयी भान्गे · · पाककृती
साहित्य: बटाटे १ किलो ,कांदे मध्यम ५, धणे अर्धी वाटी, जीरे पाव वाटी,बडीशोप अर्धी वाटी, लसूण दोन कांदे, किसलेले खोबरे एक वाटी, खसखस अर्धी वाटी, आले, तिखट, हळद, मीठ चवीनुसार. मसाला कृती:खसखस २ तास आधी गरम पाण्यात भिजत ठेवणे. २ तासांनंतर ती खोबऱ्याच्या अर्ध्या कीसाबरोबर (कच्च्याच) वाटणे. उरलेला कीस, कांदा (कच्चाच) व लसूण बारीक करणे. धणे व जीरे भाजून बारीक करणे. बडीशोप, न भाजता, कच्चीच वाटणे. आले वेगळे वाटून घेणे. आले सोडून, उरलेला मसाला, त्यात हळद व तिखट घालून, मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेणे. बटाटे उकडून त्यांच्या फोडी करून घेणे. फोडणीसाठी , तेलाचा तवंग येईल असे भरपूर तेल घेउन ,त्यात मोहोरी टाकून, ती तडतडल्यावर त्यात आधी आले परतून घेणे व त्यानंतर त्यात मसाला चांगला परतून घेणे. मग त्यात बटाटयाच्या फोडी टाकून परतणे.नंतर त्यात पाणी टाकून त्यात मीठ व चवीला साखर टाकून उकळणे.

वाचने 10248 वाचनखूण प्रतिक्रिया 30

स्पंदना 10/04/2014 - 11:54
नविनच! पहिल्यांदाच ऐकते आहे असली काही पाककृती. आज काही तरी करावस वाटतय नविन नाही तर मग डायरेक्ट झुणका! बघु. खस खस जरा जास्त नै का झाली? झोप येइल न खाल्ल्याबरोबर? फोटो टाकता आले तर नक्की कस दिसत्य त्याचा अंदाज आला असता. पण असो. नव्या दिसता. मिपावर स्वागत.

ज्ञानव 10/04/2014 - 11:59
आंतरराष्ट्रीय होतोय तर आता. ही एक सुरेख डिश आहे. पण मला ती सकाळी करून फ्रीजमध्ये थंड करून संध्याकाळी खायला जास्त आवडते.

'कलीया' म्हणजे माझा जीव कि प्राण आहे. मांसाहारी चवीचा शाकाहारी पदार्थ आहे हा. आमच्याकडे तिघांसाठी कलीया करायचा झाला तरी पातेलेभर करावा लागतो. खसखशीचे प्रमाण मलाही जास्त वाटते आहे. मी फक्त २ छोटे चमचे (टि स्पून) घेतो. आणि धणे जास्त तर जीरं कमी घेतो. आपापल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करावे. 'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'. 'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात. चिन्मयी, मिपावर स्वागत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नंदन 21/04/2014 - 16:13
'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'. 'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात.
हे वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं :). काका, शक्य होईल तेव्हा ही पाककृती तुमच्या लेखणीतून स्वतंत्र धाग्यात, सविस्तर वाचायला आवडेल.

कुणीतरी फोटो द्या.. इतके सगळे म्हणत आहेत म्हणजे नक्कीच मस्त असणार रेसेपी.. केल्याबर किमान बरोबर तरी केली आहे का ते चेक करायला एक फोटो द्या..

In reply to by मनिष

दाट किंवा जरा पातळ कशीही करा. मध्यम करावा अशी माझी व्यक्तिगत आवड आहे. पोळी, परोठा, भात कशाबरोबरही छान लागतो. नुसता गरमागरम वाट्याच्या वाट्या रिचविणे हाही माझा छंद आहे.

मराठे 10/04/2014 - 21:11
मी आधी चुकून 'कालिया' वाचलं आणि म्हटलं की या पिच्चरची सालं काढली की काय कोणीतरी? असो, फोटोशिवाय पाककृती वाचणं म्हणजे चॉकलेटचा स्वाद वेष्ट्न न काढता घेण्यासारखं आहे.

झक्कास.. पा.क्रु. करून बघण्यात येईल... @ पेठकर काका. जमल्यास "मटण कलिया"ची पा.क्रु. टाकू शकाल का?

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 21/04/2014 - 16:08
गंभीरपणे बोलायचं तर काही जणांकडे सेटिंग्जमुळे फ्लिकरवरचे फोटो दिसत नाहीत. तुझ्या हापिसात सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे का ते विचारून उपाय कर!

In reply to by पैसा

फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत हे खरय.. ह्यावर काही उपाय नाही का? कारण मला सानिकेचे सगळे पदार्थ नीट दिसतात (चांगलं की वाईट?!!)

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 21/04/2014 - 17:09
आमच्या घरी सानिका आणि इतरांच्या पाकृ लपून छपून वाचाव्या लागतात. कारण मग, "मिपावरचे फोटो बघून ते आम्हाला खायला मिळणार का?" असली बोलणी ऐकावी लागतात!