✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा

श
शुचि यांनी
Mon, 04/07/2014 - 19:27  ·  लेख
लेख
कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप. आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो - इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या- ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् | समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८|| जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्‍या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो. ______________________ अर्थात कुमार रुप म्हणजे पौगंडावस्थॆच्या आधीची काही वर्षे. ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो/ अथवा आतापर्यंत एकत्र असलेले मुला-मुलींचे गट वेगवेगळे होऊ लागतात ते वय. ______________________ मला शंका ही आहे की कार्तिकस्वामी कुमार रूपातच भजला जातो त्यामुळे त्याचे त्या वयातील गुण/आवडी/निवडी अधोरेखित होता असतील काय? उदाहरणार्थ त्याचा स्त्रीद्वेष्टेपणा. त्याने पार्वतीवर रुसून मी तुझे तोंडही पाहणार नाही म्हटले होते आदि. शिवाय कार्तिकस्वामीच्या देवळात स्त्रियांना जाण्याची बंदी वगैरे. ______________________ केवळ एक शंका!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29777 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

अर दादा, तू खरे काकांचा मध्य

अप्पा जोगळेकर
Tue, 04/08/2014 - 00:09 नवीन
अर दादा, तू खरे काकांचा मध्य वयातील वादळ हा लेख कसा विसरतोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो अपवादाने नियमच सिद्ध होतो

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 00:11 नवीन
अहो अपवादाने नियमच सिद्ध होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 00:13 नवीन
वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो माझा रोख मध्य वयात शरीरात होणार्‍या बदलांवर नव्हताच- पुरुषद्वेषावर होता. तो लेख यावर फोकस्ड नाही. त्याचा इशय वेगळाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद बॅटमॅन.

शुचि
Tue, 04/08/2014 - 00:25 नवीन
धन्यवाद बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझ्या रिप्लाय्चा रोखही

अप्पा जोगळेकर
Tue, 04/08/2014 - 00:29 नवीन
माझ्या रिप्लाय्चा रोखही वेगळाच आहे. आसो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्याबद्दल मात्र सहानुभूती

शुचि
Tue, 04/08/2014 - 00:27 नवीन
त्याबद्दल मात्र सहानुभूती दर्शवली जाते हे अतिशय रोचक आहे.
कोणत्याच द्वेषाबद्दल सहानुभूती नाही रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅटमॅन

Pain
Tue, 05/06/2014 - 10:23 नवीन
बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमची द्वेष्टेपणाची व्याख्या काय?

अनन्त अवधुत
Tue, 04/08/2014 - 02:15 नवीन
लेकराने आईवर रुसून तिच्यासोबत कट्टी केली तर ते लगेच स्त्रीद्वेष्टे ठरते काय ? कार्तिकेयाने कोणत्याही स्त्रीला "केवळ" ती स्त्री म्हणून त्रास दिला असल्यास तो द्वेष्टेपणा असू शकतो. अन्यथा नाही. उगा आपले काहीच्या काही..
  • Log in or register to post comments

एक तर कुमारवयातील तात्पुरता

शुचि
Tue, 04/08/2014 - 03:44 नवीन
एक तर कुमारवयातील तात्पुरता (phase only ) स्त्रीद्वेश्तेपणा बद्दल बोलणं चाललय. परत कोणत्याही स्त्रीचे तोंड पहाणार नाही या प्रतिज्ञेच्या आख्यायीकेसंदार्भात ते आहे. पूर्ण वाचा आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

अहो, वाचूनच प्रश्न विचारलाय मी.

अनन्त अवधुत
Tue, 04/08/2014 - 05:32 नवीन
'तात्पुरत्या' स्त्रीद्वेष्टेपणाचा उल्लेख कुठे आहे. आणि असेल तर तुमची तात्पुरत्या स्त्रीद्वेष्टेपणाची व्याख्या सांगा. ६ मातृकांनी मोठा केलेला कुमार त्या वयात देव सेनेचा सेनापती होता. त्याच कुमार वयात त्याने तारकासुराचा पराभव केला. कुमार वयात त्याने इतका मोठा पराक्रम केला म्हणून त्याचे त्या वयातले रूप भजले जाते ना कि कुमार वयातल्या आवडी/ निवडी सांगायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

असो लेकरू हा शब्द व कट्टी ही

शुचि
Tue, 04/08/2014 - 03:45 नवीन
असो लेकरू हा शब्द व कट्टी ही कन्सेप्ट आवडली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

:)

अनन्त अवधुत
Tue, 04/08/2014 - 05:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

शुचे, तू पण नास्तिक होऊन जा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/08/2014 - 05:16 नवीन
शुचे, तू पण नास्तिक होऊन जा पाहू. अश्विन-कार्तिक काही लफडीच नाहीत.
  • Log in or register to post comments

नास्तिक म्हणजे?

प्यारे१
Tue, 04/08/2014 - 13:24 नवीन
नास्तिक म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नास्तिक असणे गुन्हा ठरणार !

मंदार कात्रे
Tue, 04/08/2014 - 14:27 नवीन
http://www.theblaze.com/stories/2014/04/02/new-saudi-law-likens-atheism-to-terrorism/
  • Log in or register to post comments

सौदीतले कायदे सांगण्यात अर्थ

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 14:47 नवीन
सौदीतले कायदे सांगण्यात अर्थ काय आहे? ते लोक तसेही मनाने ७व्या शतकाच्या पुढे आलेलेच नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

हम्म

मूकवाचक
Tue, 04/08/2014 - 15:20 नवीन
कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा हे दोन स्वतंत्र विषय आहेत. असो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा