✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आंतरजालावरील करामती...

ट
टुकुल यांनी
Wed, 10/08/2008 - 06:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3950 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Wed, 10/08/2008 - 07:33 नवीन

ओ महाराज ,

ओ महाराज , तुमचा पत्ता देता का ? सायबर क्राइम वाल्यांना पाठवतो भेटायला !!! ( ह . घ्या .) (याहू चॅटींग मध्ये वजीर ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 10/08/2008 - 08:09 नवीन

आम्हीही...

असाच आयटम केला होता अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना... आम्ही सी डॅकच्या प्रवेश परीक्षेच्या तयारी साठी संचालन प्रणाली (ऑपरेटींग सिस्टीम ) वरचं पुस्तक वाचत होतो. सुरक्षेवरचे (सिक्युरीटी) धडे वाचत होतो. त्यातच कुठेतरी खोटी (फेक) लॉगिन विंडो वापरुन परवलीचे शब्द गोळा करण्याची युक्ती संगणक चोरांकडून कशी वापरली जाते हे अगदी पद्धतशीर दिलं होतं... झालं... आम्ही जरी अणूविद्युत अभियांत्रिकीचे विद्यार्थी होतो तरी शेजारच्या संगणक अभियांत्रिकीच्या वर्गात शिकवलं जाणारं संगणक आज्ञावली लेखन अगदी व्यवस्थीत जमायचं. लगेच आम्ही विज्युअल बेसिक मधून एक लॉगिन विंडो बनवली जी लोकांना सांगेल की तुम्ही तुमचे याहू आय डी आणि पासवर्ड द्या, मी तुम्हाला याहूला कनेक्ट करतो... या विंडोमध्ये आम्ही असा कोड लिहला होता की वापरकर्त्याने आय डी आणि पासवर्ड टाकून बटन दाबलं की ती माहीती एका टेक्स्ट फाइलमध्ये लिहिली जायची... आणि आमच्या संगणक प्रयोगशाळेच्या सगळ्या संगणकांमध्ये स्टार्टअप रुटीनमध्ये ही विंडो टाकून दिली... बास आणि मग धाड धाड येड्या लोकांचे याहू आय डी आणि पासवर्ड आमच्याकडे जमा होऊ लागले... (त्या आय डी आणि पासवर्डचा दुरुपयोग न केलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 10/08/2008 - 08:56 नवीन

मी

मी मित्रांना घाबरवण्यासाठी php script (एक प्रोग्रामिंग लँग्वेज) मधे to field मधे त्यांचाच एक ईमेल आय डी टाकून त्यांच्याच दुसर्‍या ईमेल आय डी ला मेल टाकला(ली). जर नीट पाहिले तर तो मेल कोणत्या सर्वर वरून आला आहे ते दिसते डिटेल्स मधे पण सर्व सामान्य पणे कोणी डिटेल्स बघत नाही (जी मेल मधे तर show details वर क्लिक केल्याशिवाय दिसतही नाही) आणि प्रथम दर्शनी असे वाटते की आपल्याच मेल अकाऊंट वरून मेल आला(ली) आहे. ह्यात कोणतेही पासवर्ड हॅकिंग नाही आहे. बाकी फिशींग साईट (उदा. ईमेल मध्ये एक दुवा द्यायचा. जे वेबपेज उघडेल ते हुबेहूब याहू मेल च्या लॉग ईन स्क्रीन सारखे दिसते. त्यात तुमचा युजर नेम पासवर्ड टाकला की याहू ला साईन इन होण्याऐवजी मला तिथे टाकलेले युजर नेम पासवर्ड ईमेल ने कळेल. याहू मेल हे फक्त एक उदाहरण आहे. लोकांचे बँक अकाऊंट्स हॅक झाली आहेत ही पद्धत वापरून.) बनवण्याचे प्रकार माहित असून केले नाहीत. मित्रांना वेळोवेळी सावध मात्र केले. मला काही गरज नसताना उगाच गंमत म्हणून दुसर्‍यांचे पासवर्ड हॅक करणे पटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 10/08/2008 - 09:43 नवीन

योग्य

मला काही गरज नसताना उगाच गंमत म्हणून दुसर्‍यांचे पासवर्ड हॅक करणे पटत नाही. अत्यंत योग्य विचार. बुध्दीमत्ता वापरण्यासाठी असंख्य क्षेत्र आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लंबूटांग Wed, 10/08/2008 - 10:10 नवीन

हॅकर काय

हॅकर काय काय युक्त्या वापरू शकतो हे माहित असणे गरजेचे आहे पण ते माहित आहे म्हणून आपणच दुसर्‍यांवर त्याचा प्रयोग करणे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मी मित्रांना ईमेल वरील पद्धत वापरून ईमेल पाठवल्या नंतर (ते स्वतः सॉफ्टवेअर मधे काम करत असून पण) मला हॅकर म्हणू लागले होते :P. एका मित्राचे ऑर्कुट हॅक झाल्या वर मला परत परत विचारत होता की तू खरे खरे सांग तू केले आहेस का. (अवांतरः ह्याच्याशी थोडासा निगडीत असाच एक विनोद वाचला होता. एका बाईकडे सुरी/पिस्तूल काही तरी सापडल्यामुळे एक पोलिस तिला पकडतो. ती म्हणते मी काहीच गुन्हा केलेला नाही. तरी पण तू मला का पकडलेस? पोलिस म्हणतो अजून काही केलेले नाहीस पण तुझ्याकडे जे आहे ते वापरून तू उद्या खून सुद्धा करशील (त्यासाठी लागणारे 'साधन' तुझ्याकडे आहे). ती बाई त्याला म्हणते ह्या न्यायाने तर तुला पण पकडले गेले पाहिजे. तू पण अजून काही केलेले नाहीस, पण तुझ्याकडे जे आहे ते वापरून तू उद्या बलात्कार पण करशील ;) ) स्वगतः प्रत्येक प्रतिक्रियेत काय चालू आहे रे अवांतर :-? --(बाबा अवांतर) लंबूटांग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ट
टुकुल Wed, 10/08/2008 - 10:43 नवीन

सहमत.

>>>मला काही गरज नसताना उगाच गंमत म्हणून दुसर्‍यांचे पासवर्ड हॅक करणे पटत नाही. आता मी याला पुर्णपने सहमत आहे, पण जे काही घडले त्या वेळी अंगात नविन जोश होता, कुतुहुल होते, आपण हे करु शकतो का हे बघयाचे होते. एकाप्रकारे डोक्यात एक वेड गेले होत. >>बुध्दीमत्ता वापरण्यासाठी असंख्य क्षेत्र आहेत १००% बरोबर. अहो म्हणुन तर एका सीमेनंतर आम्ही परत आलो, नाहीतर वाहतच गेलो असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2008 - 10:16 नवीन

मी

मी मित्रांना घाबरवण्यासाठी php script (एक प्रोग्रामिंग लँग्वेज) मधे to field मधे त्यांचाच एक ईमेल आय डी टाकून त्यांच्याच दुसर्‍या ईमेल आय डी ला मेल टाकला(ली). पाईन हा अतिशय साधा इमेल क्लायंट वापरुन हेच करता येतं. अवांतरः कुठल्याशा मिटींगमधे एका मित्रानी माझ्या नावावर इमेल करुन चहाबरोब बिस्किटंही मिळतील का अशी पृच्छा केली होती! आणि हे माहित नसताना सगळ्यात जास्त बिस्किटं मीच गटकवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लंबूटांग Wed, 10/08/2008 - 10:31 नवीन

पाईन (Pine)

माहितीच नव्हते. धन्यवाद. हे नाव आवडले Pine® - a Program for Internet News & Email अधिक माहिती. त्याचेच आता नवीन व्हर्जन आले आहे अल पाईन (Alpine). अधिक माहिती इथे आणि इथे पहा इथून अल पाईन उतरवून घ्या विंडोज साठी. पाईन माहित असते तरी पण मी script लिहिलीच असती :P (स्वगतः कोणी विचारले आहे का रे तुला?? किती बोलतोयस आज!!!) --(विंडोज मधेच अडकलेला आणि अधून मधून 'उबंटु' मधे धडपडणारा उचापती कार्टा) लंबूटांग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ल
लंबूटांग Wed, 10/08/2008 - 09:18 नवीन

अजून एक

ही आंतरजाला वरील करामत नाही आहे. आम्ही अभियांत्रीकी कॉले़ज मधे असताना एका लॅब मधे विंडोज ९८ प्रणाली असलेले संगणक होते. त्यात autoexec.bat फाईल असायची जी विंडोज सुरू होताना execute होते. त्यात ren c:\windows\*.* c:\windows\*.txt एवढी एक लाईन add करून pc shut down करून गपचूप निघून जायचो. (ही DOS command windows folder मधील सगळ्या फाइल्स री नेम करते.) नेक्स्ट बॅच च्या मुलांनी pc चालू केला की windows फोल्डर मधील सर्व फाईल टेक्स्ट फाईल बनायच्या आणि त्या हार्ड्वेअर वाल्या 'कावळ्या' ला (त्याचा चेहरा कावळ्या सारखा होता पण साला स्वतःला हिरो समजायचा) परत विंडोज टाकावे लागायचे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2008 - 09:52 नवीन

लिनक्स

आम्ही अभियांत्रीकी कॉले़ज मधे असताना एका लॅब मधे विंडोज ९८ प्रणाली असलेले संगणक होते. त्यात autoexec.bat फाईल असायची जी विंडोज सुरू... लिनक्स वापरा, कोणालाही स्वतःचा परवलीचा शब्द सांगू नका, टारपिल्स खा, टेंशन विसरा आणि सुखी रहा! मला काही गरज नसताना उगाच गंमत म्हणून दुसर्‍यांचे पासवर्ड हॅक करणे पटत नाही. +१ ही आंतरजाला वरील करामत नाही आहे. +१ अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लंबूटांग Wed, 10/08/2008 - 10:15 नवीन

लिनक्स

लिनक्स वापरा, कोणालाही स्वतःचा परवलीचा शब्द सांगू नका, टारपिल्स खा, टेंशन विसरा आणि सुखी रहा! =)) लिनक्स आणि टारपिल्स. नातवाच्या टारपिल्स चे मार्केटिंग आज्जी करतेय. बाकी ऍड चांगली होईल टारपिल्स are as reliable as लिनक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शिवा जमदाडे Wed, 10/08/2008 - 09:50 नवीन

घोर कलियुग....

"केलेले काळे धंदे" सुद्धा छाती फुगवून सांगायचे युग आलेले दिसते....... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 10/08/2008 - 10:35 नवीन

नाही तसे नाही

मी वर आधिच लिहिले आहे शिवा भाउ कि हे मी ज्या काहि लोकांना अशा गोष्टी ठाउक नसतील त्यांना जागरुक करण्यासाठी केले. जे काही लिहिले त्या मधे मि काहीच मोठे नाही केले, फक्त लोकांच्या आतमधे दबुन बसलेल्या एका उत्सुकतेला हेरले, ज्यांची जास्त उत्सुकता ते ह्यात फसले. मला ह्यात छाती फुगवून सांगता येइल असे काहीच वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवा जमदाडे
द
देवदत्त Wed, 10/08/2008 - 10:21 नवीन

हॅकिंग स्पर्धा

अमेरिका सरकारने हॅकिंग च्या स्पर्धा ठेवून त्यात जिंकणार्‍या पहिल्या ८-१० जणांना सरकारी खात्यात हॅकिंग रोखण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी नियुक्त केले होते, असे ऐकिवात आहे. खरे खोटे तेच जाणे. पण स्वतःच्या नेटवर्कची सुरक्षा तपासण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अशा स्पर्धा होत असतात हे इथे व इथे पाहण्यात आले. :) तुम्हीही पहा प्रयत्न करून ;) ------------------------------------------------------------------------- प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 10/08/2008 - 10:48 नवीन

तो प्रांतच वेगळा मालक....

आम्ही आपले तुमच्यासारखेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 10/20/2008 - 15:44 नवीन

राव

राव मला सुद्दा हकिग शीकायची आहे मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा