✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ज्योतिषशास्त्राचा फायदा

आ
आयुर्हित यांनी
Fri, 02/28/2014 - 22:07  ·  लेख
लेख
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत. ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो. थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो. मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे. आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत. यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो. कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल. माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38284 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

कुंडल्या

माहितगार
Tue, 03/18/2014 - 14:49 नवीन
मलेशिया, चीन, मलेशिया एअरलाइन्स, आणि भारतीय प्रवाशांच्या काही कुंडल्या मिळण्यास हरकत नाही संशोधना करता हव्यात म्हटल तर नक्की साहाय्य मिळू शकेल. इतर काही प्रवाशांच्या जन्म वेळा आणि जन्म स्थळे मिळाली तरी त्या सर्व कुंडल्यात बनवून त्या सर्व कुंडल्यात असा काही ना काही समान धागा दाखवावा लागेल जो त्या विमानात न बसलेल्या जगातल्या इतर कुणाच्याही कुंडलीत असू नये. अडचणीतल्या विमान प्रवाशांच्या संबंधाने टेस्ट अवघड असली तरी अधिक विश्वासार्ह अभ्यास होऊ शकेल. या टेस्ट साठी अडचणीतल्या विमानांचीच आवश्यकता आहे असे नाही. मिपातल्या काही मंडळींनी सोबतीने विमान प्रवास केला आणि आपापल्या कुंडल्या उपलब्ध केल्यातरी त्यात कुंडलीत प्रवास होता हे दाखवता आले पाहीजे आणि त्या गोष्टी इतर कुणाच्याही कुंडलीत असू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

कोणे एके काळी माझ्या अशाच

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/18/2014 - 15:34 नवीन
कोणे एके काळी माझ्या अशाच भाबड्या समजुती होत्या. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

:)

माहितगार
Tue, 03/18/2014 - 17:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

भाबड्या समजुती

आयुर्हित
Wed, 03/19/2014 - 12:17 नवीन
आपल्या काही भाबड्या समजुती असतील तर त्या येथे मांडाव्यात. मला खात्री आहे, मी आपल्या प्रत्येक शंकेचे शास्त्रीय (scientific)निरसन करू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

होत्या

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/19/2014 - 12:30 नवीन
होत्या म्हटल मी. उदा. कुंडली बरोबर असेल तर स्त्री का पुरुष? जिवंत कि मृत?, विवाहित की अविवाहित? या गोष्टी ज्योतिषाला सांगता येतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

आपल्या काही भाबड्या समजुती

बॅटमॅन
Wed, 03/19/2014 - 12:48 नवीन
आपल्या काही भाबड्या समजुती असतील तर त्या येथे मांडाव्यात. मला खात्री आहे, मी आपल्या प्रत्येक शंकेचे शास्त्रीय (scientific)निरसन करू शकेन.
या भाबड्या समजुतीचे निरसन करणारा कुणीतरी पाहिजे बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

या भाबड्या समजुतीचे निरसन

अधिराज
Wed, 03/19/2014 - 15:59 नवीन
या भाबड्या समजुतीचे निरसन करणारा कुणीतरी पाहिजे बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=))

शुचि
Wed, 04/09/2014 - 00:04 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रवाशांपैकी एकाची तरी खरी

अधिराज
Wed, 03/19/2014 - 16:03 नवीन
प्रवाशांपैकी एकाची तरी खरी अचूक कुंडली
खरी अचूक कुंडली हिच मुळात मोठी पळवाट आहे तथाकथित ज्योतिषांसाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

हाहाहा...सरजी, कोणाच्याही

स्वप्नांची राणी
Tue, 03/18/2014 - 13:51 नवीन
हाहाहा...सरजी, कोणाच्याही कुंडलीशिवाय विमानाचीच कुंडली आणि मलेशियाचीच कुंडली मांडून केलेले तर्कवितर्क आधिच जालावर आलेत. http://astrology.astrosage.com/2014/03/what-happened-with-flight-mh-370.html (विमानावर जोक करुन हसत नाहिये मी...ऊद्वेगातुन आलय ते..)
  • Log in or register to post comments

.

पोटे
Tue, 03/18/2014 - 14:02 नवीन
ज्योतिष इतके तीक्ष्ण आहे, तर बाबर इंग्रज चालून येत आहेत हे इथल्या राजांना आधी का नाही समजले?
  • Log in or register to post comments

चांगला विषय....चर्चा तर होणारच।

सार्थबोध
Tue, 03/18/2014 - 14:04 नवीन
आयुर्हित चांगला विषय....चर्चा तर होणारच। ज्या व्यक्तींना एखद्याचा शरीरचा "ऑरा" समाजतो, ते रोगचे निदान पुष्कल आधि करू शकतात.. हे विदन्यानाने देखिल सिद्ध झाले आहे, आपल्यकडे मात्र ही पद्धत फार जुनि आहे. लेखानतील चुकांबदल क्षमा करा
  • Log in or register to post comments

दगडालाही ऑरा असतो असं कुठेसं

स्वप्नांची राणी
Tue, 03/18/2014 - 16:44 नवीन
दगडालाही ऑरा असतो असं कुठेसं वाचलय बाई...!
  • Log in or register to post comments

माणूस आशेवर जगतो. माणसाची आशा

श्रीगुरुजी
Tue, 03/18/2014 - 18:37 नवीन
माणूस आशेवर जगतो. माणसाची आशा जागृत ठेवणे हा ज्योतिषाचा सर्वात महत्त्वाचा फायदा समजता येईल. बहुतेक ज्योतिषी समोरच्या व्यक्तीला अमुक तमुक ग्रहदशा बदलली वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतील असा दिलासा देतात. काहीतरी आशादायक ऐकावे या हेतूने आलेल्या व्यक्तीला ग्रहतार्‍यांच्या कृपेने भविष्यात आपल्याला नक्कीच चांगले दिवस येतील असा दिलासा मिळतो.
  • Log in or register to post comments

सहमत आहेच. पं महादेवशास्त्री

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/18/2014 - 19:07 नवीन
सहमत आहेच. पं महादेवशास्त्री जोशी आपल्या आत्मपुराण मधे हेच म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आत्मपुराण लै जबरी पुस्तक ओ.

बॅटमॅन
Tue, 03/18/2014 - 19:21 नवीन
आत्मपुराण लै जबरी पुस्तक ओ. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

भारीच

संतोषएकांडे
Wed, 03/19/2014 - 10:56 नवीन
हे ज्योतीष शास्त्र पण भारी दुर्गम शास्त्र आहे ब्वा... ग्रहांवर जाणारे अवकाशयान सुध्धां ग्रहमान, कुंडली आणी मूहूर्त बघुन सोडले जातात म्हणे... एका लेबॉरेटरीचं उदघाटन सुध्धां चक्क तिथी,मिती,आणी मूहूर्त बघून ठरवल जातं... धन्य हो..
  • Log in or register to post comments

ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा

आयुर्हित
Fri, 04/04/2014 - 13:13 नवीन
'ज्योतिष हे शास्त्र नसल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आतापर्यंत अनेकदा केली आहे. मात्र, सातत्याने आव्हान देणाऱ्या 'अंनिस'ने फलज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करून दाखविल्यास २१ लाख रुपये देण्याची तयारी आहे,' असे आव्हान बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी दिले. साभार:ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा
  • Log in or register to post comments

बातमितले जकातदारांचे म्हणने

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/04/2014 - 14:45 नवीन
बातमितले जकातदारांचे म्हणने(विवेचन) हे ढोबळ आहे. शास्त्र म्हटल्यानंतर त्यांसंमंधिचे मुद्दे (सर्व सामान्य लोकांसमोर/बातमीमधे) उजेडात आणायला हवे. मुद्दा एकही नाही. सगळी भाषा संदिग्धरित्या वापरलेली आहे. जकातदारांनी अं.नि.स.चं आव्हान लिखित स्वरूपात जिंकलेलं आहे काय? (वाद/विवादात त्यांनी काय जिंकलय ते पाहिलय.असो!) अता अंनि.स म्हणते,ज्योतिष हे शास्त्र आहे.. हे सिद्ध करा.जकातदार म्हणतात,ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा... म्हणजे,जे नाहीच..ते सिद्ध करून दाखवा असा त्यांच्या म्हणण्याचा वेडगळ अर्थ आहे. हे बरं आहे बाकी...जकातदारांच्या दाव्याचा अर्थ असा की गाय अंडे का देत नाही? हे सिद्ध करा... अता गाय जर का वासराला(म्हणजे डायरेक्ट पिल्लाला) जन्म देते,हे सत्य आहे..तर गाय अंड का देत नाही??? हे सिद्ध कसं करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

its your call

आयुर्हित
Fri, 04/04/2014 - 14:55 नवीन
हे सिद्ध कसं करणार:- हा प्रश्न तुमचा आहे, जो सोडवल्यावर आपल्याला २१ लक्ष रुपये मिळवून देईल! its your call, which may fetch you 21 lakhs!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

माझ्या म्हणण्यातून आपल्याला

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/04/2014 - 15:08 नवीन
माझ्या म्हणण्यातून आपल्याला जे कळलय ते पहाता असोsssssssssss! इतकेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

झोपलेल्याला जागे करता येते,

धन्या
Sun, 04/06/2014 - 14:55 नवीन
झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही :) "फलज्योतिष" हा धंदा आहे. त्यामुळे गंदा हैं पर धंदा हैं या न्यायने आपल्या व्यवसायाची पाठराखण करायलाच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अज्ञानात सुख असते!

आयुर्हित
Sun, 04/06/2014 - 22:16 नवीन
अज्ञानात सुख असते म्हणतात! सुखी रहा असेक मी म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@सुखी रहा असेक मी म्हणेन.>>>

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/07/2014 - 00:51 नवीन
@सुखी रहा असेक मी म्हणेन.>>> चला..सुखी आहात म्हणजे तुंम्ही! :p उत्तम! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

जकातदारांनी प्रेडीक्शन केलयं...

आत्मशून्य
Fri, 04/04/2014 - 23:09 नवीन
मोदी पंतप्रधान होणार नाहीत.
  • Log in or register to post comments

मोदी होवो वा न होवो जकातदार

प्रकाश घाटपांडे
Sat, 04/05/2014 - 10:00 नवीन
मोदी होवो वा न होवो जकातदार तर प्रसिद्धीच्या झोतात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

@मोदी पंतप्रधान होणार नाहीत.>

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/05/2014 - 14:13 नवीन
@मोदी पंतप्रधान होणार नाहीत.>>> अशीच प्रेडीक्शन करणार ते... या फांदिवरचा कावळा उडेल,त्या फांदिवरचा उडणार नाही. म्हणजे कोणताही उडाला तरी फांदी संदिग्ध ठेवल्यामुळे ती हवी तेंव्हा बदलता येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

त्यांनी निसंधीग्धपणे मोदी

आत्मशून्य
Sat, 04/05/2014 - 14:28 नवीन
त्यांनी निसंधीग्धपणे मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजप सत्ता बनवणार नाही व खान्ग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होइल जे ३ ते ३.५ वर्षे चालेल व पुन्हा निवडणुक घ्यावी लागेल असे म्हटले आहे. आपचा यात साधा उल्लेखही नाही हे बघता या पक्षाला भवीष्य नाही असेही बहुदा गृहीत धरावे वाटते. हे सर्व त्यांनी विवीध पक्षांच्या स्थपनेच्या दिवसावरुन व उभे केलेल्या जागावरील उमेदवारांची ग्रहस्थीती वगैरे वगैरे बघुन प्रेडीक्शन केले आहे. केजीरवाल औट घटकेचे मुख्यमंत्री का झाले होते, राहुल का पंतप्रधान होणार नाही हे सुधा त्यांच्या कूंडल्यावाचुन सांगीतले. अर्थात... आपल्या डोक्याबाहेरील ग्रहतार्‍यांची मिमांसा त्यामागे दिलेली असल्याने जास्त खोलात शिरता आले नाही. @प्रकाश घाटपांडे काका, सहमत आहे. जकातदार तर प्रसिद्धीच्या झोतात आले हे नक्किच पण सध्याचे वारे बघता प्रवाहाविरोधी प्रसिध्दीचा उघड झोत आंगवर घेण्यास अंगात गट्स लागतात हे माझे वैयक्तीक मत आहे, अगदी अनेक मिपाकरही या प्रकाराला घाबरतात हे तर आपण रोजच बघतो. त्यामुळे त्यांचे भवीष्यकथन खरेच योग्य ठरते की अयोग्य हे पहाणे रोचक ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चांगला लेख.

Anvita
Sat, 04/05/2014 - 12:45 नवीन
चांगला लेख.
  • Log in or register to post comments

मी उद्द्या काय जेवनार आहे?

नावात्_काय्_आहे
Sat, 04/05/2014 - 16:23 नवीन
जन्मतारिख :- २ जुले १९८५ जन्म वेळ :- ८.५५ सकाळी जन्म ठिकाण :- नाशिक
  • Log in or register to post comments

काही प्रश्न

नावात्_काय्_आहे
Sat, 04/05/2014 - 16:26 नवीन
प्लुटो ग्रहाचा प्रभाव कसा काढायचा . :द किंवा मंगळवारच्या माणूसाला पुथ्वी असते का > ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावात्_काय्_आहे

अमुक वारला उपास

नावात्_काय्_आहे
Sat, 04/05/2014 - 16:29 नवीन
कुंडलीतले दोष काढायला अमुक वारला उपास करा , तमुक वाराला देव दर्शन करा हे वजन करण्यासाठी , का गर्दी वाढवण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावात्_काय्_आहे

आपण टुबी ऑर नॉट टुबी

आत्मशून्य
Sat, 04/05/2014 - 16:33 नवीन
आपण टुबी ऑर नॉट टुबी मानसिकतेमधुन बाहेर यायला विशेष संघर्ष केला आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावात्_काय्_आहे

विशेष असा नाही

नावात्_काय्_आहे
Sat, 04/05/2014 - 16:40 नवीन
विशेष असा नाही . :प फक्त समोरच नेमका कोणत्या गटातला हे ओळखायला मदत होते . तुमचं जवळ जर प्रश्नांची उत्तर असेल तर ती दिली तरी चालतील . फक्त प्रश्नाला प्रश्न नको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मी तुम्हाला नियंत्रीत करु शकत नाही....

आत्मशून्य
Sat, 04/05/2014 - 16:49 नवीन
नाही तर आंका ठरलो नसतो काय ? पण... या क्षणी समजा तुमच्या समोर जिलबी, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम, आणी खिर ठेवली/मेनु असेल तर त्यातुन आपण कोणता निवडाल याचे ठोकताळे बांधु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावात्_काय्_आहे

बांधा कि राव

नावात्_काय्_आहे
Sat, 04/05/2014 - 16:59 नवीन
बांधा कि राव. ठोकताळे चुकानार नाही याची दक्षता घ्यावी . अजून मूळ प्रश्न तिथेच राहून विषय फक्त बहरकातु नका देऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मुळ प्रश्न तिथेच आहे.

आत्मशून्य
Sat, 04/05/2014 - 17:04 नवीन
आनी अस्थानीच राहील याची खात्री हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावात्_काय्_आहे

एखादे त्रुणधान्य, (फळभाजी,

स्वप्नांची राणी
Sat, 04/05/2014 - 16:50 नवीन
एखादे त्रुणधान्य, (फळभाजी, पालेभाजी, प्राणिज भाजी, मत्स्यभाजी) ह्यापैकी एक किंवा जास्त खाण्याचे योग आहेत. जलपानाचे योग आहेत. परदेशस्थ खाणे उदा. चायनिज ई.ई. खाण्याचेही जोरदार योग दिसतायेत. पण पोटाची काळजी घ्यावी. यापैकीच एक बाधण्याचे क्षिण संकेत दिसतायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावात्_काय्_आहे

उपास हा प्रकार वगळून त्याचा उपहास केला आहे .

नावात्_काय्_आहे
Sat, 04/05/2014 - 16:56 नवीन
उपास हा प्रकार वगळून त्याचा उपहास केला आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

त्यांनी निसंधीग्धपणे मोदी

सुबोध खरे
Tue, 03/24/2015 - 10:28 नवीन
त्यांनी निसंधीग्धपणे मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजप सत्ता बनवणार नाही व खान्ग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होइल जे ३ ते ३.५ वर्षे चालेल व पुन्हा निवडणुक घ्यावी लागेल असे म्हटले आहे. जकातदार कुठे आहेत सध्या ? त्यांची ओटी भरावी म्हणतो, खणानारळाने.
  • Log in or register to post comments

आता लोकं आपल्या मागे हात

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/24/2015 - 11:01 नवीन
आता लोकं आपल्या मागे हात धुवुन लागतील हे ज्योतिषपॉवरने समजल्याने त्यांनी अंदमानच्या जंगलात पळ काढला असावा असं वाटत आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यांनी कोणत्या वर्षीचे

टवाळ कार्टा
Tue, 03/24/2015 - 11:26 नवीन
त्यांनी कोणत्या वर्षीचे भविष्य सांगितलेले?...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@ जकातदार कुठे आहेत सध्या ?

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/24/2015 - 12:39 नवीन
@ जकातदार कुठे आहेत सध्या ? त्यांची ओटी भरावी म्हणतो, खणानारळाने.>> आता पाय लावून पळुन जाणार ते! :-D रच्याकने:- जकातदार हा एक अत्यंत बालबुद्धिचा माणुस आहे. भांडावं कोणत्या मुद्द्यांवर? याची बेसिक अक्कल देखिल नाही त्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा