कोथिंबीर वडी
साहित्य:
२ वाट्या हरभरा डाळ(भिजवलेली)
कोथिंबीर (धूवून चिरलेली) ३ वाट्या
३ चमचे डाळीचे पीठ (बेसन)
२ चमचे ओवा
१ चमचे धने
२ चमचे तीळ
तिखट ३ चमचे(आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
२ चमचे चिंचेचा कोळ
२ चिमूट खायचा सोडा
तेल
पाककॄती :
हरभरा डाळ ३ -४ तास भिजत घालावी.कोथिंबीर धुवून चिरावी.(फार बारीक चिरू नये).
भिजलेली डाळ मिक्सरमधून वाटुन घ्यावी.
वाटलेल्या डाळीत तिखट,मीठ्,ओवा,धने,चिंचेचा कोळ्,खायचा सोडा,डाळीचे पीठ आणि कोथिंबीर घालावे.
वरील सर्व साहित्य एकत्र करावे.
कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून वरील मिश्रण त्यात थापावे.त्यावर तीळ लावून एकसारखे थापून घ्यावे.
कुकरमधे भांडे ठेवून नेहेमीप्रमाणे शिजवून घ्यावे(कुकरच्या तीन शिट्ट्या पुरतात).
थोडेसे गार झाल्यावर वड्या पाडव्यात.आता वड्या तळायला घेउ शकता.जास्त तेलकट नको असतील तर थोड्या तेलावर
परतून घेतल्या तरी छान लागतात.
वड्या नूसत्याही छान लागतात.मी डाळीचा चटका(चटणी) केला होता.(भिजवलेली डाळ हाताशी असल्याने ही पळवाट.)
डाळीचा चटका:
साहीत्यः
३ चमचे भि़जवलेली हरभरा डाळ
४-५ मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
१/२ चमचा साखर
कोथींबीर १ चमचा
जीरे
पा़कॄ:
वरिल सर्व साहीत्य एकत्र करून मिक्सर मधून वाटणे.
हिंग ,जीरे ,कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार चटणीवर घालावी.

थोडेसे गार झाल्यावर वड्या पाडव्यात.आता वड्या तळायला घेउ शकता.जास्त तेलकट नको असतील तर थोड्या तेलावर
परतून घेतल्या तरी छान लागतात.
वड्या नूसत्याही छान लागतात.मी डाळीचा चटका(चटणी) केला होता.(भिजवलेली डाळ हाताशी असल्याने ही पळवाट.)
डाळीचा चटका:
साहीत्यः
३ चमचे भि़जवलेली हरभरा डाळ
४-५ मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
१/२ चमचा साखर
कोथींबीर १ चमचा
जीरे
पा़कॄ:
वरिल सर्व साहीत्य एकत्र करून मिक्सर मधून वाटणे.
हिंग ,जीरे ,कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार चटणीवर घालावी.

वाचने
15400
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
प्रतिक्रिया
मस्त
फारच मस्त.. मी पण परवा केल्या
मस्त .... आवडता प्रकार आहे .
खल्लास. अगदीच अप्रतिम. डाळीचा
कधिकधी कोथिंबीर वडीतली
वडी तो वडी...चटनी भी
गोरेगाव डेपो(माणगाव कडचा)च्या
सुंदर
तोंपासु.........
कातील फोटू.
शब्द खुंटले... जबरी एकदम
धन्यवाद!
वाह, व्वा! काय झकास फोटो आणि पाकृ!!
एक शंका.
दिल गार्डन गार्डन हुवी गवा!
नक्कीच करायला सांगेल.बटाटा
मस्त झाल्यात ! नविन प्रकार
खमंग वड्या
मस्त. मी कायम ईड्ली पात्रात
नेहमीच्या आवडीची गोष्ट. आता
सर्वांचे धन्यवाद!
मस्त दिसताहेत वड्या... मला
मस्तच ! फोडणीची चटणी पण एकदम
मस्त!
सुंदर आहेत.... वाह ! तोंडाला
सुंदर
काल संध्याकाळी घरी बनवून
In reply to काल संध्याकाळी घरी बनवून by किसन शिंदे
मस्तच दिसतायेत वड्या!!
मस्तच!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
छान दिसतात