मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोथिंबीर वडी

इशा१२३ · · पाककृती
साहित्य: २ वाट्या हरभरा डाळ(भिजवलेली) कोथिंबीर (धूवून चिरलेली) ३ वाट्या ३ चमचे डाळीचे पीठ (बेसन) २ चमचे ओवा १ चमचे धने २ चमचे तीळ तिखट ३ चमचे(आवडीप्रमाणे) मीठ चवीप्रमाणे २ चमचे चिंचेचा कोळ २ चिमूट खायचा सोडा तेल पाककॄती : हरभरा डाळ ३ -४ तास भिजत घालावी.कोथिंबीर धुवून चिरावी.(फार बारीक चिरू नये). भिजलेली डाळ मिक्सरमधून वाटुन घ्यावी. वाटलेल्या डाळीत तिखट,मीठ्,ओवा,धने,चिंचेचा कोळ्,खायचा सोडा,डाळीचे पीठ आणि कोथिंबीर घालावे. वरील सर्व साहित्य एकत्र करावे. कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून वरील मिश्रण त्यात थापावे.त्यावर तीळ लावून एकसारखे थापून घ्यावे. कुकरमधे भांडे ठेवून नेहेमीप्रमाणे शिजवून घ्यावे(कुकरच्या तीन शिट्ट्या पुरतात). n थोडेसे गार झाल्यावर वड्या पाडव्यात.आता वड्या तळायला घेउ शकता.जास्त तेलकट नको असतील तर थोड्या तेलावर परतून घेतल्या तरी छान लागतात. gdfg वड्या नूसत्याही छान लागतात.मी डाळीचा चटका(चटणी) केला होता.(भिजवलेली डाळ हाताशी असल्याने ही पळवाट.) डाळीचा चटका: साहीत्यः ३ चमचे भि़जवलेली हरभरा डाळ ४-५ मिरच्या चवीप्रमाणे मीठ १/२ चमचा साखर कोथींबीर १ चमचा जीरे पा़कॄ: वरिल सर्व साहीत्य एकत्र करून मिक्सर मधून वाटणे. हिंग ,जीरे ,कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार चटणीवर घालावी. ghfh

वाचने 15400 वाचनखूण प्रतिक्रिया 31

फारच मस्त.. मी पण परवा केल्या होत्या.. पण फार कोरड्या झाल्या होत्या.. तेलात शॅलो फ्राय करुनही काही फायदा झाला नाही. तुझ्या फारच सुबक झाल्या आहेत.. माझ्या वड्यांचा भुगाच जास्त होतो ;)

इशा१२३ 22/03/2014 - 22:37
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे धन्यवाद! @पिलीयन रायडर :भिजवलेली डाळ वापरली तर वड्या कोरड्या होत नाहीत.आणि या कुकरमधे वाफवून घेतल्याने त्याचा भूगाही होत नाही. :-) @कंजूस: कोथिंबीर जास्त वेळ ओली राहील्यास साधारणपणे काळी पडते.

गणपा 23/03/2014 - 02:54
चटका करताना डाळ शिजवायची नाही? कच्च्याच वाटलेल्या डाळीवर नुसती फोडणी द्यायची? फोटो बाकी झक्कास. माझ्या पुरता बोलायचं झाल्यास मला उकडलेल्या कोथिंबीर वड्या जास्त आवडतात. पण वरुन फोडणी आणि ओलं खोबरं मस्ट.

इशा१२३ 24/03/2014 - 18:12
@गणपा:हो ..हा चटका असाच कच्च्या डाळीचाच करतात....आणि न तळताही या उकडलेल्या वड्या छान लागतात वरून फोडणी घालून. :-)

शिद 24/03/2014 - 18:29
मस्त दिसताहेत वड्या... मला चिक्कार आवडतात कोथिंबीर वड्या... आमच्याकडे वाफवून नंतर तव्यावर शॅलोफ्राय करतात पण वरून फोडणी घालून केलेल्या पहील्यांदाच पाहतो आहे. फर्माईश करायला हवी आता घरी...

In reply to by किसन शिंदे

सूड 04/04/2014 - 20:22
मस्तच दिसतायेत वड्या!! >>चिंचेचा कोळ आणि धने वापरले नव्हते. एकदा वापरुन बघा चिंचेचा कोळ, पुन्हा त्याशिवाय वड्या करायचा विचारदेखील करणार नाही. भरीस भर गुळाचा खडाही घाला एखादा.

इशा१२३ 04/04/2014 - 15:03
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! @किसन शिंदे..प्रतिसादबद्दल आभार.तुमच्या सौ.नी बनवलेल्या वड्याही छान दिसतायत.धने नाहि घातले तरी फार फरक पडत नाही.आणि चिंच आवडत नसल्यास थोडे आंबट दही घातले २ चमचे तरी चालते.वड्या जास्त कुरकुरीत होतात.:-) :)

सखी 04/04/2014 - 20:06
छान दिसतात वडया आणि चटका तर खासच एकदम हिरवागार, करुन बघायला पाहीजे आता. इतके दिवस फोटु दिसत नव्हते (बरच होत ते)आज अचानक दिसायला लागले.