ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द".
चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!.
हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील.
साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल.
एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा.
१) दुकानांवरच्या पाट्या
२) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस् करते" ई.
३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई.
४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड
५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती
तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !!
तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे !
https://www.facebook.com/groups/494409877351095/
आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील.
http://navin-marathi-shabda.blogspot.in/
म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!
याद्या
93726
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला उपक्रम !!!
माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा
अभिनन्दन
मला मदत करशील या ऐवजी सरसकट
जेवण
कौ शिकलेले लै हुशार
शुभेच्छा !!
छान आहे.
हा हा
In reply to छान आहे. by आदिजोशी
डोळागोळा
In reply to हा हा by मारकुटे
तूनळी - youtube
In reply to छान आहे. by आदिजोशी
मराठी शब्दच वापरायचे असं
मला फेसबुक साठी 'मुखप्रुष्ठ'
मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी
In reply to मला फेसबुक साठी 'मुखप्रुष्ठ' by अत्रुप्त आत्मा
"फेसबुक" हे इतर भाषांमध्ये
In reply to मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी by प्रचेतस
सहमत आहे.
In reply to "फेसबुक" हे इतर भाषांमध्ये by धन्या
ते अत्रुप्त आत्मा असल्यानं
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
अत्रुप्त आणि अतृप्त तसेच
In reply to ते अत्रुप्त आत्मा असल्यानं by प्यारे१
संस्कृतमधील ऋ या स्वराचा
In reply to अत्रुप्त आणि अतृप्त तसेच by धन्या
किंवा अजून सोपे उदा.
In reply to संस्कृतमधील ऋ या स्वराचा by बॅटमॅन
_/\_... दंडवत घ्या मालक...
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
धन्यवाद.
In reply to _/\_... दंडवत घ्या मालक... by शिद
आम्हाला आमच्या बाईंनी अश्या
In reply to _/\_... दंडवत घ्या मालक... by शिद
असेच म्हणतो.
In reply to _/\_... दंडवत घ्या मालक... by शिद
हे उच्चार कुमार सानूनं
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
आता वाळिंब्यांनी असली उदाहरणे
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
अर्थातच. त्याशिवाय लोकांना
In reply to आता वाळिंब्यांनी असली उदाहरणे by जातवेद
बहुत सुंदर !
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
"बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :)शाळा कादंबरीतली व्याक्रणाची
In reply to "फेसबुक" हे इतर भाषांमध्ये by धन्या
धन्या काका तुमचे बरोबर आहे.
In reply to "फेसबुक" हे इतर भाषांमध्ये by धन्या
@मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी
In reply to मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी by प्रचेतस
अरे....
गरज नाही !
खरंय.
In reply to गरज नाही ! by वेल्लाभट
म्हणणे अन बोलणे यातला फरकही
In reply to गरज नाही ! by वेल्लाभट
भावा,
In reply to म्हणणे अन बोलणे यातला फरकही by बॅटमॅन
खालील वाक्यांवर स्वतंत्र धागा
अजून काही रोजच्या वापरातले चुकीचे शब्द
असो
हिंदीच्या अतिप्रचाराबद्दल
In reply to असो by llपुण्याचे पेशवेll
भाषा सतत बदलत असते. विभक्ती
In reply to असो by llपुण्याचे पेशवेll
बरं
In reply to भाषा सतत बदलत असते. विभक्ती by मारकुटे
पैसे भेटले हा प्रयोग
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
गल्लत
In reply to पैसे भेटले हा प्रयोग by बॅटमॅन
विभक्तीच्या मुद्यावर सहमती
In reply to गल्लत by llपुण्याचे पेशवेll
पैसे नाय भेटले
In reply to विभक्तीच्या मुद्यावर सहमती by बॅटमॅन
सहमत. गावणे हाही शब्द आहेच.
In reply to पैसे नाय भेटले by पैसा
भाषाप्रभू मग हे काय आहे....
In reply to सहमत. गावणे हाही शब्द आहेच. by बॅटमॅन
केल्या गेला आहे इ.इ. ही
In reply to भाषाप्रभू मग हे काय आहे.... by सुहासदवन
कबुल.....
In reply to केल्या गेला आहे इ.इ. ही by बॅटमॅन
>>>भाषाभिमान नसल्यामुळे
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
पतंजलींचा उल्लेख बाकी एकदम
In reply to >>>भाषाभिमान नसल्यामुळे by मारकुटे
नागपुरी मराठी अशीच हिंदाळलेली
"डब"
मिस करणे =तु नसल्यामुळे
लूट, ठग, जंगल, गुरु, अवतार
चिमखडे बोल
बदलती भाषा
सहमत!!!!
In reply to बदलती भाषा by राही
भाषेतील बदल
In reply to बदलती भाषा by राही
स्रोत
In reply to भाषेतील बदल by प्रदीप
>>>मराठी साहित्याचा उगम स्रोत
In reply to स्रोत by राही
व्वा !!
In reply to >>>मराठी साहित्याचा उगम स्रोत by मारकुटे
गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे.....हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.ग्रेट !!
In reply to व्वा !! by प्रदीप
हा, हा..
In reply to ग्रेट !! by मारकुटे
खिक
In reply to हा, हा.. by प्रदीप
एक प्रमाण भाषा असणे आवश्यक
In reply to बदलती भाषा by राही
बास बास. माझा आक्षेप ज्याला
In reply to एक प्रमाण भाषा असणे आवश्यक by सुबोध खरे
>>>आपल्याला मराठी चांगली
In reply to एक प्रमाण भाषा असणे आवश्यक by सुबोध खरे
मारकुटे साहेब,
In reply to >>>आपल्याला मराठी चांगली by मारकुटे
+१
In reply to मारकुटे साहेब, by सुबोध खरे
सर्कारदर्बारची भाषा अन
In reply to मारकुटे साहेब, by सुबोध खरे
कायदेशीर मान्यता आणि
In reply to सर्कारदर्बारची भाषा अन by बॅटमॅन
होय शुद्धताच.
In reply to कायदेशीर मान्यता आणि by बाळ सप्रे
म्हणजे व्याकरणाचे नियम न
In reply to होय शुद्धताच. by बॅटमॅन
मान्यता नसलेली बोली फक्त
In reply to म्हणजे व्याकरणाचे नियम न by बाळ सप्रे
शुद्ध आणि अशुद्ध असे
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by बॅटमॅन
अंमळ गफलत झाली वाट्टे.
In reply to शुद्ध आणि अशुद्ध असे by बाळ सप्रे
विभक्तिप्रत्यय
पुनरेकवार अतिशयच सहमत.
In reply to विभक्तिप्रत्यय by राही
प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच
In reply to विभक्तिप्रत्यय by राही
फुसकी कारणे?
In reply to प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. अशाच वृत्तीमुळे
In reply to फुसकी कारणे? by राही
भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द
In reply to विभक्तिप्रत्यय by राही
प्रमाण भाषा इ.
In reply to भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द by बाळ सप्रे
लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे
In reply to प्रमाण भाषा इ. by राही
घालणे
In reply to लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे by बाळ सप्रे
साड्या वापरातून जायच्या
In reply to घालणे by राही
खरे तर
In reply to साड्या वापरातून जायच्या by बाळ सप्रे
>>> खरे तर साड्या वापरातून
In reply to खरे तर by राही
वापरातून जात चालल्या आहेत.
In reply to >>> खरे तर साड्या वापरातून by प्यारे१
अज्ञान?
१००००००००००००% सहमत. नवीन
In reply to अज्ञान? by राही
अबबब!
In reply to १००००००००००००% सहमत. नवीन by बॅटमॅन
मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची
In reply to अज्ञान? by राही
शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण
In reply to मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची by बाळ सप्रे
भाषेबाबत जास्त आग्रही असणार्
In reply to शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण by बॅटमॅन
शुद्ध आणि अशुद्ध असे
In reply to भाषेबाबत जास्त आग्रही असणार् by बाळ सप्रे
शुद्ध आणि अशुद्ध असे
In reply to शुद्ध आणि अशुद्ध असे by बॅटमॅन
भाषाशास्त्र असेदेखिल
In reply to शुद्ध आणि अशुद्ध असे by बाळ सप्रे
सहमत
In reply to शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण by बॅटमॅन
बदल
In reply to अज्ञान? by राही
सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत.पाकिस्तानी उर्दूबद्दल माहिती नाही. हिंदी चित्रपटांत हे शब्द सर्रास येत असल्याने, व पाकिस्तानीही ते बर्यापैकी बघत असावेत, त्यामुळे अशा एका शब्दाचा मीच अलिकडे येथील एका पाकिस्तान्याशी बोलतांना वापर केला आणि मला काय म्हणायचे आहे ते त्याला अगदी झटकन समजले. पण हा anecdotal evidence झाला. ह्यापुढे प्रत्यक्ष आपापसात बोलतांना हे लोक असे, मराठीतून हिंदी चित्रपटांपुरते गेलेले शब्द वापरतात का, ह्याबद्दल काही माहिती नाही. पण हे शब्द आता सर्रास हिंदी भाषेत गेले आहेत व हिंदीभाषिक जनताही ते नियमीत वापरते, ह्याविषयी मात्र मी साशंक आहे. पुन्हा माझा anecdotal evidence तरी मला हे दर्शवत नाही. वास्तविक हिंदी चित्रपटांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर प्रभाव अगदी चाळीशीच्या दशकापासून आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षातच आपले पुण्या- मुंबईकडील लोक इतके हिंदाळलेले का बोलू लागले, आणि तसेच लिहूही लागले, ह्याचे मात्र मलातरी सखेदाश्चर्य वाटत राहिले आहे. इतर भाषांतून आपण पूर्वापार शब्द स्वीकारत आलेलो आहोत. पण, ती प्रक्रिया इतक्या वेगाने झालेली नाही. तसेच आपल्या अंवतीभोवती जे असते, त्याचा आपल्या बोलण्याचालण्यावर परिणाम होणे साहजिक आहे. पण तरीही आपले म्हणून जे काही असते ते अगदी 'पातळ' करून टाकायचे का, हा प्रश्न आहे. मला वाटते ह्याला थोडी शिस्त, व आपल्याच भाषेचा रास्त अभिमान असणे जरूरीचे आहे. माझा मुलगा वयाच्या आठव्या वर्षापासून परदेशी वाढला,इंटरनॅशनल शाळेत जावयास लागल्यानंतर त्याच्या मराठीत कधीमधी चुकीच्या वाकरचना येऊ लागल्या, उदा. 'तो मला बसवर भेटला'. अशा वेळी त्याला सौम्यपणे 'मराठीत आपण असे म्हणत नाही,' असे सांगून आपण ते मराठीत कसे म्हणतो, हे सांगून सुधारणा करत राहिलो. माझ्याप्रमाणेच आमच्या येथील अनेक मराठी कुटुंबियांतील मुले अगदी नीट मराठी बोलू शकतात, ते बहुधा अशाच शिस्तीमुळे असावे. इतर भाषेतील विशेषनामे उगाच चमत्कारीक मराठीकरण करून वापरावीत (उदा. 'चेपू', 'तूनळी' इत्यादी) हे मलातरी खुळचटपणाचे वाटते. तसेच ज्या संकल्पनाच परकी आहेत, त्यांना त्या त्या भाषांतील मूळ नावांनीच संबोधावे, ह्याविषयी अजिबात वाद नाही. त्याचबरोबर मराठीतील काही शब्दांना नवे अर्थ देऊन ते वापरणे हेही बेजबाबदारपणाचे वाटते. फार पूर्वीचे सांगत नाही, अगदी ऐशीच्या दशकापर्यंत कुठलाही दर्जेदार कार्यक्रमही 'समाप्त' व्हायचा. (आठवा: "आजचा 'आपली आवड' हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात पुढल्या मंगळवारी, रात्रौ दहा वाजता"). आता गल्लीबोळातला कार्यक्रमही 'संपन्न' होतो. (पूर्वी आमची जीवने कुठल्या ना कुठल्या कारणाने संपन्न व्हायची). हीच गोष्ट 'प्रभावित' ची! 'आलेल्या पुराने अमूकेक क्षेत्र 'प्रभावित' झालेले आहे' म्हणे! तेव्हा भाषेच्या प्रवाही असण्याबद्दल तक्रार नाही. मात्र बेजबाबदार राहून आपण आपली कात भर्र्कन टाकणे कितपत रास्त आहे, ह्याविषयी दुमत आहे.प्रतिसाद आवडला
In reply to बदल by प्रदीप
मुंबई व आसपास
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिम्दीत बोलतात असे ऐकून आहे.माझा असाच अनुभव आहे. एका मुंबईच्या मित्राशी ह्या विषयावर अलिकडेच बोलत होतो. त्याने त्याचा मुंबईच्या आसपासच्या काही गावांतील स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या अनुभवानुसार तिथेही, तेथील स्थानिक गांवकरी, आपण मराठीरून प्रश्न विचरल्यावर, आपणास हिंदीतून उत्तरे देतात. मित्राचे म्हणणे असे की असे हिंदीतून बोलणे, हे आता गावांतून प्रतिष्ठेचे होऊ लागले आहे.बरेचसे प्रतिसाद आवडले
In reply to अज्ञान? by राही
या सगळ्या गदारोळात द्रविड
In reply to बरेचसे प्रतिसाद आवडले by पैसा
गंमत
In reply to बरेचसे प्रतिसाद आवडले by पैसा
हे मात्र खरं, आत्तच "ओसिअन
In reply to अज्ञान? by राही
मराठी शब्दांचा लोचा
राही आणि मारकुटे यांना धन्यवाद
बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन
जरा अवांतर
In reply to बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन by कौशिक लेले
युरेका...युरेका...युरेका...!
जोडजाळं
अता या शब्दावर माझा कॉपिराइट हां!!!छान उपक्रम!
दगडं, पोपटं, केसं, बेडकं -
काही नवीन शब्द
=))
In reply to काही नवीन शब्द by प्रसाद गोडबोले
आवडले.
In reply to काही नवीन शब्द by प्रसाद गोडबोले
मान्यता नसलेली बोली फक्त
मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.आशयाशी सहमत. पण खालील फरकासहः प्रमाणित भाषा: सांविधिक संस्थेने (statutory body) मान्यता दिलेल्या नियमाप्रमाणे वापरलेली वापरलेली भाषा. अप्रमाणित भाषा: प्रचलित असलेली पण प्रमाणित भाषेशी सुसंगत नसलेली भाषा. अशुद्ध भाषा: सांविधिक संस्थेने मान्यता दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न/दावा करून त्या बाबतीतल्या चुका असलेली भाषा. या संदर्भात माझे दोन पैसे: १. बोलीभाषा बोलीभाषा ही रोजच्या वापरातली आणि म्हणून अत्यंत प्रवाही असते. ती वापरली जाण्यार्या लोकांत रुजलेल्या सवयी, तत्कालीन प्रचलित आवडी-निवडी (इन थिंग,फॅड, इ); बोलण्याच्या सवयी (हेल, च/ज इ उच्चारण्याच्या पद्धती,इ); इ ने प्रचंड प्रभावित असते. या सर्व गोष्टी काळाबरोबर सतत बदलत असतात आणि त्यामुळेच बोलीभाषा प्रवाही (सतत बदलत राहणारी) होते. एक प्रकारे बोली भाषा ही सतत चालू अवस्थेतले काम (वर्क इन प्रोग्रेस) आणि त्याबरोबर होणारा प्रत्येक बदल त्वरित वापरात आणणारे काम असते. लोकांना पसंत पडलेले / उपयोगी वाटणारे बदल प्रचारात राहतात आणि तसे नसलेले आपोआप कमी कमी वापर झाल्याने प्रचारातून निघून जातात. वरच्या वस्थुस्थितीमुळे कोणतीही बोलीभाषा नियमांच्या एका चौकटीत बसवणे शक्य नाही ... तो एक निष्फळ प्रयत्न आहे. लोक तुमचे मत ऐकतील न ऐकतील, पण त्यांना सोयीचे / आवडेल तसेच बोलतील/ लिहितील. म्हणूनच, अ) बोलीभाषा दर २०-३० किलोमीटरवर वेगळी असते. (याचा अर्थ ती नकाश्यांवर आखलेल्या रेषांच्या पुढेमागे एकदम बदलत नाही, तर एकीतून दुसरीत लोकांच्या गरजेनुरूप सहजपणे रूपांतरित होत जाते.) तसेच, ब) ती कोणत्याही एका स्थानावरही कालप्रवाहाबरोबर सतत बदलत जाणारी असते. क) एवढेच काय तर एकाच स्थानावर (उदा गाव, शहर, भौगोलिक विभाग, इ) आणि एकाच काळी वेगवेगळ्या लोकसमूहातली बोलीभाषा वेगळी असणे सामान्य आहे. हे जाती-धर्माच्या विविधतेने भरलेल्या भारतात प्रकर्षाने दिसत असले तरी तितकीशी विविधता नसलेल्या इतर ठिकाणीही फार अभावाने आहे असे नाही. २. प्रमाण भाषा ही एखाद्या भाषेसाठी नेमलेल्या सांविधिक संस्थेने सद्य काळाकरिता नक्की केलेले नियम वापरून लिहिली-बोललेली स्थिर भाषा असते. याची काही प्रमाणात सॉफ्टवेअर प्रणालीच्या व्हर्शनशी तुलना होऊ शकते. आज जाहीर केलेले व्हर्शन त्यापुढचे व्हर्शन जाहीर होईपर्यंत स्थिर असते. याचा अर्थ भाषेची बदलण्याची प्रक्रिया थांबली असे नाही... ती सतत चालूच राहते. काही काळाने, बहुसंख्य लोकांनी बदललेल्या लिहिण्याच्या-बोलण्याच्या सवयींप्रमाणे झालेले बदल जेव्हा लक्षणीय प्रमाणात होतात तेव्हा प्रमाणित भाषेचे नवीनं व्हर्शन बनविणे भाग पडते. हे मराठीसकट सर्व वापरात असलेल्या भाषांच्या बाबतीत घडले आहे, घडत राहील. उदा. मराठीतले बदललेले र्हस्व-दीर्घ आणि अनुस्वारांचे नियम. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या गेल्या काही दशकांतील आवृत्त्या नजरेखालून घातल्या तरी इंग्लिश मध्ये झालेल्या अनेक बदलांचा पुरेसा पुरावा मिळेल. ३. भाषेचा वापर कशासाठी भाषा वापरली जाते यावर कोणती बोलीभाषा / प्रमाणित भाषा वापरायची आणि त्यांचे कोणते (प्रमाणित / अप्रमाणित) व्हर्शन वापरायचे हे बहुतेक वेळा नैसर्गिकपणे ठरते... आणि तेच योग्य आहे. उदा: कट्ट्यात मित्रांबरोबर गंमत म्हणून अप्रमाणित गावरान मराठी वापरणारा माणूस वरिष्ठ अधिकार्याबरोबर मराठी बोलताना प्रमाणित मराठी बोलला नाही तर आश्चर्य वाटेल नाही का? साधारणपणे भाषेच्या वापराचे खालील प्रमाणे दंडक आहेत / असावेतः अ) शासकीय / औपचारिक लेखन / बोलणे : प्रमाणित भाषा. ब) खाजगी / अनौपचारिक लेखन / बोलणे : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. क) साहित्य : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक तसे बदल करत बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. उदा. जुन्या संस्कृत नाटकांत सामान्य पात्रांच्या तोंडी (संस्कृत नाही तर) प्राकृत भाषा आहे... तसे नसते तर ते हास्यास्पद वाटले असते. कारण जगात कोणत्याही काळी कोणत्याही प्रदेशात १००% लोक प्रमाणित भाषा वापरत नव्हते / नाहीत / नसतील. तसेच ग्रामीण कादंबरीतल्या अशिक्षित पात्रांच्या तोंडी संस्कृतप्रचुर / प्रमाणित भाषा अवास्तविकच वाटेल. ३. परकीय भाषेचा हल्ला परकीय भाषेचा आपल्या भाषेवर हल्ला ही बहुदा "कोल्हा आला रे सारखी" आवई असते. मात्र या आवईमुळे काहीही फरक पडत नाही... तिचे महत्त्व फुसका समस्तरिय दबाव (इनइफेक्टीव्ह पियर प्रेशर) पेक्षा फार जास्त नाही. अ) आज इंग्लिश जगभरात ताकदवान भाषा म्हणून प्रचारात आहे ती तिचे उत्तम विपणन केल्यामुळे नाही किंवा तिच्या संरक्षणासाठी भाषामार्तंडांची फौज असल्यामुळे नाही तर तिच्या योग्य वापरामुळे होणार्या निर्विवादी आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांमुळे आहे. जर उद्या मराठीच्या बाबतीत असेच झाले तर मराठीच्या प्रचारासाठी दुसरे काही विशेष करणे जरूरीचे नसेल. ब) परक्या भाषेतले शब्द / शब्दरचना आपल्या भाषेने अंगीकृत करण्यात सारासारविवेकबुद्धी वापरणे नक्कीच आवश्यक आहे, पण हा मुद्दाही इतर काहीपेक्षा भावनिकच जास्त आहे. भाषा-भाषा प्रक्रिया सर्व भाषांत सर्वकाळ होत आलेली आहे व आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांच्या वस्तुस्थितीवर आधारितच ती सर्वस्वी अवलंबून आहे. दुसर्या भाषेमुळे आपली भाषा मलिन होईल हा दावाही तसा फोल आहे. कारण भाषा ही ती भाषा वापरणार्या लोकांची मालमत्ता आणि ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे. एखाद्या अनिष्ट गोष्टीची काही काळासाठी "हवा" तयार होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे, ना लोक त्यांना अयोग्य वाटणारे बदल स्वीकारतील, ना कोणी त्यांच्यावर ते लादू शकेल... लोकांना आवडतील / फायद्याचे असतील तेच बदल जीव धरतील / फोफावतील / शिल्लक राहतील. क) आजच्या जगतील कोणतीच भाषा स्वयंभू असल्याचा दावा करू शकणार नाही. जिला अनभिषिक्त जागतिक भाषा असे समजले जाते, त्या इंग्लिश भाषेत ८०% पेक्षा जास्त शब्द परकीय भाषांतून आलेले आहेत आणि त्यामुळे तिला "उधार-उसनवार भाषा (borrowed language) असे म्हटले जाते. cola (कोला) हा सर्वव्यापी आणि सर्वमान्य शब्द इंग्लिशने पश्चिम आफ्रिकेतील Temne (kola) आणि Mandinka (kolo) या भाषांतून उचलेला आहे. आश्चर्यचकित व्हायचे असेल तर, पुढचा दुवा नुसता वरवर चाळून पहा : इंग्लिशमध्ये उसने घेतलेले शब्द आणि त्यांचा मूळ भाषा इथे सापडतील.लैवेळा सहमत.
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय आवडला
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसाद आवडला
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
संपूर्ण सहमती!!
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे