Skip to main content

उमेद

लेखक फटू यांनी सोमवार, 06/10/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुझ्या जगात उलथापालथ होताना कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही, तुला आधाराची नितांत गरज असताना निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही, कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही, नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही, जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं, निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं, माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2636
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे कविता आवडली रे... अरे पण एव्हढ सुंदर लिहतोस आणि नाव फटू ? काही तरी मस्त धिनच्याक नाव घे की रे... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

किती छान ,आश्वासक लिहिलं आहेस...

विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे क्या बात है| मस्त आहे कविता. अशा आधाराची गरज अनेकदा भासते. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

फार सुंदर लिहिलेत. "..मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे" क्या बात है! बहोत खूब. येऊ देत अजुन. मुमुक्षु

मस्त च रे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मस्तच रे...
माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे
कधी येतो आहेस दुबईला? ऍट लीस्ट खांदा तरी पाठवून दे तुझा? ;) बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ना आम्हाला दुबईला येणं शक्य आहे ना आमचा खांदा पाठवणं... आमच्या आधाराची गरज दुबईच्या लोकांपेक्षा अमेरिकेच्या लोकांना जास्त आहे... :D (संगणक प्रणाली आधार विकासक) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

कोणीही सोबत नसेल तरी चालेल पण एक विश्वासाचा खा॑दा आणी उमेद हवीच. जबरदस्त मानल तुम्हाला

कोई जब तुम्हारा हृदय तोडदे.. तडपता हुआ जब कोई छोडदे तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिये.. या मुकेश च्या गाण्याची आठवण झाली.. कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

हेच म्हणतो... बिपिन.