बटाट्याच्या चाळीची 'बटाटा हाईट्स ' झाली काय?
तरीच म्हटलं इतके शोधूनही ती चाळ मला सापडली कशी नाही? ;)
अरूणराव ,म्हणजे आता तुम्हालाही स्वप्न पडायला लागली तर! छान आहे. :)
चालू द्या.
ओ वडुलेकर,
च्यायला, मी हे आधी कुठेतरी वाचलंय राव. कुठे लिहिलेलं सांगता का प्लिज?
लै लै डोकं खाजवलं, पण आठवायलाच तयार नाही.
बाकी, तुमचं भाईकाकांवर आणि त्यांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम दिसतंय हो :)
झकास! स्वप्नातही तुम्हाला भाईकाकांच्या लेक्खातल्या व्यक्ती भेटतात. भारीय राव. आम्हाला सालं स्वप्नं म्हणजे पेटंट...शाळेत गणिताचा पेपर चालु आहे..आणि एकही गणित आपल्याला सुटत नाहीय्ये. दुसरं म्हणजे गाडी चुकलीये.
अवांतरः सिडने शेल्डनचं 'टेल मी युअर ड्रीम्स' कस्स्लं खत्तर्रन्नाक्क आहे ना? हातात घेतलं की पुर्ण झाल्याखेरीज ठेववतच नाही!
तुम्ही मिपा वर दुसर्यांदा टाकलं का? की त्या तिथे पलिकडे लिहिलं होतं??
चलता है प्राजू! वडुलेकरसाहेबांना आपल्या मिपावर शिळंपाकं लेखन आणायचं असेल तरीही त्यांचं स्वागतच आहे!
इथे वडुलेकरसाहेबांसकट सर्व मनोगतींचं स्वागतच आहे! लेट देम सी द डिफरन्स! :)
आपला,
(एकेकाळचा मनोगती!) तात्या.
वाह !!!
मस्तच राजे !!!
आधी वाटल पून्हा रहस्य कथा की भूत कथा पन मस्त शेवट केलात !!!
येउ द्यात अजुनही !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मनोगतच्या दिवाळी अंकात होता का हा लेख?
अरे माझ्या देवा! असं आहे होय?
काय वडुलेकरसाहेब, साला आमच्या मिपावर शिळंपाकं वाढता काय? ठीक आहे, मर्जी तुमची...!
आपला,
(कट्टर मिपाकर) तात्या.
बाटाटा हाईट्सवर प्रतिक्रिया दिलेल्या सर्वमिपाकरांचे आभार.
ही कथा मी मनोगत २००७ च्या दिवाळी अंकात दिली होती.
हीच कथा मिपावर पुनःप्रकाशित केली याचे कारण असें की,
गेल्या आठवड्यात मी , 'अजि म्या बी बर्म पाहिले' या शीर्षकाखाली
पु.ल. देशपांडे यांच्या कांही व्यक्तिचित्रांच्या आधारे एक लहानशी स्वप्नकथा
प्रसिद्ध केली होती. ती आवडल्याच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या. पु.ल. देशपांडे
हे माझं एक श्रद्धास्थान. त्यांच्याच व्यक्तिचित्रांच्या आधारें आणखी कांही लिहावे अशी
मनस्वी इच्छा होती व तसे केले तर ते वाचकांना आवडेल ,कारण मूळ स्त्रोत - भाईंचे लेखन-
कमालीचे आवडणारे आहे, असा एक कयास होता व आहेही. याच सूत्राला धरून एक कथा किंवा
कथा मालिका मनात घोळते आहे. ती यथवकाश प्रसिद्धीला येईलच. दरम्यान ही पुर्वप्रकाशित कथा
भाईंच्या चाहत्यांना पुनः प्रत्ययासाठी द्यावी असे वाटून मी ती मिपावर दिली. यात कांही निराळा हेतू नव्हता.
अन्य स्थळांवरील अथवा जालनिशींवरील लेखने पुन्हा मिपावर प्रसिद्ध होणे ही कांही नवीन गोष्ट आहे असे नाही.
तथापि, ज्या कोणाला या शिळ्या पोळीचा चिवडा खाऊन अपचन अथवा अजीर्ण झाले असेल तर मी त्या सरवांची क्षमा
मागतो आणि नवीन कांही शिजवता आले तरच मिपाच्या 'मेनू कार्डावर' देईन, असें मी अफेडेव्हिट करीत आहे. ते मेहेरबानांस जाहीर होय.
पुन
अरुणराव,
हा लेख परत इथे टाकल्या बद्द्ल आभारी आहे.
अहो माझ्या सारखे मिपा वर बरेच जण आहेत कि ज्यांनी हा लेख पहिल्यांदा वाचलाय.
बाकी लेख खुप आवडला हे वे.सां.न.ल.
(भाई काकांचा पुतण्या)
प्रतिक्रिया
अरे वा!
आयल्ल्ल्ला........
मलाही.
अरे हे वाचल आहे मी.
तुम्ही
मस्त!!
वाह
मस्तच... आधी
मस्त आहे
:)
आधी वाचल
मी ही आधी
मनोगतच्या
बहुतेक हो
उत्तम कल्पना
+१
एक्स्प्लेनेशन / अफेडेव्हिट
आभार
झांटम्याटिक
आणि नवीन
पुन्हा वाचली.. पुन्हा आवडली :)
मस्त आहे कथा. मजा आली वाचताना
+१
मस्त ...
छान