✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अपवाद

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 10/07/2008 - 00:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4489 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Tue, 10/07/2008 - 00:24 नवीन

असं

:) असं कोणाला निरलस मदत करायच्या उद्देशाने खोटं बोलायला हरकत नसावी!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/07/2008 - 00:28 नवीन

अगदी खरंय..

प्रत्येक ठि़काणी अपवाद असतोच आणि हा अशा पद्धतीचा असेल तर मनालाही समाधान होतं. आपलं अभिनंदन. एका मुलीच्या मनाचं समाधान करू शकलात आणि एका आईच्याही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/07/2008 - 00:32 नवीन

गुड समरिटन

साक्षीजी... साक्षात भगवान कृष्णानेच म्हणले आहे, "हेतू शुध्द असेल तर कृती कोणतीही चालते." (खरंच म्हणलंय हो... संदर्भ वगैरे विचारू नका.) पण तुम्ही जे केलेत ते खरंच आवडलं. आपल्याला नेहमी अश्या कथा ऐकायला मिळतात. मागे मी रिडर्स डायजेस्ट मधे एक गोष्ट वाचली होती. एका माणसाची गाडी एका सुनसान हायवे वर बंद पडते. तिकडून एक म्हातारा जात असतो. तो गाडी थांबवून वगैरे त्याला मदत करतो. गाडी दुरूस्त करायला मेकॅनिकही घेऊन येतो. थोडीफार आर्थिक मदत करतो कारण याच्याकडे पुरेशी रोख रक्कम नसते. जेव्हा हा धन्यवाद म्हणतो आणि नाव गाव विचारतो (त्याला पैसे परत करायचे असतात) तो म्हातारा म्हणतो, 'पोरा, मला काही नको. पण एक वचन दे की तू पण कोणाला तरी अशीच मदत करशील, कमीत कमी एकदा तरी, आणि ती सुद्धा विनामूल्य. मलाही कोणीतरी एकदा मदत करून अशीच अट घातली होती.' बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Tue, 10/07/2008 - 04:32 नवीन

चांगले आहे

विचार सुचून त्यावर अमल करण्याचा वेग आवडला.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/07/2008 - 07:01 नवीन

गुड वन

साक्षीजी हा अपवाद आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 10/07/2008 - 07:25 नवीन

खरये !!!!

साक्षीजी !!! अपवाद आवडला !!! थोडे खोटे बोलल्याने जर दुसर्‍याला बरे वाटणार असेल तर काही हरकत नसावीच !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 10/07/2008 - 07:35 नवीन

'संवेदना'

वपुंची ' संवेदना' नांवाची कथा आठवली. एका मुलीला धीर देण्याचा वेगळा पण छान प्रयत्न. आपले कौतूक!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/07/2008 - 08:03 नवीन

साक्षिदेव

साक्षिदेवा, सुंदर कथन...! अगदी हटकून मराठी शब्द वापरले आहेस याचे कौतुक वाटले. "उत्सर्जनाचे नमुने" हा शब्द तर खासच! :) असो, ईश्वर करो आणि नीताला उत्तम बरे वाटो हीच प्रार्थना... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/07/2008 - 08:13 नवीन

आवडलं...

साक्षीजी, आवडला अपवाद. आपण खरंच त्या मुलीला आणि तिच्या आईला, अत्यंत आवश्यक असा, मानसिक आधार दिलात. हा तुमचा गुण इतरांनी शिकण्यासारखा नक्कीच आहे. (मराठी भाषेच्या आग्रहा इतकाच). अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/07/2008 - 10:49 नवीन

साक्षीजी, ख

साक्षीजी, खरंच तुमचा अपवाद आवडला. आणि योग्य वेळी योग्य गोष्ट सुचणंही महत्त्वाचंच ... मराठी भाषेच्या आग्रहा इतकाच किंवा काकणभर जास्तच, पण कमी नाही.
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ कार्टा Tue, 10/07/2008 - 12:59 नवीन

आवडलं...

तुमचे प्रसंगवधान आणि हजरजबाबीपणा खूप आवडला.... आणि याला खोटे बोलणे म्हणत नाहीत, समोरच्या व्यक्तीला धीर देण्याचा तो एक मनापासून केलेला प्रयत्न असतो. अवांतरः आपण शाळेत केलेले उपद्व्याप यासंबंधी एखादा नवीन धागा सुरु करायला हरकत नाही..... मंडळी तुम्हाला काय वाटते??
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/07/2008 - 13:04 नवीन

क्या बात

क्या बात है! साध्य महत्वाचे. साधन नाही. साधन शुचितेपायी साध्य भरकटता कामा नये. असो. उत्तम लेख. नाना
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 10/07/2008 - 13:29 नवीन

वा..

अपवाद आणि त्याच बरोबर प्रसंगावधान आवडलं. त्याक्षणी त्या मुलीला मानसिक आधाराची जी गरज होती ती त्यातून पूर्ण झाली. स्वाती
  • Log in or register to post comments
र
राम दादा Tue, 10/07/2008 - 15:08 नवीन

खुप छान..

आपण असे जगावे ..कि आपल्यामुळे दुसर्‍यांना आनंद मिळावा..त्रास कधी होऊ नये.. तुम्ही त्या मुलीला जो धीर दिला ..तो अप्रतिम प्रयत्न आवडला... राम दादा..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/07/2008 - 18:36 नवीन

मनोकायिक उपचाराचे तात्काळ प्रात्यक्षिक झाले!

मनाने एखाद्या गोष्टीचा विश्वास धरला की शरीर त्यामागे जाते ह्या सूत्राचा प्रसंगावधानाने केलेला वापर स्तुत्य! (खुद के साथ बातां : रंग्या, हवे असलेले सगळेच्या सगळे मराठी शब्द आठवले की कसलं मस्त वाटतं ना? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा