कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
बर्याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
पार्श्वभूमी:
हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. 'अॅप्पल स्ट्रुडेल' ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे. पण मलिबूने त्यांचे एक व्हेरिएशन मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल बनवले, अतिशय मर्यादित साहित्याने. मग मीही त्याला एक रमचा ट्वीस्ट देऊन माझे व्हेरिएशन बनवले. रम अशासाठी की कॉकटेल जरा 'कडक' व्हावे. :)
अॅप्पी फीझच्या कार्बोनेटेड इफ्फेक्टमुळे आणि त्याच्या रंगामुळे हे व्हेरिएशन मस्त शॅँपेनसारखे दिसते आणि मालिबूच्या मखमली चवीमुळे लागते देखिल. त्यामुळे ह्यासाठी लागणारा ग्लास मी वाइन ग्लास वापरला! (खरेतर शॅँपेनफ्लुट वापरायला हवा, पण सध्या कलेक्शनमध्ये नाहीयेय)
कृती:
ग्लासमध्ये 2/3 बर्फ (क्रश्ड आइस) भरून घ्या.
आता त्यात अनुक्रमे मालिबू, व्हाइट रम, आणि अप्पी फिझ ओतून घ्या.
आता सफरचंदाचा काप सजावटीसाठी ग्लासाच्या कडेला लावून घ्या.
अतिशय मादक आणि चित्ताकर्षक 'मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल' तयार आहे :)

| प्रकार | मालिबू बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| व्हाइट रम | १ औस (३० मिली) |
| मालिबू | १ औस (३० मिली) |
| अॅप्पल फीझ | ३ औस (९० मिली) |
| बारीक तुकडे केलेला बर्फ | |
| ग्लास | वाईन ग्लास |
वाचने
8642
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
व्वा व्वा... जबरदस्त दिसतंय
आहाहा ! भारी प्रकार आहे.
जून -जुलै मध्ये पुण्याला येत आहे.......
भिंतीच टेक्स्चर बदलल्य का?
मस्त !
In reply to मस्त ! by गणपा
साहजीक आहे....
In reply to मस्त ! by गणपा
तो 'ओलाचिंबं' होऊनच आला असावा
सोत्री एक शंका विचारु का?
In reply to सोत्री एक शंका विचारु का? by विजुभाऊ
विजुभौ, खरे सांगु कं? प्रश्न
In reply to विजुभौ, खरे सांगु कं? प्रश्न by सोत्रि
लत्ता प्रहार = किक
एकदम छान ... जबरदस्त .. असल
जय हो.
मस्त फटु
In reply to मस्त फटु by पैसा
तो काप बायकोने केलाय,
In reply to तो काप बायकोने केलाय, by सोत्रि
तरीच...
सोनरे पाणी खुणावते आहे !
कल्ला आहे कॉकटेल !!