मराठी लेखनावर इंग्रजीचा प्रभाव
नमस्कार,
मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द, ते शोधताना संस्कृतातील जड शब्दांचा होणारा वापर या आणि अशा बर्याच मुद्द्यांवर बर्याच ठिकाणी बर्याच वेळा काथ्याकूट झालेला आहे. तरीही या नवीन काथ्याकूटास सुरवात करण्याचे मागील काही दिवस विचार घोळत होते. याचा उद्देश वर सांगितल्यापैकी पहिला म्हणजे मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव आणि प्रामुख्याने लेखनावरील प्रभाव हा आहे.
हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटण्याचे कारण म्हणजे अलिकडे मिपावर आणि इतरत्र वाचण्यात आलेले काही लेख आणि प्रतिसाद. सर्वात आधी एक महत्वाचे स्पष्टीकरण. इथे सांगितलेली उदाहरणे ही अत्यंत प्रातिनिधिक अशी आहेत. यात कोणावर वैयक्तीक टिका करण्याचा हेतू नाही.
सर्वप्रथम मिपाकरचे झालेले 'मिपाकर्स'. तात्यांनी एका लेखात 'लँड होणे' असा शब्द वापरला होता. (त्यावर ऋषिकेशने एक प्रतिसादही दिला होता. खरं तर तेंव्हाच हे सगळं डोक्यात आलं. ) पेठकरकाकांनी एका प्रतिसादात 'लेख फोकस्ड हवा होता' म्हटले होते. अगदी कालपरवाच धमुने 'अपील होणे' ला मराठी शब्द विचारला होता. आणि म. टा. मध्ये एका अग्रलेखात 'हार्डकोअर' दहशतवादी असा उल्लेख वाचण्यात आला. तसाही म. टा. चा याबाबतीत काही चांगला लौकिक नाही. (हार्डकोअर साठी कट्टर असा शब्द वृत्तपत्रीय भाषेत कितीतरी वर्षांपासून वापरला जातो. ) असो.मिपावर लिहिणारे, वाचणारे सगळेच मराठीप्रेमी आहेत याबद्दल शंकाच नाही. आणि आपण दिवसातून एकतरी चक्कर मिपावर टाकतोच. ज्यामुळे मराठी वाचणे लिहीणे अशा गोष्टी होतात.
मराठी बोलताना इंग्रजी शब्द टाळणे हे मला वाटते आता थोडे अवघड झाले आहे. मुख्य कारण म्हणजे जिथे आपण काम करतो त्या जागा. तिथे इंग्लिश मध्ये बोलावे लागत असल्याने आपल्या मराठी बोलण्यावर त्याचा प्रभाव पडणे अगदी साहजिक आहे. इथे थोडेसे मागे वळून पाहिले तर लक्षात येईल की आपल्या वडील, आजोबा यांच्या काम करण्याचा जागा या सरकारी ऑफिस, बँका, शाळा, पोष्ट अशा असल्यामुळे तिथे मराठीच बोलले जात असे. आता आपण दिवसातून दहा दहा तास ज्या ठिकाणी असतो तिथे जर सतत कानावर आणि बोलताना इंग्रजीच येत असेल तर आपल्याला त्याची थोडी सवय होणारच.
याच संदर्भात दुसरा मुद्दा असा की बोलताना आपल्याला विचार करायला कमी वेळ मिळतो. त्यामुळे जिभेवर रुळलेले शब्द पटकन तोंडात येतात. तेंव्हा आपण अर्थाकडे ज्यास्त लक्ष देतो आणि समोरच्याला आपण बोलतो ते कळले की नाही हेच महत्वाचे ठरते.
माझा या चर्चाप्रस्तावाचा रोख हा मराठी लिखाणामध्ये होणार्या इंग्रजी शब्दांच्या वापरावर आहे. लिहिताना आपल्याला थोडा वेळ नक्कीच असतो ज्यात बरोबर मराठी शब्द शोधून लिहिता येईल. हे काम थोडे वेळखाऊ आणि कष्टाचे आहे हे मान्य. आणि लिहिताना सुद्धा वाचणार्याला कळंल की झालं असा मुद्दा ही मांडता येईल. पण जर हे कष्ट आपण आत्ता नाही घेतले तर असे बरेच शब्द आपल्याला आठवणार नाहीत. हा धोका बराच मोठा वाटतो. त्यातून आपण नियमीतपणे मराठी लिहितो वाचतो तरीही आपल्याला काही शब्द आठवत नाहीत. बाकीच्यांचा विचार केला तर आणखी मोठ्या प्रमाणात हा धोका जाणवतो. अर्थात भाषेचे प्रवाहीपण आणि बोलल्या जाणार्या भाषेचे लिखाणात पडणारे प्रतिबिंब असेही मुद्दे आहेत. पण तसे लिखाण हे वातावरण निर्मिती साठी, संवादापुरतेच असावे.
मला वाटतं, हे मराठी शब्द आठवणे तसं फारसं अवघड ही नाही. आणि त्यासाठी कुणी भाषापंडीत असण्याची ही गरज नाही. शिवाय जे शब्द इंग्रजीमधूनच आलेले आहेत (टी व्ही, फ्रीज वगैरे) त्यांना अवजड संस्कॄतमधून उचललेले शब्द वापरण्याचाही माझा अट्टाहास नाही. हे शब्द अगदी सोपे असेच. फक्त नेहमीच्या वापरापासून किंवा बोलण्यापासून म्हणा थोडे लांब गेलेले. थोड्या विचाराने सुचणारे. फक्त त्यासाठी जिभेवर रुळलेले इंग्रजी शब्द वापरण्याचा मोह टाळायला हवा. हा मोह सर्वांना न पडो हीच सरस्वतीचरणी कलत्रींसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे या मातृमांगल्याच्या महामहोत्सवात माझी प्रार्थना. या विषयावर तुम्हा सर्वांचे विचार ऐकायला नक्कीच आवडतील.
जाता जाता मला सुचलेले आपण वापरतो असे काही इंग्रजी शब्द आणि त्यांना मराठी पर्याय.
actually ------------- खरं तर,
obviously ------------- साहजिक
complicated -------------- कठीण,
परवाचाच incident ------------- परवाचीच गोष्ट
incidently -------------- योगायोग
casually -------------- मजेत, सहज
जसे सुचतील तशी यात भर टाकेनच.
- ओंकार
लेखनविषय:
वाचने
8498
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
खरं आहे
काही सुचवण्या आणि स्पष्टीकरणे..
In reply to काही सुचवण्या आणि स्पष्टीकरणे.. by प्रभाकर पेठकर
ड्रायव्हींग
In reply to ड्रायव्हींग by ३_१४ विक्षिप्त अदिती
दूसर्याचे वाक्य...
In reply to दूसर्याचे वाक्य... by प्रभाकर पेठकर
चारचाकी स्वयंचलित वाहन
In reply to काही सुचवण्या आणि स्पष्टीकरणे.. by प्रभाकर पेठकर
खुलासा
In reply to खुलासा by मी_ओंकार
स्पष्टीकरण...
नुसताच लेखनावर नाही तर बोलण्यावर सुध्दा.
छानच.
योग्य मुद्दा!
In reply to योग्य मुद्दा! by प्रमोद देव
विशेषनामांचं भाषांतर
In reply to योग्य मुद्दा! by प्रमोद देव
पूर्णपणे सहमत
खरं आहे तुझं!
माझे शब्द...
मला काय वाटतं.....
नमस्कार
In reply to नमस्कार by गणा मास्तर
अचूक
In reply to अचूक by मी_ओंकार
भारत,
विद्यार्थी
In reply to विद्यार्थी by धनंजय
सहमत पण ...
In reply to सहमत पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
पान्हा
In reply to पान्हा by धनंजय
पाना, पान्हा, पन्हा?
In reply to पाना, पान्हा, पन्हा? by ३_१४ विक्षिप्त अदिती
१_६अदितींचे बरोबर
In reply to पाना, पान्हा, पन्हा? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म...
In reply to पाना, पान्हा, पन्हा? by ३_१४ विक्षिप्त अदिती
पन्ना ???
In reply to पन्ना ??? by मी_ओंकार
थोडं अवांतर
In reply to थोडं अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हीरक-पन्नग
In reply to पाना, पान्हा, पन्हा? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजून एक पनाह
In reply to अजून एक पनाह by मुक्तसुनीत
बरोबर
आपण बुरसट हो!
In reply to आपण बुरसट हो! by सर्वसाक्षी
असे
In reply to आपण बुरसट हो! by सर्वसाक्षी
मला असं वाटत नाही.
In reply to मला असं वाटत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
काही