मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द्राक्षांचा मुरांबा (मुर द्राक्षं)

अनन्न्या · · पाककृती
साहित्यः दोन वाट्या आंबट द्राक्षं, दोन वाट्या साखर, दोन लिंबांचा रस, दोन-तीन लवंगा, वेलची दाणे, पाणी. कृती: द्राक्षं स्वच्छ धुवावीत. दोन वाट्या साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकल्यावर पसरणार नाही, इतपत पाक घट्ट झाला की त्यात धुतलेली द्राक्षं, लवंगा, वेलची दाणे घालावेत. muramba पाक परत शिजत ठेवावा. द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो. तो पुन्हा डीशमध्ये पसरणार नाही, इतपत घट्ट करावा. पुरेसा घट्ट झाल्यावर गॅस बंद करून दोन लिंबांचा रस त्यात मिसळावा. muramba गार झाल्यावर तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरावा. muramba

वाचने 19399 वाचनखूण प्रतिक्रिया 42

इशा१२३ Tue, 03/25/2014 - 17:15
द्राक्षांचा मुरांबा नविनच प्रकार कळला..फोटोतले द्राक्ष आणी मुरांबा दोन्हीही छान!

रेवती Tue, 03/25/2014 - 17:18
वेगळाच प्रकार समजला. पहिल्या फोटोत सगळे रंग मस्त आलेत की लगेच हात लावावासा वाट्टोय. एक शंका आहे. जर द्राक्षे आंबट घ्यायची आहेत तर पाकात पुन्हा लिंबू कशाला पिळायचे?

In reply to by रेवती

अनन्न्या Tue, 03/25/2014 - 20:09
लिंबामुळे पाकाला चांगली चव येते. द्राक्षांच्या आंबट्पणावर लिंबाचे प्रमाण बदलायचे.

विजुभाऊ Tue, 03/25/2014 - 18:12
आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली द्राक्षांचा सीझन आहे पण आता आंबट द्राक्षे शोधणे आले
. इंडिया स्टोअर्स मधे बघ ना यशो. नक्की मिळतील तिथे. मला गेल्या वेळेस ऑर्डर करावी लागली होती. पण्या वेळेस नक्की मिळतील

अनन्न्या Tue, 03/25/2014 - 20:07
@यशोधरा, अगं टोचे मारायला नाही लागत, अक्षरशः बेदाणे होतात त्या द्राक्षांचे, देठाकडून पाक शिरतो त्यात. @ पिंगू, मी तयार मुरंब्याचा फोटो टाकलाय तसा रंग आला की मुरांबा चांगला टिकतो, कमी कढला तर मात्र नाही टिकत! द्राक्षं गोड मिळाली तर मात्र लिंबाच्या रसाच्रे प्रमाण वाढवा, पाकाला आंबटपणाची चव चांगली वाटते.

पैसा Fri, 03/28/2014 - 11:27
डिट्टेल पाकृ आणि सुरेख फोटो! चव तर छान असणारच!

nemake_va_mojake Tue, 01/25/2022 - 22:19
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर