Skip to main content

दल(ब)दल

लेखक जयनीत यांनी शनिवार, 22/03/2014 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
" मला माहीत होतं हा प्रश्न विचारल्या जाणारच! " पत्रकारांचा प्रश्न ऐकून नेताजी किंचितही विचलीत झाले नव्हते . " बघा माझ्यावरचा दलबदलूपणाचा आरोप हा काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत माझे विरोधक हा निराधार आरोप माझ्यावर नेहमीच लावत असतात, त्यात काहीही तथ्य नाही. उलट असल्या आरोपांनी माझी जनतेप्रती निष्टाच सिद्ध होत नाही का? तुम्हीच सांगा प्रत्येक निवडणुकीत जनता वेगवेगळ्या पक्षाला निवडुन देते, दर निवडणुकीत जनतेचा कल बदलतो त्यात माझा काय दोष? आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी जनतेशी नाळ जुळलेला एक समान्य कार्यकर्ता आहे " नेताजींच्या चेह-यावर पुनश्च चिरपरिचित हास्य आले. टाळ्यांचा गडगडाट झाला. जुन्याच ' निष्ठावंत' कार्यकर्त्यांच्या साथीने नवीन चिन्हाचा प्रचार सुरु झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2505
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

:) चिन्ह बाजूला सारल्यावर जी माणसं उरतात ती ओळखता-पारखता आली म्हणजे झालं. बाकी राजकारणातलं मला फारसं काही कळत नाही. त्यापेक्षा अंकगणित सोपं! निदान दोन अधिक दोन चारच येतात. या सारख्या बातम्या वाचल्या की, मग आपण राजकारणात अडाणी आहोत याची खात्रीच पटते. मतदार संघातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांचे स्वार्थ कुठे आणि कसे गुंतलेले असतील हे ओळखणं इतकं सोप असतं तर आज आपणच नेताजी झालो असतो की. :)

वर्षभरा पूर्वी हिंदीत ही लघुकथा लिहिली होती पण त्याचा अनुवाद मला स्वत:लाच जमलेला दिसत नाही. प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद.

मग ती मूळ लघुकथा इथे देऊन बघा :) कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर यात कथेसारखा पंच फारसा जाणवला नाही. अनुवादात बरेचदा गंडायला होते, मग भले स्वताच्या कथेचा का करत असेना.

अभिषेक अभिनंदन आणि धन्यवाद ''''''''''लेकीला आशिर्वाद देणार्‍या सर्व ताई माई दादा आक्का काका मामा आत्या मावशी अन आज्जी आजोबांना मनापासून धन्यवाद '''''''''''' तुमचा धागा वाचत आहे. अभिनंदन. अन प्रामाणिक मत प्रदर्शनाबद्दल धन्यवाद. अनुवाद हे अतिशय गंभीर काम आहे. ते प्रत्येकालाच जमेल असे नाही, अन लघुकथेत तर एखादाही शब्द कमी जास्त झाला किंवा नेमका मिळाला नाही तर सा-या कथेचे संतुलन बिघडतं अन सगळी गडबड होते. सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.

मला वाटते भारतातील राजकारणात सर्वप्रथम प्रसिद्धीस आलेला शब्दप्रयोग हा, "आयाराम-गयाराम" होता. कोण नंतर यशवंतरावांमुळे "स्वगृही येणे" हा दलबदल-बदल संदर्भात (कु)प्रसिद्ध झालेला वाक्प्रयोग आहे... बाकी सध्या विशेष करून महाराष्ट्रात दलबदल पणावरून फारच खुळचटपणा चालू आहे असे वाटते... :(

भारतात पक्षांतराचा विक्रम कर्नाटकचा माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा किंवा चरणसिंगांचा सुपुत्र अजित सिंग या दोघांपैकी कोणाच्या तरी नावावर असणार. या दोघांनी इतक्या वेळा पक्ष आणि निष्ठा बदलल्या की आपण नक्की कोणत्या पक्षात आहोत हे त्यांना स्वतःला सुद्धा आठवत नसावे.