Skip to main content

ये क्या रे, घोडा बोला... फिर चतुर बोला... फिर घोडा....

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 20/03/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील एक एक मजेशीर घटनांचा संदर्भ लावताना वात्रटपणाची उबळ येते. 1 पडोसन मधील स्वामी पिलैची सूर पकडायची तारांबळ आठवते. त्याची तिरपिट झालेली पाहून... आजकाल एकेकाळी विलक्षण लोकप्रिय नेत्यांची तळ्यात का मळ्यात अशी नाचानाच पाहून मजा वाटते. नातवंडांना पंचवंडांना खेळवायच्या आयुष्याच्या वळणावर पुन्हा विवाहाची हुक्की येणारा बाप जसा घरच्यांच्या अवमानाला कारणीभूत होतो तसेच काहीसे - इतके करून जर पदरात काही पडले नसेत तर - हे नाचरेपण वाटते. बर या अशा धेंडांना नव्या मंत्रीमंडळात खाती तरी कुठली देणार? उपद्रव मुल्य पाहता अशांना पाडणेच योग्य. असे समजदार मतदार ठरवतील तर किती बरे होईल.... मतदार काय करतील ते करतील पण इथल्या सदस्यांना काय वाटते हे कळले तरी खूप....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3070
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मला परवा इथलीच एक चर्चा वाचताना अगदी असाच मेहमुद आठवत होता. फिर बोला....घोडा बोला...ये सूर किधर जी...

समजदार मतदार आणि धेंडे याचे प्रमाण बदलत आहे . १)बरेच मतदार आपण समजदार ठरवतो ते हल्ली मतदान करतच नाहीत . २)इतर क्षेत्रांतले श्रीमंत निवडून येण्याच्या विवंचनेत असतात कारण त्यांच्या वाटेला इंटैक्सवाले जात नाहीत . ३)मतदार संघातली एकगठठा मते कोणत्या भागातून येणार आहेत ते मागच्या निर्णयातून ( प्रत्येक पेटीतली) माहीत असते ."त्या" प्रकारचा उमेदवार पक्ष लादतो आणि तोच निवडून येतो .४)आताचे खासदार ज्यांनी दिल्लीतल्या खुर्चीचा अनुभव एकदा घेतलाय ते पुन्हा धडपडणारच ,तुम्हाला होणाऱ्या उपद्रवाचा कोण विचार करतो ?

माझ्या मते या गाण्याची सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे: उस नारी का दास ना बन, जो राह चलत को राह भुलाए (जा रे नाले में जा के तू मूंह धो के आ...)

In reply to by आदूबाळ

या धाग्याच्या संदर्भातील नारी ही सत्तेची खुर्ची आहे. या नारीचे दासच अशी काही जरठ खोंडांची गणती आहे.

या वेळचे दोन ठळक उमेदवार मोदी आणि केजरीवाल . त्यांची व्यंगचित्रे पाहून हसायला येतं . दोन महिन्यांपूर्वी के०शिंकले तरी मोठी सर्दीची लाट येत होती .( =युरोपला शिंकजरी आली तरी अमुक देशाला सर्दी होते च्या चालीवर) . आता मात्र यांनाच थंडीवाजून एक गमछा गुंडाळून त्यावर ती घोषवाक्यांची टोपी घालून चतुर आणि घोडा छाप दिवसाला दहा आरोप चालू .परवा एका पेपरात ही व्यंचि आणि त्याचा कोल्हा होतांना दाखवला होता . अर्थात सुंदरी (=खुर्ची) मिळवायची आहे ना .