Skip to main content

केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 16/03/2014 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे. ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले. आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात. केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच..................... त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे. नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे. केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत. त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे. आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे. भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे. सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का हेच कळत नाही आहे ता.क आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का तुम्हाला काय वाटते

वाचने 57841
प्रतिक्रिया 258

प्रतिक्रिया

निनाद ह्यांनी हे जे काही लिहिले आहे त्याचा प्राकृत मराठीत कुणी तर्जुमा करेल का? कारण एकामागोमाग एक येणारी असंबद्ध वाक्ये अर्थभंग करतात. कारण पहिलेच वाक्य बघा- जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता नक्की काय म्हणायचे आहे? तसेच दुसरे वाक्य- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न "बहुसंख्य खासदार निवडून आणून" अधिक सुकरतेने साध्य होईल असे नाही का वाटत? तुम्हाला नक्की प्रॉब्लेम कशाबद्दल आहे- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल? मला वाटते- दुसर्‍या गोष्टीबद्दल असावा कारण त्याने भाजपच्या उद्देशाला सरळ छेद जातो! ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले. आता केजरीवालना कुठून उभे राहायचे आहे ते त्यांना ठरवू द्या की! नाही म्हणजे, केजरीवालांनी निनाद रा. जर्मनीखुर्द ता. युरोप यांजकडे याबाबत विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! "महानगरपालिका- उंदीर मारणे विभाग" इ.इ. मनात आले या निमित्ताने! .२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे या वाक्याचा अर्थ लावायचा यथाशक्ति प्रयत्न केला बराच वेळ- त्यातून जे कळलं त्याबद्दल लिहितो- वाराणसी हा तुम्ही म्हणता तसा भाजपाचा गड नाही- तुमचेच भाजपमित्र सहकारी श्री क्लिंटन यांनीच देलेल्या आकडेवारीनुसार भाजपाची मतांची टक्केवारी १९९१ सालापासून सातत्याने कमी होते आहे आणि गेल्या निवडणूकीत अवघा २.६% चाच फरक होता. त्यामुळे, आपण ज्याला "राखी सावंत" मानता त्याने काही एक विचार करुन वाराणसी निवडले आहे ते दिसते. पुढच्या वेळी अधिक अभ्यासाची अपेक्षा आहे आपल्या सारख्या तज्ज्ञांकडून! ;-) बाकी तुमच्या या भोंगळ धाग्याची आणि त्याहूनही हास्यास्पद युक्तिवादाची धिंड काढायला चिक्कार जागा आहे पण तेव्हढा मजकडे वेळ नाही त्यामुळे तुम्हाला "मिपावरचे दिग्विजय सिंह" असा पुरस्कार घोषित करुन मी आपली रजा घेतो! :D

In reply to by बाळकराम

@आता केजरीवालना कुठून उभे राहायचे आहे ते त्यांना ठरवू द्या की आता केजू आम आदमी साठी पक्ष काढतात तेव्हा आम आदमी म्हणून त्यांच्यावर मत केले तर बालकाला का बरे राग आला. निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व कसे लिहावे ह्यांची विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! "महानगरपालिका- उंदीर मारणे विभाग" इ.इ. मनात आले या निमित्ताने! @- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल? केजू ने टीम अण्णा ची फारकत घेऊन राजकारणात प्रवेश घेतला आता ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत , त्यांना नुकतेच दिल्ली येथे मिळालेले यश पाहता त्यांनी दिल्ली येथून निवडणूक लढवली असती तर नुसती त्यांचीच नाही तर त्यांच्या पक्ष्याच्या विजयाची शक्यता वाढली असती. पण त्यांनी दिल्लीकरांना वार्यावर सोडून राष्ट्रपती राजवट आणली ह्याचा विपरीत परिणाम त्यांना दिल्लीत दिसून येईल , ह्या आधी अनेक विषयावर मी जेव्हा मिपावर लेख लिहिले आहेत व त्यात भाकिते वर्तविली होती ,ती बहुतेक सर्व खरी ठरली आहेत. @- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल? केजू ने टीम अण्णा ची फारकत घेऊन राजकारणात प्रवेश घेतला आता ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत , त्यांना नुकतेच दिल्ली येथे मिळालेले यश पाहता त्यांनी दिल्ली येथून निवडणूक लढवली असती तर नुसती त्यांचीच नाही तर त्यांच्या पक्ष्याच्या विजयाची शक्यता वाढली असती. पण त्यांनी दिल्लीकरांना वार्यावर सोडून राष्ट्रपती राजवट आणली ह्याचा विपरीत परिणाम त्यांना दिल्लीत दिसून येईल , ह्या आधी अनेक विषयावर मी जेव्हा मिपावर लेख लिहिले आहेत व त्यात भाकिते वर्तविली होती ,ती बहुतेक सर्व खरी ठरली आहेत. असो ह्या निमित्ताने तुम्ही वेळा वेळ काढून मिपावर लिखाण केले ह्याबद्दल एक आभासी मफलर आपणास मी घोषित करत आहे. पुढील मिपा कट्टा आपण फंड रेजिंग इवेन्ट साठी लवकरात लवकर करूया.

In reply to by निनाद मुक्काम …

निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व कसे लिहावे ह्यांची विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! निनाद- निदान टोमणे तरी स्वतःचे ओरिजिनल मारा राव! माझेच उसने घेउन मलाच काय मारतो!! :D आणि केजरीवाल/मोदी आणि कुणी फाटका निनाद एकच वाटतं- उंदीर मारणे विभाग म्हणायला!! असो- तुमचा दोष नाही तो- तुमच्या "पंचतारांकितनगरी"ला भेट दिली आणि सगळा उलगडा झाला! असो, असेच कष्ट करा आणि (कधीतरी) मोठे व्हा! तुम्हाला एकदा सुसंगत विचार करता यायला लागला आणि नीट मराठीत लिहिता यायला लागलं की आपण चर्चा करुच, तोपर्यंत तुमची भाकिते करत राहा. असो, आभार :D

@तेव्हढा मजकडे वेळ नाही आपण जे लिहितो त्यावर जर ठाम राहता येत नसेल तर काही लिहिण्यापूर्वी किमान विचार करावा . तुमच्याकडे किती फावला वेळ आहे हे ज्याला तुम्ही काहीवेळा पूर्वी दिग्गी राजा अशी उपाधी दिली त्याला परत एकदा प्रतिसाद देऊन सिद्ध केले , आणि मी तुम्हाला टोमणा नाही हो मारला तुम्ही मला उद्देशून मूळ प्रतिसादात जे लिहिले की ते जसेच्या तसे तुम्हाला लागू पडते. मी केजुला सल्ले देणे तुम्हाला आवडले नसेल तर तुमचे मला सल्ला देणे मला का बरे आवडेल हे तुमच्या ध्यानी तुमच्या शब्दात आणून दिले , @केजरीवाल/मोदी आणि कुणी फाटका निनाद एकच वाटतं अहो पण केजरीवाल तर स्वतःला एकदम आम आदमी म्हणवतात ना आणि लोकशाहीत मोदी व केजरीवाल व फटका निनाद ह्यांना आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार आहेच की आता तुम्ही केजू ची व्यक्ती पूजा करणार्यास एवढे गर्क आहात .त्यामुळेच तुमचा बहुमुल्य वेळ तुम्ही फाटक्या माणसावर खर्च करत आहात , त्यापेक्ष्या एखादा डिनर विथ कॉकटेल फंड रेजिंग इवेन्ट आयोजित करा की राव आम्ही सुद्धा येऊ खाजगी विमानाने , आणि मी काही केजू ह्यांच्या पक्षात नाही की त्यांच्या विरुद्ध बोललो म्हणून पक्षातून काढून टाकायला. मी दिलेला मफलर फाटका निघाला असेल म्हणून मला तुम्ही फाटका म्हणत असाल. तुमच्यासारखे लोक जेव्हा असे वयक्तिक पातळीवर टीका करतात तेव्हा मनापासून आनंद होतो. ह्या आधी ह्या लेखावर माझ्या मताशी अनकूल नसणारे अनेक प्रतिसाद आहेत पण तुमचा प्रतिसाद खासच आहे. अशीच विशेषण मला देत रहा. आम आदमी समर्थकाचे खरे रूप तरी कळू दे. माझ्याशी चर्चा करायचे राहू द्या आधी तुम्ही मिपावर लिहिते व्हा स्वतः आधी एखादा लेख लिहा मग पुढचे पाहूया

प्रथम आयुर्हितांनी वॉरेन बफेचा क्वोट दिलायं, तो केजरीवालांना उमेदवार म्हणून बघायला अत्यंत जरुरी आहे :
You're looking for three things, generally, in a person," says Warren Buffett. "Intelligence, energy, and integrity. And if they don't have the last one, don't even bother with the first two."
केजरीवालांच म्हणणं असंय की कोणतही भ्रष्ट नेता सत्तेत न येण्याचे तीन पर्याय आहेत : त्याच्या विरुद्ध निवडणूक लढवून त्याला पराभूत करणं, जनतेला त्याला परत बोलावण्याचा अधिकार असणं (Right to Recall) किंवा जनलोकपालसारखा प्रभावी कायदा करणं. त्यांच्या मते `जनलोकपाल' हा आआपाचा प्रथम विषय आहे आणि त्यावर एक काय शंभर मुख्यमंत्रीपदं कामी आली तरी चालतील. दिल्ली असेंब्लित त्याविषयी सत्ताधारी आणि विरोधी दोघांनी अनास्था दाखवली हे स्वतःच्या राजिनाम्याचं त्यांनी दिलेलं कारण आहे. ( राजिनाम्यानंतरची त्यांची मुलाखत). दुसरी गोष्ट, जर मोदी आणि गांधी एकमेकांविरुद्ध आहेत तर ते परस्परांविरुद्ध निवडणूक का लढवत नाहीत? हा त्यांनी मांडलेला मुद्दा कुणाही सूज्ञ व्यक्तीला मंजूर होईल. ते स्वतः मोदींविरुद्ध निवडणूक लढवतील हा निर्णय त्यांची अंतरबाह्य एकवाक्यता दर्शवतो. तिसरी गोष्ट, भारतीय मानसिकता मोठी मजेदार आहे. कुणी तरी अवतार घेईल आणि सगळं आबादीआबाद होईल अशी एक भ्रामक समजूत युगानुयुगे आपण केली आहे. त्यामुळे आपण सक्रिय होऊन काही करावं ही गोष्ट आपल्या गावीही नाही. आपण फक्त उलटसुलट चर्चा आणि नव्या विचारांचा बेभान विरोध इतकंच करतो. (थोडं आवांतर होईल पण युद्धाच्या निष्फळतेविषयी खफवर झालेली चर्चा पाहा! `युद्धही कल्पना माझ्या मनातून मी संपूणापणे निष्कासित करतो ' असं खुल्या दिलानं आपल्याला मान्य देखिल करता येत नाही) आणि फायनली, केजरीवाल म्हणतात तसं, आआपा संपूर्ण नामशेष झाली तर व्यक्तिशः त्यांचं किती नुकसान होईल हा प्रश्न नाही. भारत भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो, आपल्या हयातीत ही गोष्ट घडू शकते, ही नव्यानं निर्माण झालेली आशा सर्वस्वी संपून जाईल. (आता या अँगलनं इथल्या सदस्यांचे प्रतिसाद पाहा)

केजरीवाल यांचे राजकारण परंपरागत राजकारणापेक्षा वेगळे आहे. कसे ? काही अपवाद असतील पण त्यांचे वेगळे पण असे आहे. १. ते सहेतुकपणे आरक्षण, राज्यघटना, काश्मीर, नाटो., अमोरिका, रशिया, या नाजुक विषयापासून सध्या लांब आहेत. कारण सामान्य माणसाला तलाठ्याच्या कार्यालयात काय अनुभवाला येते हे महत्वाचे असते. ओव्हल ऑफिसमधे काय चालले आहे याचाशी त्याचे काही देणेघेणे नसते. २.त्यानी आयारामना संधीसाधूना तिकिटे देण्याचे टाळले आहे. उदा पुणे येथे डी एस कुलकर्णी याना तिकिट देण्यात आलेले नाही तर ते अगोदरचे कार्यकर्ते वारे याना देण्यात आले आहे. नाहीतर संधीसाधु शरद पवाराना काय केले आहे पहा.मावळात २४ तासात त्यानी उद्धवचा माणूस फोडून उभा केला आहे. ३.परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत. कारण निवडून येऊन वाटून वाटून शेत खाण्याची त्यात चाल असते. जिंकणारा ६५ टक्के हरणारा ३५ टक्के. केजरीवाल हे भारतातील पहिलेच नेते असावेत ज्यानी किमान असा विचार तरी बोलून दाखविला आहे. मोदी विरूद्ध शरद पवार बारामतीत अशी निवडणूक मोदी व पवार दोघेही असून १०० जन्म मिळाले तरी कल्पू शकणार नाहीत.

In reply to by चौकटराजा

आपल्या लोकशाहीत लोकप्रतिनिधी जनतेचं रिप्रझेंटेशन करायला एखाद्या मतदारसंघातुन उभा राहातो, कोणा व्यक्ती विरुद्ध म्हणुन नाहि. हि आपल्या लोकशाहिची मूलभूत चौकट आहे. अर्थात, याला काहि अपवाद आहेत. पण ते अपवाद म्हणुनच... खासदारांना एका विशिष्ट मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करायचं आहे, त्याला व्यक्ती विशेषाला रोखायचे नाहि. केजरीवाल मोदिंविरुद्ध उभे राहताहेत ते दिल्लीची बेगमी पक्की करायला. जर मोदी हरले तर केजरीवाल बोटाच्या इशार्‍यावर दिल्ली आणि इतर काहि राज्यांचे सीएम निवडतील. आणि जर केजरीवाल हरले तर हि हार एखाद्या युद्धातल्या जखमेप्रमाणे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मिरवतील. बेसीकली केजरीवाल जनलोकपालाच्या तोडीचा मुद्दा शिजवत आहेत. दिल्ली आणि इतर विधानसभा निवडणुकीसाठी आआपची पाटि नव्याने कोरी करायची हि नामी संधी आहे.

In reply to by अर्धवटराव

एखाद्या मतदारसंघातुन उभा राहातो, कोणा व्यक्ती विरुद्ध म्हणुन नाहि.....त्याला व्यक्ती विशेषाला रोखायचे नाहि.
व्यक्तीपेक्षा मुद्दा महत्त्वाचायं आणि तो व्यक्तीशिवाय साध्य होऊ शकत नाही. तस्मात व्यक्ती विरुद्ध व्यक्ती (किंवा एका मतप्रणाली विरुद्ध दुसरी) असा लढा असतो. मग ती निवडणूक असो की इथली चर्चा. बाकी पुढचा सर्व प्रतिसाद निव्वळ कल्पनाविलास आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मतप्रणालीविरुद्ध लढायला केजरीवालांना मोदिंचा मतदार संघ ठरायची वाट बघावी लागु नये. व्यक्तींविरुद्ध लढायचं असल्यास ए राजा, सोनीया गांधी वगैरे मंडळी देखील रिंगणात आहेत. मोदिंची निवड केजरीसाहेबांच्या भावी राजकारणाची निकड आहे.
बाकी पुढचा सर्व प्रतिसाद निव्वळ कल्पनाविलास आहे.
आय विश. मी राजकारणाला राजकारण म्हणुनच बघतो. व्यक्तीविशिष्टाचं महात्म्य त्याच्या बोलण्याच्या स्टाईलवरुन जोखण्यापेक्षा त्याच्या कृतींचे पडसाद कसे उमटतात हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. असो.

In reply to by चौकटराजा

चला, एकाला तरी मुद्दा समजला!
केजरीवाल यांचे राजकारण परंपरागत राजकारणापेक्षा वेगळे आहे.
अनभिज्ञ लोकांन केजरीवालांना `नया है वो' वगैरे म्हणू द्या. `लेकीन वह सच्चा और नेक है.... और बंदेमे दम है!'

In reply to by संजय क्षीरसागर

`लेकीन वह सच्चा और नेक है.... और बंदेमे दम है!' :D इतकी विनोदी सकाळ कधीच गेली नसेल

In reply to by संजय क्षीरसागर

अनभिज्ञ लोकांन केजरीवालांना `नया है वो' वगैरे म्हणू द्या.
"वो" नाही, "वह" आहे ते. मय क्या बोल रहा हुं, तुम क्या बोल रहा हय.

In reply to by चौकटराजा

कारण सामान्य माणसाला तलाठ्याच्या कार्यालयात काय अनुभवाला येते हे महत्वाचे असते. ओव्हल ऑफिसमधे काय चालले आहे याचाशी त्याचे काही देणेघेणे नसते.
आणि म्हणूनच तलाठ्याच्या ऑफिसमध्ये काय चालले आहे ते सुधारण्यासाठी ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत.माझ्या घरच्या बाजूला रस्त्यावर असणारा कचरा दररोज उचलला जात नाही हा मुद्दा महापालिकेच्या निवडणुकीत मत देताना विचार करायला लक्षात घेतला तर ते योग्य आहे पण लोकसभेत मतदान करताना हा मुद्दा लक्षात घेणे कितपत योग्य आहे?तेव्हा म्हणणे तेच तर आहे की आआपने स्वतःला लहान पातळीवर सिध्द करून दाखवावे आणि मग मोठ्या गमज्या माराव्यात. इथे दिल्लीतून ४९ दिवसात काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसतानाही केजरीवाल पळून गेला (सॉरी अशा माणसाला आदरार्थी बहुवचन यापुढे मला तरी लिहिता येणार नाही)--कारण काय तर म्हणे कोअर अजेंड्यातील लोकपाल बिलाला समर्थन मिळणे शक्य नव्हते. भारतासारख्या देशात कोणत्याही मुद्द्यावर असे निर्विवाद समर्थन मिळेल असे नंबर विधानसभेत/लोकसभेत मिळणे फारच कठिण आहे.मग प्रत्येक वेळी तो असाच पळून जाणार का? तेव्हा आधी दिल्ली (किंवा अन्य कोणतेही राज्य), एखादी मोठी महापालिका इथे स्वतःला त्याने सिध्द करून दाखवावे. मुलाखतीमध्ये आपण किती सेन्स बाळगतो असे नाटकी बोलण्याला काहीही अर्थ नाही. मुलाखतीत/भाषणात जे काही बोलले जात असेल ते बाबावाक्य प्रमाणम म्हणून सिरियसली घ्यायचे झाले तर हुरियत कॉन्फरन्सवाले काश्मीरात अत्याचार होत आहेत असे म्हणतात किंवा आआपचा नेता कमल मित्र चिनॉय म्हणतो की काश्मीरात 'इंडियन स्टेट' विरूध्द लढायला हवे असे काही बरळतो ते ही सिरियसली घ्यायला हवे. तेव्हा तो मुलाखतींमध्ये नक्की काय बोलतो याला माझ्या लेखी तरी शून्य महत्व आहे.(तुम्ही हे लिहित आहात असे म्हणत नाही.पण एक जनरल गोष्ट लिहित आहे).

In reply to by क्लिंटन

इथे दिल्लीतून ४९ दिवसात काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसतानाही केजरीवाल पळून गेला आहो, पळून जायला सुद्धा दम लागतो. बंदे मे है (भागनेका) दम. आहात कुठे?? *mosking*

In reply to by क्लिंटन

आपल्या देशात फेडरल रचना आहे. त्याप्रमाणे आपले म्हणणे ठीक असेलही.पण आज भारताचा नेता म्हणून नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी अशीच नावे पुढे येतात. फेडरल आहे म्हणून एखाद्या मुख्यमंत्र्याचे वा जि प अध्यक्षाचे नाव पुढे येत नाही. सबब अगदी तलाठी कार्यालय ते पी एम ओ कार्यालय येथील गव्हर्नन्स बाबत पंतप्रधानाचे स्वप्न काय आहे ते महत्वाचे असते. लाल किल्यावरचे भाषण त्या अर्थाने महत्वाचे असते. युनो मधील भाषणासारखे भाषण तेथे करून चालणारच नाही. तरीही ते तसेच केले जात असते. भारतातील लोकशाही आज तरी लोकांचे दैनदिन प्रश्नच महत्वाचे धरले जातात. म्हणूनच काही वेळेस त्यावरून लक्ष उडविण्यासाठी राम मंदिरासारखे अनावश्यक मुद्दे उपस्थित केले जातात. ( व बाबरी पाडावा सारखे अनावश्यक ही) .मी काश्मीर मधे गेलो असताना महाराष्ट्र कुठे आहे असा एकाने मला प्रश्न विचारला होता. मी चाटच पडलो. बहु असोत सुंदर वगैरे तिथे म्हणून काही उपयोग नव्हता. केजरीवाल यानी काही मुद्दे घेतलेले नाहीत याचा अर्थ त्याना त्याचे महत्व कळत नाही असे नाही. काश्मीर चा तलाठी व कन्याकुमारीचा तलाठी ही एकाच आईची एकाच प्रवृतीची दोन जुळी मुले आहेत त्याना प्रथम सरळ करायला पाहिजे त्यांचे बोलाविते धनी घरी पाठवायला पाहिजे याचा त्यानी विचार केलेला आहे .तो जाणता राजा यानी केलेला आहे असे मला तरी गेल्या चाळीस वर्षात आढळलेले नाही. नुसता कांदा, उस शेती पाणी व साहित्य संमेलनाचे राजकारण करून द्रष्टेपण मिळविता येत नाही. शिक्षण, न्यायव्यवस्था व निवडणुका यातील घाण कोणी व कधी काढायची ?

In reply to by चौकटराजा

सबब अगदी तलाठी कार्यालय ते पी एम ओ कार्यालय येथील गव्हर्नन्स बाबत पंतप्रधानाचे स्वप्न काय आहे ते महत्वाचे असते.
बरोब्बर! आणि सामान्य माणसाची प्रार्थमिक गरज `लोकल' (मोहोल्ला) आहे.
भारतातील लोकशाही आज तरी लोकांचे दैनदिन प्रश्नच महत्वाचे धरले जातात. म्हणूनच काही वेळेस त्यावरून लक्ष उडविण्यासाठी राम मंदिरासारखे अनावश्यक मुद्दे उपस्थित केले जातात
हे इथल्या विद्वजनांना कळत नाही याचं आश्चर्य आहे!
केजरीवाल यानी काही मुद्दे घेतलेले नाहीत याचा अर्थ त्याना त्याचे महत्व कळत नाही असे नाही.
पुन्हा एकदा अभिनंदन!
काश्मीर चा तलाठी व कन्याकुमारीचा तलाठी ही एकाच आईची एकाच प्रवृतीची दोन जुळी मुले आहेत त्याना प्रथम सरळ करायला पाहिजे त्यांचे बोलाविते धनी घरी पाठवायला पाहिजे याचा त्यानी विचार केलेला आहे .
तुम्हाला `विनम्र प्रशासन' या आआपाच्या मॅनिफेस्टोचं मर्म कळलंय.
नुसता कांदा, उस शेती पाणी व साहित्य संमेलनाचे राजकारण करून द्रष्टेपण मिळविता येत नाही.
चौरा, आता फक्त तुमची स्वाक्षरी बदला!

In reply to by क्लिंटन

आताच एक कार्यक्रम एका चानल वर चालला होता. तरूणाना खासदारपद म्हणजे नक्की काय माहिती आहे' असा विषय होता. बहुतेकानी खासदाराला चार पाच आमदार रिपोर्ट करतात व एकेका आमदाराला त्याच्या हाताखालचे नगरसेवक रिपोर्ट करतातअशी हायरार्की आहे असे उत्तर दिले. फक्त एकाने खासदाराचे मुख्य काम कायदा करणे असे दिले. यावरून आपली द्विस्तरीय वैधानिक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे परस्पर संबंध काय आहेत याचे किती प्रगाढ अज्ञान आहे हे कळून येते. म्हणूनच भारातातील पुढील मूलभूत समस्या प्रशासन, शिक्षण, न्यायदान व निवडणूक कायदा या आहेत. या सोडविल्या तर गोल्डन हाय वे नदी जोड, बेळगाव प्रश्न, शेतमालाची किंमत. आयकर, काळा पैसा या समस्या सुटतीलच. पण त्या सुटल्या तर राजकारण्याना मग अजेंडा काय राहिला. एका कामगार पुढार्याने मी तरूण असताना सांगितलेले एक वाक्य आठवते. कामगार नेत्याने सगळेच प्रश्न कधीच सोडवायचे नसतात. सोडवले तर युनियनचे पावती पुस्तक गटारात फेकून द्यावे लागेल.

In reply to by चौकटराजा

वरील प्रतिसादातले मुद्दे कळले, पण पटले नाही.. पहील्या मुद्द्याचा प्रतिवाद क्लिंटन यांनी खाली केला आहे..
मोदी विरूद्ध शरद पवार बारामतीत अशी निवडणूक मोदी व पवार दोघेही असून १०० जन्म मिळाले तरी कल्पू शकणार नाहीत.
हा मुद्दापण तसाच.. जनरली जी व्यक्ती जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक लढवते, ती व्यक्ती अश्याच जागेतून उभी राहते, जिथून तिच्या जिंकण्याची शक्यता जास्त आहे.. उगाच शहीद व्हायला सगळेच थोडी "हआआपलेले" आहेत? "सी.एम. बनने को थोडी आया था मै? देश के लिए / संविधान के लिए जान हाजीर है" म्हणत मतदारांच्या विश्वास, आकांक्षा आणि अपेक्षांना तेल लावून कांगावा करुन पळपुटेपणा करणार्‍यांना एकतर अराजकता हवी असते, किंवा "अभ्भी के अभ्भी" सगळ्यात वर पोहचायचे असते आणि त्यासाठी त्यांच्या बोलबच्चनवर विश्वास ठेवणार्‍या मतदात्यांकडून "एसेम" मागवून निर्णय घेण्याची वाट पहायची त्यांना गरज भासत नाही..( तसेही तो "टॅग" केजरीवाल अभिमानाने मिरवतातच. ;-) ) देशासाठी मोठ्यामोठ्या गफ्फा मारणार्‍या ह्या "संयत आणि सच्चे" इंटर्व्ह्यू देणार्‍यांचे कॅमेर्‍यामागचे सेटींग आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोरची मुजोरी, आणि नाटकी आक्रस्तळेपणा जर कोणाला अवतारी माणसाची लक्षणे वाटत असतील तर तो आशावाद त्यांनाच लखलाभ.. ह्यावरुन २०११च्या आसाम निवडणूकांच्या वेळची एक गोष्ट आठवतेय.. निकालाच्या दिवशी जसाजसा निकाल लागत गेला, तसा तसा एका अपक्ष उमेदवाराच्या चेहर्‍यावरील आनंद आणि हावभावांमधली अधीरता वाढत होती. मला आश्चर्य वाटले, कारण की हा पठ्या प्रत्येक राऊंडमधे अधिकाधिक मागे पडत होता. शेवटी जेव्हा विजयी उमेदवाराची घोषणा झाली तेव्हाच्या ह्याचा आनंद, आणि विजयी उमेदवाराशी दाखवलेली "गर्मजोशी" डोक्यात लख्ख उजेड पाडून गेली.. ;-) बोला, केजरीवाल महाराज की जय !!

In reply to by चिगो

व्यक्ति नुसती जिकण्यासाठी निवडणूक लढत नाही तर नको त्या माणसाने सत्तेवर येउ नये म्हणून देखील निवड्णूक लढली गेली पाहिजे. आपल्या लोकसभेतच अटलबिहारी यांचे मंत्रीमंडळ पाडण्यासाठी काय काय खटाटोप कशी भाषणे झाली त्याचा इतिहास विसरलात काय ? आजही "जातीय वादी शक्तीना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी " असा चावून चोथा झालेल्या शैलीत प्रचार असतो. म, गांधींचे वा लो टिळकांचे स्वप्न साकार करण्यासाठी" असा प्रचार असतो काय ? जनरली जी व्यक्ती जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक लढवते, ती व्यक्ती अश्याच जागेतून उभी राहते.. अशा व्यक्ती नी नेता होउन नये फार तर " होयबा" खासदार व्हावे. त्यानी मेजर होउन नये सार्जंटची त्यांची लायकी !

मला राजकारणातलं काहीही कळत नाही.. वाचन नाही.. अभ्यास नाही.. जेवढं बातम्या, पेपर, चेपु आणि मिपा ह्यातुन समजतं तेवढचं काय ते माझ ज्ञान.. तरीही मला केजरीवाल ह्यांच्या संदर्भात काही प्रश्न आहेत.. जमल्यास कुणी उत्तरे द्यावीत.. १. दिल्ली मध्ये निवडुन आल्यानंतर आप कडे भाजप आणि काँग्रेस असे दोन्ही पर्याय होते. आप जनरली निर्णय जनाधारावर घेते असं वाटलं (एस्.एम्.एस मागवणे वगैरे..) मग अशावेळी भाजपचा पाठींबा घेतला असता तर जे सरकार आले असते ते बहुतांश जनतेच्या पसंतीचे आले नसते का? मग काँग्रेस ज्यांना जनतेनेच अत्यंत कमी जागा देऊन कौल दिला होता, त्यांच्या सोबत सरकार का बनवले? २. मी शीला दिक्षितांविरुद्ध माझ्याकडे खुप पुरावे आहेत वाला केजरीवालांचा व्हिडिओ पाहिला होता, आणि नंतर "हर्षवर्धन ह्यांनी पुरावे आणुन दिले की कारवाई करु" हा ही.. असे का? ३. आप ला बदल आणायचा आहे. लोकशाही मध्ये मतदानातुन विवडुन येऊन, घटनात्मक / कायदेशीर पद्धतीनी बदल आणायचा मार्ग आहे. अशावेळी सरकार स्थापायला मिळाले असताना ते २ महिनेही न चालवणे मला अयोग्य वाटते. शिवाय केजरीवाल समर्थक त्यांच्या राजीनामा देण्याला "लाथ मारली मुख्यमंत्रीपदाला... किती निर्मोही.. त्यांना कशाचाच लोभ नाही.." वगैरे सुर लावतात तो ही मला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्रीपद हे एक मोठे पद आहे.. ज्यात तुम्ही खरच महत्वाचे निर्णय घेऊ शकता. त्याला लाथ मारणं आणि परत रस्त्यावर जाऊन आंदोलनं करणं हा मला मुर्खपणा वाटतो.. आप ला संधी होती.. १ वर्ष तरी किमान सरकार चालवायला हवे होते म्हणजे जनतेला त्याम्चे कामकाज पहाता आले असते आणि आप लाही अनुभव मिळाला असता. सध्या तरी आप बद्दल जे काही मत आहे ते निव्वळ वरवरचे आहे कारण सरकार चालव्ण्याच्या बाबतीत कुणाला काही कल्पनाच नाही.. त्यामुळे उद्या त्यांचे सरकार नक्की कसे काम करेल ह्याबद्दल सगळेच अंदाजच आहेत.. ४. आपने ज्या काही योजना (वीज बिल, पाणी पट्टी बाबतीत) जाहीर केल्या, त्याम्चे नक्की काय होणार? म्हण्जे त्या प्रत्य्क्षात येऊ शकत होत्या का (फिजिबिलिटी?), त्याचा आर्थिक बोजा कुणावर पडत होता नक्की? वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळणारच नाहीत का? म्हणजे ह्यांनी फकत कागदोपत्री योजना जाहिर केली.. पण ती प्रत्यक्षात येण्यालायक होती का नव्हती हे जनतेला कधीच कळणार नाही का? ५. केजरीवालांचा सगळ्यात मोठा मुद्दा "भ्रष्टाचार" आहे. पण मग ते नेहमी फक्त मोदींविरुद्ध बोलतानाच का दिसतात? मी कधीही त्यांना "सोनिया गांधी" "राहुल गांधी" अशी मोठी नावं घेऊन घणाघाती हल्ले करताना पाहिलं नाहीये जेवढे ते मोदीं विरुद्ध बोलतात. त्यांनी गुजरातचा दौरा केला. चांगलय... आता ते काँग्रस शासित राज्यांचा दौरा करणार का? आता हे केजरीवालांनीच का करायच हा प्रश्न येऊ शकेल.. त्यांना काँग्रेस चे हस्तक समजल्या जाते.. अशावेळी जर ते फक्त मोदींविरुद्ध बोलत राहिले तर ते काँग्रेसच्याही विरोधात आहेत हे कसं कळणार? "मी काँग्रेस्चा एजंट नाही" हे ते म्हणतात.. प्रत्य्क्ष कृतीमध्ये मात्र त्यांनी कोंग्रसचा पाठींबा घेतला.. काँग्रेसच्या सर्वेसर्वांविरुद्ध बोलताना ते दिसत नाहीत.. मग नक्की समजायचे काय? ~~~ परत एकदा.. माझा काहीहि अभ्यास नाही.. काही शब्द खाली वर झाले असतील तर चु.भु.द्या.घ्या...

In reply to by पिलीयन रायडर

पण तुमचा मूळ सूर :
त्यांना काँग्रेस चे हस्तक समजल्या जाते..
चूक आहे. आआपानी काँग्रेसविरोधात आपले खंदे उमेदवार उभे केलेत. 1. Kumar Vishwas from Amethi, Rahul Gandhi’s seat 2. Social activist Medha Patkar from North East Mumbai 3. TV journalist-turned-politician Ashutosh from Chandni Chowk, seat held by Union Minister Kapil Sibal 4. Former CEO and Chairperson of RBS India, Meera Sanyal from South Mumbai, seat represented by Union Minister Milind Deora 5. Former scribe Mukul Tripathi from Farukhabad in Uttar Pradesh, constituency of Union Minister Salman Khurshid 6. Advocate H S Phoolka from Ludhiana, seat held by I and B Minister Manish Tewari 7. Activist Anjali Damania from Nagpur, against former BJP National President Nitin Gadkari. 8. Activist Hardev Singh has been given ticket in Mulayam Singh Yadav’s stronghold Mainpuri. 9. AAP leader and founder member Yogendra Yadav from Gurgaon 10. Peasant leader Somendra Dhaka from Baghpat in Uttar Pradesh, seat represented by Union Minister Ajit Singh 11. Jarnail Singh is AAP nominee for West Delhi seat 12. Scientist Jiya Lal, a scientist from Lalganj seat, which is at present with BSP’s Bali Ram 13. Educationist Khalid Pervez from Moradabad, which former cricketer Mohd Azharuddin currently represents in Parliament 14. Yogesh Dahiya, a peasant leader from Uttar Pradesh, will be the AAP candidate for Saharanpur 15. Senior AAP leader Mayank Gandhi from the North West Mumbai seat, which is held by former Union Minister Gurudas Kamat 16. AAP leader Subhash Ware from Pune, a seat held by Congress MP Suresh Kalmadi 17. Former engineer Vijay Pandhare from Nashik 18. Senior activist of the Narmada Bachao Andolan Alok Agarwal from Khandwa in Madhya Pradesh 19. Habung Pyang, a former Information Commissioner in Arunachal Pradesh, will be the AAP contestant in the northeastern state. 20. Lingraj, an activist who took part in the agitation against Posco, will lead AAP’s challenge for the Bargarh seat in Odisha.

In reply to by संजय क्षीरसागर

बरं.. असु शकेल.. मी म्हणलच आहे की माझा काही अभ्यास नाही.. पण माझा मुद्दा इतकाच होता की हा जो समज आहे तो त्यांनी गांधी घराण्या विरुद्ध फारसं कधी न बोलल्यानी प्रबळ होत असावा.. त्यावरही मत द्या.. आणि बाकी मुद्द्यांवरही..

In reply to by पिलीयन रायडर

माणुस कसा आहे ते आपण ओळ्खायच असतं.. अनेकद हे गट फिलिंग खुप उपयोगी असतं.. डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये.
ही गोष्ट रिक्षावाल्यापासून लग्नाच्या जोडीदारापर्यंत सर्वांच्या बाबतीत एकसारखी आहे. अरविंदनी उभे केलेले उमेदवार पाहा. एकेकाची क्रेडेंशियल्स एकसोएक आहेत. कधीही राजकारणात रस न घेणारे आज त्याच्यासाठी रिंगणात उतरलेत. आणखी काय हवं? बव्हंश सदस्यांनी चालवलेल्या किरकोळ मुद्यांवरच्या फुटकळ चर्चा आणि सादर केलेली बाण्यो, शहाण्योची भंकस आकडेवारी यावरुन निर्णय होऊ शकणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही पॉईंट टु पॉईंट उत्तर देणार आहात का? मला भावनिक उत्तरं नको आहेत.. मी काही मुद्दे मांडलेत, त्याची रोख ठोक सरळ उत्तरं अपेक्षित आहेत... बाकी टीव्ही वर बोलताना फार प्रामाणिक वाटतो.. हे काही कारण असु शकत नाही माणुस चांगला आहे हे मानण्याचं.. त्यांनी दिलेली आश्वासनं वगैरे नी काही मत बनवु शकत नाही.. आणि त्यांनी कधीहि सरकार चालवलेच नसल्यानी आप कामकाज कसे करते हे ही गुलदस्त्यात आहे.. सो.. माणुस म्हणुन ओळखणं वगैरे इथे लागु पडत नाहि..

In reply to by पिलीयन रायडर

मग गट फिलींग म्हणजे काय?
बाकी टीव्ही वर बोलताना फार प्रामाणिक वाटतो.. हे काही कारण असु शकत नाही माणुस चांगला आहे हे मानण्याचं
माणसातली एकवाक्यता जोखण्याचा सहवास हा एकमेव पर्याय आहे. पण तो उपलब्ध नाही म्हटल्यावर त्याचं बोलणं, लेखन आणि कृतीतली एकसंधता ही परिमाणं वापरावी लागतील.
त्यांनी कधीहि सरकार चालवलेच नसल्यानी आप कामकाज कसे करते हे ही गुलदस्त्यात आहे..
म्हणून तर आआपाला एक संधी द्यावी असं वाटतं.
सो.. माणुस म्हणुन ओळखणं वगैरे इथे लागु पडत नाहि.
तुमच्या लक्षात येत नाहीये....प्रत्येक प्रसंगी शेवटी माणूसच ओळखता यावा लागतो!

In reply to by संजय क्षीरसागर

अरविंदनी उभे केलेले उमेदवार पाहा. एकेकाची क्रेडेंशियल्स एकसोएक आहेत. येक उमेद्वार म्हंतोय काश्मीर पाक्ड्यांना द्या, दुस्रा सीमी सार्क्या आतंक्वाद्याना सपोर्ट कर्तोय, एकाचे माओवाद्यांशी संबंद्ध आहेत, एक वकील असून काय्दा हातात घेऊन खुद्द दिल्लीत आप्च्या कम्रेचं फेड्तोय, एक मुंबैच्या बाई बिल्डर कंपनीच्या भ्रश्टाचारात गूंतल्यात.....................इकड उमेव्दार ख्योळ कर्त्यात नी केजरीवाल बेचारा हॅ हॅ हॅ करत मापी मांगतोय, लय ताप बेच्यार्याचा डोस्क्याला ! हायला, लईच ब्येष्ट्म्ब्येश्ट "क्रेडेंशियल्स एकसोएक" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) वालं उमेव्दार बर्का... आता लईच ब्येष्ट आसलेले इचावंत (भवतेक दुसर कोन काय वाच्त नाय, त्येन्ला कायबी आक्कल नाय आसा (बिन)डोस्क्याचा इचार करुन) आस कायबाय लिवायला लाग्लं कि मंग काय म्हनावं बाबा आमी आडान्यानी ? लई ब्येष्ट इनोद ! गब्रिएल खुस हुवा !!

In reply to by गब्रिएल

येक उमेद्वार म्हंतोय काश्मीर पाक्ड्यांना द्या, दुस्रा सीमी सार्क्या आतंक्वाद्याना सपोर्ट कर्तोय, एकाचे माओवाद्यांशी संबंद्ध आहेत, एक वकील असून काय्दा हातात घेऊन खुद्द दिल्लीत आप्च्या कम्रेचं फेड्तोय, एक मुंबैच्या बाई बिल्डर कंपनीच्या भ्रश्टाचारात गूंतल्यात. देशद्रोही लोकांमध्ये दम असतोच. बंदे मे है दम :D

In reply to by गब्रिएल

इकड उमेव्दार ख्योळ कर्त्यात नी केजरीवाल बेचारा हॅ हॅ हॅ करत मापी मांगतोय, लय ताप बेच्यार्याचा डोस्क्याला !
हे एक सालं आणखी एक डोकं तापवणारं नाटक.. दुसर्‍यांच्या चुकांसाठी सरळ त्यांना चोर, देशद्रोही ठरवणारा, त्यासाठी धरण्यावर, उपोषणावर बसणारा हा सद्गृहस्थ जेव्हा आपल्या बगलबच्चांसाठी "तो होता है ना.. हो गयी गलती उनसे. इतनी क्या बडी बात हैं?" वगैरे बोलायला लागतो, तेव्हा 'आपला तो बाब्या..' म्हणजे काय ते कळतं..

In reply to by गब्रिएल

एकही मारा लेकिन क्या सॉलिड मारा :) काश्मीरात सार्वमत घ्यावे किंवा काश्मीरात हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांमधील मतभेदांमुळे "इंडियन स्टेट" विरूध्द लढा कमजोर पडेल याची चिंता असलेल्या पक्षाला दरमहा १००-२०० रूपये लाईटचे बिल कमी यावे म्हणून मत देऊन मी तरी देशद्रोह करू इच्छित नाही.That's it.

In reply to by पिलीयन रायडर

त्यांनी गांधी घराण्या विरुद्ध फारसं कधी न बोलल्यानी प्रबळ होत असावा.. सोनीयाजींबद्दल कदाचीत त्यांच्या मनात नितांत आदर असावा म्हणून ते बोलत नसावेत. तसे ते स्वभावाने खूप चांगले आहेत. ;) AK Sonia

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या अल्प मतीनुसार काही उत्तरे १. कॉंग्रेसने आआपच्या सर्व अटी मान्य करून पाठिंब्याचे पत्र उपराज्यपालाना दिले. भाजपने पाठींबा दिला नव्हता. २. काही अंशी सहमत. पण ते कारवाई करणार होते असे दिसते. ह्याबद्दल माझे मत मी आआपच्या दिल्लीतील दुसऱ्या टर्म नंतर बनवीन. तेव्हाही त्यांनी काही केले नाही तर नक्कीच गडबड आहे, ३. निवडणुकीतील प्रमुख आश्वासन पूर्ण करण्याची काही शक्यता नसताना ते सत्तेवर राहिले असते तर त्यांच्यात आणि भाजपात फरक काय राहिला? त्यांना आपली क्षमता दाखवून दिली. आता पूर्ण बहुमताने येऊन आपली आश्वासने पूर्ण करणे नक्कीच योग्य आहे. ४. फिजिबिलिटी म्हणजे काय? योजना प्रत्यक्षात येण्यालायक नव्हती असे तुम्हाला का वाटते ? आर्थिक बोजा मान्य आहे. पण तो कुठल्याही सबसिडीत पडतो. पण सबसिडी हा भारताच्याच नव्हे तर जागतिक राजकारणाचा एक भाग आहे. सबसिडी द्यावी कि नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. ५. दिल्ली निवडणुकीत आणि त्याआधी आआपचा मुख्य रोख कॉंग्रेसच होती. रोबर्ट वध्रांवर त्यांनी केलेली टीकेचे वीडीओ युटूबवर मिळतील. आता भाजप सत्तेवर येणार असे दिसत असताना त्यांनी आपला रोख तिकडे वळवणे योग्यच आहे. हेच कारण मला आता ते लालूच काय पण इतर कोणावर फारशी टीका न करण्याचे वाटते. पण लालूंवर त्यांनी या आधी टीका केल्याचे आठवते.

In reply to by पिलीयन रायडर

मग अशावेळी भाजपचा पाठींबा घेतला असता तर जे सरकार आले असते ते बहुतांश जनतेच्या पसंतीचे आले नसते का?
पण भाजपाने 'आआपा'ला पाठिंबा देऊ केला होता असे वाचनात आले नाही. चूकभूल द्यावीघ्यावी.

In reply to by क्लिंटन

धन्यवाद. नक्की आठवत नसल्यानेच चूकभूल द्यावीघ्यावी म्हटले होते.

In reply to by क्लिंटन

बातमी पुन्हा वाचा. भाजपने सरकार स्थापन झाल्यास सहकार्य करू असे म्हटले आहे. पाठींबा दिला नव्हता. जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर सहकार्याचे आश्वासन प्रत्येक विरोधी पक्ष देतो. त्याला पाठींबा म्हणत नाहीत.

In reply to by संपत

जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर सहकार्याचे आश्वासन प्रत्येक विरोधी पक्ष देतो. इतके मर्यादीत नव्हते. त्याच बातमीतले हे वाक्य वाचा:, "..If AAP is really serious about fulfilling these promises, then it should go ahead and form a government and BJP will provide whatever cooperation is required," Goel said. एकेंनी आधी म्हणले होते की मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो की भाजपा-काँग्रेसला सपोर्ट देणार नाही की घेणार नाही... त्यांनी ते अर्धवट पाळले. मला आठवते त्याप्रमाणे आणि त्यांच्या टिव्हीवरील म्हणण्याप्रमाणे त्यांना पाठींबा असल्याचे काँग्रेसने नायब राज्यपालांना कळवले पण ते आणि काँग्रेस कधीच बोलले नाहीत. त्यांना तसेच भाजपाकडून मिळाले असते तर हवे होते. भाजपाचे म्हणणे होते की ताकाचे भांडे पब्लीक करा, ताक मिळेल.

In reply to by विकास

cooperation = सहकार्य. आणि हे सहकार्य आप सरकारला आहे.. सरकार बनवण्यासाठी नाही.
भाजपाचे म्हणणे होते की ताकाचे भांडे पब्लीक करा, ताक मिळेल.
म्हणजे तुम्ही हे मान्य करताय कि भाजपने पाठींबा दिला नव्हता.

In reply to by संपत

"...will provide whatever cooperation ..." ह्याचा अर्थ ज्याची गरज आहे तेथे. जर बहुमतासाठी गरज आहे म्हणून आप/एके अ‍ॅप्रोच झाले असते तर त्यात देखील अंतर्भूत होते असे म्हणता येईल. पण आपणहून आपच्या मागे जाण्याचा प्रश्नच नव्हता. गरज आप ला असल्यास ती बोलून भाजपाने कशाला दाखवा? काँग्रेसने दाखवली कारण त्यांना काही पर्यायच नव्हता. आणि कदाचीत त्याचा उपयोग लोकसभा निवडणूकात होऊन नंतर आप सरकार पाडता येईल असा काहीसा हिशेब त्याच्यात होता. पण या वाघ्याचा पागा झाला आणि काँगेसचे गाढव आणि ब्रम्हचर्य लंपास झाले! :(

बाकी काही असो, येनकेनप्रकारेण या श्री.केजरीवाल यांनी भाजपाची झोप पुरेपूर उडवली आहे! एका व्यक्तीविरूद्ध इतकं स्लेजिंग केजरीवालांच्या आधी फक्त मोदींविरूद्ध झाले असेल. आता केजरीवाल त्याही बाबतीत मोदींना टफ फाईट देताहेत.

In reply to by ऋषिकेश

यद्यपि केजरीवालांनी अजून सबुरीने घेतल्यास लाँग टर्म फायदा जास्त होईल. (गॉथम मनपा मधील पार्टटैम मूषकमारू) बॅटमॅन.

In reply to by ऋषिकेश

राजकारणी केजरीवाल फार उत्तम मुव्ह करतोय हे तर निर्वीवाद. भाजपाचं दुखणं असं कि केजरीवालांनी राजकारणात ल एण्ट्री केल्यानंतर त्यांना भाजपने पुरेसं सिरियसली घेतलं नाहि. आता पाणि गळ्याशी आल्यावर कुठलाच नवा डाव रचता येत नाहि...लोकसभा निवडणुक हाकेच्या अंतरावर आहे. पण हा डाव केजरीसाहेबांवर देखील उलटु शकतो. आपली जनता जरा जास्तच महान आहे. जर अस्थीर केंद्राच्या झळा बसायला लागल्या आणि त्यावर आआप कडे उतारा नसला तर आआपला डोक्यावर घेणारी जनता त्यांना क्षणात पायदळी तुडवेल. नॉट गुड फॉर भारतीय पॉलिटिक्स.

@पिलियन रायडर तुम्ही मिपावर राजकारणात कधीच एका पक्षाचा कैवार घेत नाहीत. हे सुज्ञ मिपाकरांना अनुभवाने ठाऊक आहे. पण सुरवातीला सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावणारे केजू सध्या त्यांच्या संशयास्पद राजकीय चालीच्या मुळे अनेकांच्या मनात त्यांच्या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत. तुम्हाला काही मुलभुत शंका मनात आल्या त्या तुम्ही मांडल्या पण आप समर्थक व्यक्ती पूजेने एवढे आंधळे झाले आहेत की त्यांना मुद्देसूद प्रतिसाद सोडा पण खरच हा माणूस आता आम आदमीसाठी लढत आहे का स्वतःच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी लढत आहे.ह्याबद्दल विचार सुद्धा करावासा वाटत नाही आहे. व्यक्तीपूजेने आंधळे समर्थक दुसरे काय

In reply to by निनाद मुक्काम …

शेरखानच्या सांगण्या वरून तवाकी, महाबली रेड्याविरुद्ध उतरला आहे. त्याच्या सांगण्यावरूनच इंद्रप्रस्थ नावाचा जंगलातून हद्दपार झाला. बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल.

In reply to by विवेकपटाईत

बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल. लई ब्येष्ट इचावंताना इचारा ना. त्येंच्या म्हनन्यापर्मानं हे "एकसोएक क्रेडेंशियल्स" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) हैती बर्का. आता बगा तुम्च्या या चुकीवर १०,००० शबुदांचा लई भारी (मंग दुस्र काय म्हनन्याचि बिशाद हाय काय कोनाची :) ?) पर्तीपर्तीसाद येतोय बर्का. ढाल घेउन तयारित र्‍हावा +D

In reply to by विवेकपटाईत

जरनेल सिंह संसदेत गेले तर काय होईल ह्याची काळजी वाटणे साहजिकच आहे. तुमची चिंता दूर करेल अशी ही बातमी वाचा. भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले

In reply to by संपत

http://indianexpress.com/article/india/politics/the-numbers-story-list-… येथेही माहिती आहे. महाराष्ट्रातील ४८ टक्के सध्याच्या लोकप्रतिनिधींवर खटले दाखल आहेत.

In reply to by संपत

तुम्ही दिलेल्या हिंदूस्तान टाईम्सच्या बाबतीत काँग्रेसला बिचार्‍यांना उगाचच गोवले आहे... आप च्या संकेतस्थळावर जर पाहीले असते तर समजले असते की काँग्रेस त्यातली नाही म्हणून... No Congress?

In reply to by विकास

ही लिस्ट ६ मार्चची आहे. तोपर्यत काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. आणि आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून? प्रतिक्रिया जर्नेल सिंग सारखे क्रूरकर्मा संसदेत जातील या चिंतेला उत्तर म्हणून दिले होते.. कि काँग्रेस आणि भाजप देखील तयारीत आहे केजरीवाल आणि जर्नेलसिंगना तोंड देण्यासाठी.

In reply to by संपत

आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून? याला मराठीत म्हण आहे: "आपलं ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पहायचे वाकून"!

In reply to by संपत

भाजपा काँग्रेसच्या ३०% उमेदवारांवर गुन्हेगारी खटले? मग या केजरीवाल मधे खरेच दम आहे! दिल्ली विधानसभा निवडणुक अर्जाप्रमाणे त्या वेळेस एकट्या केजरीवालांवरच ९ गुन्हेगारी खटले चालू होते! त्याव्यतिरीक्त आता नवीन चालू झालेले खटले वेगळेच. खालील काही दुवे पाहीले तर समजेल. मराठीकरण करण्याचा कंटाळा करत आहे... Arvind Kejriwal gets summons in Nitin Gadkari case ... Metropolitan magistrate Gomati Manocha summoned Kejriwal as an accused on April 7, saying, "In these circumstances, this court is prima facie satisfied that there is sufficient material on record to proceed against the accused for the offence under section 499/500 (defamation) IPC." ... Court imposes fine of Rs 2,500 each on Arvind Kejriwal, Manish Sisodia A court here today imposed a fine of Rs 2,500 each on top AAP leaders Arvind Kejriwal and Manish Sisodia for their failure to appear before it... (कारण काय तर केजरीवाल बंगलोरमधे आपच्या प्रचारात व्यस्त होते! त्यामुळे कोर्टात जाणे शक्य नव्हते. अर्थात टाळाटाळ करत खटला निवडणूकीच्या नंतर येईल हे बघायचे) दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेसचः Arvind Kejriwal among five AAP candidates facing criminal cases Arvind Kejriwal declares nine criminal cases against him and assets worth Rs.2 crore (९ आणि ५ मधील फरक माहीत नाही. त्यांच्या उमेदवारी अर्जाप्रमाणे ५ गुन्हेगारी खटले आहेत). आता एके व्यतिरीक्त इतर काही सन्मान्य स्पेशल आम आदमी बघुयात! Delhi LG seeks President's assent for criminal case against Somnath Bharti Delhi law minister Somnath Bharti was once unethical spammer Somnath Bharti was indicted for 'tampering with proof'
----------------
आता शेवटी अजून एक गोष्ट बघूयात... मोदी आणि केजरीवाल यांच्या (अनुक्रमे गुजरात आणि दिल्ली विधानसभा) उमेदवारी अर्जातील प्रमुख गोष्टींची तुलना. (source: myneta.info)
Candidate Constituency Party Criminal Case Education Total Assets Liabilities
Narendra Modi MANINAGAR BJP 0 Post Graduate Rs 1,33,42,842 0
Arvind Kejriwal NEW DELHI Aam Aadmi Party 5 Graduate Professional Rs 2,10,48,389 Rs 41,23,550

 


मोदींविरूद्ध उभे राहणार्‍या केजरीवालांनी कमालीची चतुराई दाखविली आहे. आपण २३ तारखेला निर्णय घेऊ असे २ दिवसांपूर्वी सांगून त्यांनी इतरांची उत्कंठा वाढविली आहे. आता २३ तारखेपर्यंत वाहिन्या केवळ ते उभे राहणार की नाही हाच विषय चघळत बसतील. तिथल्या जनतेला विचारून आपण ठरवू असे सांगून केजरीवाल उमेदवारीचा देखील इव्हेंट करतील. फोकस सतत आपल्यावर राहील याची पुरेपूर काळजी ते घेत आहेत. ते वाराणशीतून उभे राहणार हे नक्की. त्याआधी जनतेच्या आग्रहामुळे आपण उभे आहोत हे सांगण्याचा पुरेपूर ड्रामा ते करणार. त्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत बहुतेक दिवस ते वाराणशीतून प्रचाराच्या अभिनव कल्पना लढवतील व सतत प्रकाशझोतात राहतील. कदाचित ते निवडून सुद्धा येतील कारण वाराणशी भाजपसाठी अवघड मतदारसंघ आहे आणि जर इतर सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर मोदी पडतील. पण वाराणशीत अडकून पडल्यामुळे त्यांना आपल्या पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी प्रचाराला फारसा वेळ मिळणार नाही. पक्षासाठी प्रचार करायचा का स्वतःसाठी पूर्ण वेळ द्यायचा हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे असेल. पण ते प्रसिद्धीसाठी हपापलेले असल्याने पक्षाकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या विजयासाठी जिवापाड प्रयत्न करतील. केजरीवाल जिंकतील पण त्यांच्या पक्षाची वाढ फारशी होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

डरना जरुरी है :) करून जातील अडवाणी राव आणि केजरीवालांचे नाव. जूनमध्ये मिपावर केजरीवाल हे अडवानींचे हस्तक कसे आहेत ह्याचे लेख आले नाही म्हणजे मिळवलं.

In reply to by संपत

अडवाणी - मोदी लांब राहूंदेत... एक फरक नक्की सांगतो. आज जे कोणी मोदींना आणि भाजपाला पाठींबा देत आहेत ते सद्यस्थितीने त्रस्त झालेल्यातला एक भाग आहेत. त्यांना असे वाटते की मोदी-भाजपा-एनडीए ला संधी देण्यात काहीच हरकत नाही. उद्या खरेच मोदी-भाजपा-एनडीए सत्तेवर आले आणि त्यांनी अगदी केजरीवालांसारख्या माकडचेष्टा लांब राहूंदेत पण जे अपेक्षित आहे तसा राज्यकारभार चालवला नाही, व्यवस्था सुधारली नाही तर ते त्याच मोदी-भाजपा-एनडीए वर जाहीर टिका करायला कमी करणार नाहीत आणि पुढच्या निवडणुकात त्यांना घरी बसवायला देखील मागे पुढे पहाणार नाहीत. केजरीवाल समर्थकांचे उलटे आहे. त्यांच्या चुका देखील झापडे लावल्याने दिसत नाहीत अशी अवस्था आहे असे म्हणता येईल. दिल्लीतल्या तमाशानंतर हे सिद्ध झालेले आहे... कारण काही असुंदेत पण, "मोदी समर्थक हे वरकरणी मोदी वाटले तरी देशाचा जास्त विचार करणारे वाटतात तर केजरीवाल समर्थक हे देशापेक्षा त्या व्यक्तीचे समर्थक वाटतात" असे म्हणले तर चुकीचे ठरेल का?

In reply to by विकास

एकदा केजरीवालांना (किंवा इतर कुणालाही) चारित्र्याचं, पावित्र्याचं, अंतर्बाह्य शुद्धतेचं सर्टीफिकेट दिलं कि जनतेला आंधळेपणाची मजा भोगायला मोकळीक मिळते... व कालांतराने वास्तव समोर आलं कि कलियुग/लोकांची लायकी/सिस्टीम मधले दोष इत्यादींच्या नावे शिमगा करायला जनता तयार असते.

In reply to by अर्धवटराव

सहमत आणि त्यापुढे सतत "I am a small man..." म्हणायचे. खरे म्हणजे त्यांचे ते "मी किती साधा, लहान माणूस आहे" असले भंपक बोलणे ऐकले की चालबाज मधील "मै ऐक नन्हासा छोटासा, प्यारासा बच्चा हूं" या शक्ती कपूरच्या डायलॉगची आठवण होते, एक होतकरू नेता ज्याला राष्ट्रीय नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत त्याने असले बाष्कळ बोलणे ऐकले की शिवरायांचे कैसे बोलणे... बदलून म्हणावेसे वाटते: केजरीवालांचे कसले बोलणे, केजरीवालांचे कसले खोकणे, केजरीवालांचे मफलर गुंडाळणे... अरेरे...

In reply to by विकास

एक सांगू का.. आपाच्या यशाबद्दल अवास्तव अपेक्षा आआप समर्थांकापेक्षा मोदी भक्तांच्याच जास्त आहेत. आआप केवढी, तिचा जीव केवढा.. आआपला ३० च्या वर जागा मिळाल्या तर तो चमत्कार ठरेल. आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे. सध्या मोदींना धोका त्यांच्या पक्षातर्गत विरोधकांचा आणि अमित शहासारख्या सल्लागारांचा आहे, आआपचा नाही. दुसरी गोष्ट भाजप समर्थक नंतर भाजप वर टीका करण्याचे.. तर बाजपेयी सरकारने निवडणुकीतील प्रमुख आश्वसानापैकी (राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द) एकही पाळले तर नाहीच पण फारसे प्रयत्नही केले नाहीत. त्याबद्दल अनेकांना काय बाजपेयी आणि अडवाणींची मुत्सद्देगिरी कि सत्ता तर टिकवली असे कौतुक करताना पाहिले आहे. अर्थात भाजप समर्थकांनी नाही पण लोकांनी त्यांना घरी बसवलेच.

In reply to by संपत

तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे.
अत्यंत योग्य निरिक्षण!
तर बाजपेयी सरकारने निवडणुकीतील प्रमुख आश्वसानापैकी (राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द) एकही पाळले तर नाहीच पण फारसे प्रयत्नही केले नाहीत.
ये बात! बाकी दोन मुद्यांच सोडा पण राम मंदिर हा एकमेव बालिशच मुद्दा बिजेपीला सत्तेत घेऊन आला. त्यामुळे बिजेपीच्या सत्ताकालात देशांतर्गत जातीय तेढ कमालीची वाढली.
त्याबद्दल अनेकांना काय बाजपेयी आणि अडवाणींची मुत्सद्देगिरी कि सत्ता तर टिकवली असे कौतुक करताना पाहिले आहे. अर्थात भाजप समर्थकांनी नाही पण लोकांनी त्यांना घरी बसवलेच.
काँग्रेस काय की बिजेपी काय, जातीय दुफळी माजवून सत्ता काबिज करणं हीच त्यांची `मुत्सद्देगिरी' !

In reply to by संपत

आपाच्या यशाबद्दल अवास्तव अपेक्षा आआप समर्थांकापेक्षा मोदी भक्तांच्याच जास्त आहेत
आआपचे ते 'समर्थक आणि मोदिंचे 'भक्त' हा दृष्टीकोनच मुळी चुकीचा आहे. मोदिंच्या मागे निदान सामान्य माणसाची सुशासनाची आशा आणि धनदांडग्यांचा अमाप पैसा मिळवायचा लोभ तरी आहे. पण केजरीसाहेबांकडे व्यक्तीगत करिश्म्याशिवाय विकायला काहिच नाहि. भक्तीचं लिंपण कुठे जास्त आहे मग? आआपचा धोका मोदिंना अजिबात नाहि असं नाहि. डॉ. हर्षवर्धन ला पोचलेली झळ ताजी आहे. पण तो एकमेव धोका नाहि; किंबहुना आणखी मोठे धोके मोदिंच्या मार्गात आहे हे ही खरं. पण म्हणुन मोदिंचं राजकारण आआप केंद्रीत होणार नाहि. तेव्हढी दक्षता मोदि नक्की घेतील. स्वतः केजरीवाल मोदिंचा प्रचार करताहेत तो मोदिंच्या पथ्यावर नक्की पडेल. वाजपेयी सरकारने अयोध्या, समान नागरी कायदा वगैरे मुद्दे का बाजुला ठेवले हे खरच तुम्हाला माहित नाहि का? नरसिंहरावांनंतर भारताच्या राजकारणाची चाललेली ससेहोलपट थांबवणं, आघाडीचं कडबोळं सांभाळत स्थिर सरकार देंणं, नव्या आर्थीक नितीची जोपासना करणं, हि कामं वाजपेयींनी प्राथमिकतेने केली. भाजपा शासनात अल्पसंख्यकांना सुरक्षीत जीवन जगता येणार नाहि हा गैरसमज वाजपेयींनी दूर केला. अपेक्षेच्या अगदी विपरीत अस सामाजीक सहोदर्याचं वातावरण निर्माण केलं. गोधरा कांड झालच, पण त्याची मिमांसा वेगळी आहे. हि केवळ मुत्सद्देगिरी नव्हती, तर ति वाजपेयी-अडवाणिंची समजुतदारी होती. २००४ ला भाजप सत्तेत का आला नाहि याची कारणं त्या निवडणुकीत एन.डी.ए च्या नंबर गेममधे आहे. शिवाय कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या आघाडीचा प्रयोग म्हटल्यावर त्यानंतरचं भाजपाचं भविष्य सांगायला ज्योतिष नको. आआपचा एक संभाव्य धोका भाजपला नाहि तर भारताच्या राजकारणाला आहे. आआपचं राजकारण शिवसेनेच्या मराठी माणसाच्या राजकारणाच्या रुळावर जायचे चान्सेस आहेत. दोन्हिकडे जनसामान्यांचा दबल्यागेल्याचा आक्रोष आहे. भावनीक, प्रामाणिक वाटावं असं पण आक्रास्ताळलेलं, समर्थकांना विवेकाधिष्टीत मार्ग दाखवण्याऐवजी ठोकशाही वापरणारं नेतृत्व आहे. जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे.

In reply to by अर्धवटराव

जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे.
ही वाक्यरचना आवडली.

In reply to by अर्धवटराव

अर्ध्या लेका शिकला असतास तर बॅलिस्टर झाला असतास ! >>>जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे. ह्या एका वाक्याबद्दल लई लई वेळा पार्टी नि प्यार्टी पण! सगळंच अवांतरः न्यूनगंड नि निव्वळ न्यूनगंड दिला राव ह्या नि अशा लोकांनी मराठी माणसाला. वडापावच्या गाड्यां वर पोरं खुश, बेकार मिलकामगार कामधंद्याला पोरं लागली म्हणून तर्रर्र. महत्त्वाकांक्षा कॉलेजात जाण्याची नाही तर त्या भोवतालचा कामगार वर्ग बनून राहण्याची. फारच भलं झालंय मराठी माणसाचं. असोच्च.

In reply to by अर्धवटराव

वाजपेयी सरकारने अयोध्या, समान नागरी कायदा वगैरे मुद्दे का बाजुला ठेवले हे खरच तुम्हाला माहित नाहि का?
मग आश्वासने का दिली? खरी गोष्ट ही आहे कि भाजप बहुमतात असता तरी हि आश्वासने पाळली गेली नसती. ह्या निर्णयांमुळे निर्माण होणारे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात धमकच नव्हती. त्यांचा भ्याडपणा बाबरी मस्जिद पडल्यावर जे 'तो मी नव्हेच' चे प्रयोग झाले तेव्हाच सिद्ध झाला होता. थोडक्यात भाजपने ती आश्वासने दिली होती जी पाळण्याचा त्यांचा कधीही विचार नव्हता. माझा विरोध त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत ह्याला नसून त्यांच्या खोटेपणाला आहे. वाजपेयीन्बद्दल मला आदर असला तरी ह्या खोटेपणात तेही मूकपणे सामील होते.
आआपचं राजकारण शिवसेनेच्या मराठी माणसाच्या राजकारणाच्या रुळावर जायचे चान्सेस आहेत.
चान्सेस आहेत म्हणजे अजून गेलेले नाही. जर जाईल तर दाखवेल कि जनता त्यांची जागा त्यांना.
आप कडुन देखील आशा आहे
उम्मीदपे दुनिया कायम है..