आई म्हणोनी..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आई म्हणोनी..
पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ?
किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले . पाहिलं म्हणजे सहनशक्ती … हो खूप सहनशक्ती पाहिजे पालक व्हायला . त्यांना जन्म दिल्यापासून आपलाच आई म्हणू जन्म झालेला असतो ,आणि आई म्हणून आपणही त्यांच्या सोबत वाढत असतो . आपणही आई म्हणून सुरवातीला चुकतो , नवीन नवीन गोष्टी शिकत ,शिकवत राहतो . हा सर्वच काळ कसोटीचा असलातरी निखळ आनंदाचा पण असतो . बाळांनी मारलेली पहिली हाक , त्यांचे पहिले पाऊल , त्यांचा तो आपल्याच कडे येण्याचा हट्ट खूप सुखाऊन जातो. त्यांचा शाळेचा पहिला दिवस आपल्यासाठीही खूप तणावाचा आसतो. नंतर त्यांच्या शाळेतल्या achievements आपल्याच achievements असतात . त्यांची ती शाळेतून आल्यानंतरची बडबड , शाळेतली भांडण, त्यांचे रुसवे फुगवे खूप हवे हवे से असतात . त्यांनी शिकलेली शाळेतली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असते . त्यांची घट्ट मारलेली मिठी , आणि दिलेला गोड पापा म्हणजे जगातली सगळ्यात सुखकारक गोष्ट आहे .
पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा .
अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या लेकीनी शिकवली ती म्हणजे कृतज्ञता (gratefulness )
कुठलीही छोटी गोष्ट जरी केली तरी ती म्हणायची thank so much mamma . ड्रेस घालून दिला कि thank you . जेवण दिलं कि thank you . आणि ते हि खूप मनापासून . काही बनवलेलं आवडलं कि खूप कौतुक करायची . खूप टेस्टी आहे , yummy आहे . एव्हडीशी पिल्लू माझी , माझे प्रयत्न खूप appreciate करते कि माझा ऊर भरून येतो.
छोट्या छोट्या गोष्टी मी एन्जोय करायला शिकले. त्यांच्याबरोबर मीही पोहायला शिकले . त्यांचे क्लासेस , त्यांच्या आत्मसात केलेल्या नवीन गोष्टी मलाही खूप आनंद देऊ लागल्या . मोठीचे violin ऐकून मीही सप्त सुरात न्हाहू लागले , त्यांचासोबत त्यांची गोष्टीची पुस्तकं वाचताना मलाही खूप आनंद मिळू लागला . पहिल्यांदा जेंव्हा त्यांनी त्यांची पुस्तकं स्वतंत्रपणे वाचली ,काय आनंद झाला तेंव्हा म्हणून सांगू ? मग त्यांच्या सोबत वाचनालयात जाऊन पुस्तकं आणणे आणि वाचणे एक आनंदाची पर्वणीच झाली .
अजूनही शिकते आहे , धडपडते आहे . त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन आव्हान असतील , खूप कसोटी लागेल आमची , पण हा प्रवास आनंददायी मात्र नक्की असेल .
प्रतिक्रिया
मी पयला .
काय केल पहिला येउन?
हे हे हे
काय केल पहिला येउन? ठ्ठो
@अर्पणाताई-व्यनी केला आहे .
छान लिहिलय. आवडलं.
धन्यवाद
+१
अगदी खरं
गोड लिहिलं आहे
आनंददायी प्रवास
तुम्ही तुमच्या पिलुविषयी
हो
माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला
लेख आवडला ...अनुभव हाच सच्चा
हां.हां. हां.
मस्त लेख....
खूप खूप धन्यवाद सर्वांना