नमस्कार मिपाकरांनो,
शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे.
त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता. काही कारणांनी पालकांना आणि सासुरवाडीकडील मंडळींना ते घर पसंत पडले नाही.म्हातारे झाल्यानंतर पालक त्यांच्याकडेच येणार म्हटल्यावर ज्या काही गोष्टी असणे पालकांना अपेक्षित होते त्या त्यात नव्हत्या/करून घेता येणार्यातल्या नव्हत्या.त्यामुळे आयत्या वेळी दोघांनीही--पालकांनी आणि सासुरवाडीकडच्यांनी हात वर केले.त्यामुळे मुळातले २०% उभे करता येणे कठिण होते हे लक्षात येताच त्यांनी घरमालकांना आपली अडचण सांगितली आणि अन्य कोणी घर घेण्यात इंटरेस्टेड असेल तर त्यांना घर जरूर विका असे त्यांना सांगितले. घरमालकांनी घराची किंमत जास्त दाखवून त्याच्या ८०% कर्ज मिळेल असे सांगितले पण त्या केसमध्ये महिन्याचा हप्ता बराच जास्त झाला असता आणि तो परवडण्याच्या पलीकडे गेला असता असे म्हणून तसे करण्यास नकार दिला.
या घरमालकांनी स्वतःसाठी दुसरे घर बुक केले आहे. घरमालक कंपनी क्वार्टर्समध्ये राहतात आणि पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार आहेत. स्वतःच्या घरासाठी त्यांनी पहिली २०% रक्कम भरली आहे आणि या घराच्या विक्रीतून ते पैसे आपल्या घरासाठी देणार आहेत.गेल्या २-३ महिन्यापासून घरमालक हे घर विकायच्या मागे होते पण ते विकणे शक्य झाले नाही. तसेच घरमालक पुढच्या वर्षी निवृत्त होणार असल्यामुळे कर्ज उचलणे अर्थातच शक्य नाही.गेल्या २-३ महिन्यापासून उरलेले ८०% पैसे न मिळाल्यामुळे या घरमालकाला त्यांच्या काऊंटरपार्टीला दर महिन्याला १.५% व्याज भरावे लागत आहे (गेल्या आठवड्यापासून). त्यामुळे या घरमालकाला घर लवकरात लवकर विकायचे आहे.तसेच अचानक घर विकायला लागले तर कोणी भाडेकरू तिथे राहायला तयार होणार नाही हे लक्षात घेऊन या घरमालकांनी एका कंपनीबरोबर करार केला.त्या कंपनीत काम करणारे कामगार तिथे राहत आहेत--जे कधीही महिन्याभराच्या नोटिसवर सोडून जाऊ शकतील.
माझ्या परिचितांनी मागच्या शनीवारी टोकन रक्कम घरमालकाला दिली (१ मार्च).हो-नाही करत शेवटी कालच्या शुक्रवारी (७ मार्चला) पालकांनी आणि सासुरवाडीकडच्यांनी पैसे उसने द्यायला नकार दिला.आपल्याला घर घेता येणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच घरमालकाला ते कळविले.मधल्या ५-६ दिवसात या घरमालकांनी घर बघायला येऊ इच्छिणार्या इतर २-३ जणांना घर विकले गेले असे कळवले आणि परवा (६ मार्चला) त्या घरी राहत असणार्या कामगारांना महिन्याभरात घर खाली करायला सांगितले.
आता हा घरमालक दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडला आहे.तसे बघितले तर माझ्या परिचितांमुळे ५-६ दिवस फुकट गेले हे नक्कीच मान्य आहे.पण आता यावरून हा घरमालक "मेन्टल हॅरॅसमेन्ट" साठी माझ्या परिचितांना लीगल नोटिस धाडणार अशी धमकी देत आहे आणि टोकन मनीच्या दुप्पट पैसे आणखी मागत आहे.
माझ्या मते या केसमध्ये फार तर घरमालक टोकन मनी परत करायला नकार देऊ शकेल.त्याच्या दुसर्या व्यवहारात उशीर होत आहे म्हणून माझ्या परिचितांवर (पहिल्या व्यवहारासाठी) लीगल नोटिस बजावण्यासाठी काहीच locus standi घरमालकाकडे नाही.तसेच जे काही पैसे माझ्या परिचितांनी दिले आहेत ते गुड फेथ मध्ये दिले आहेत--म्हणजे चेक वटला आहे त्याव्यतिरिक्त पैसे दिल्याचा इतर काही पुरावा त्यांच्याकडे नाही.तसेच एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर परत फिरल्यास नुकसान भरपाई म्हणून पैसे भरू अशा स्वरूपाच्या कोणत्याही कागदावर त्यांनी सही केलेली नाही.तेव्हा माझ्या मते या लीगल नोटिसला काहीच अर्थ नाही. जर काही कारणाने ८०% कर्ज द्यायला बँकेने नकार दिला असता (उत्पन्न पुरेसे नाही किंवा अन्य कारणाने) तरी या परिचितांना ते घर घेता येणे शक्य नव्हतेच.तेव्हा टोकन मनी दिला म्हणून घर विकत घेतलेच पाहिजे अशा स्वरूपाची सक्ती घरमालक नक्कीच करू शकणार नाही. फार तर दिलेल्या टोकन मनीवर माझ्या परिचितांना पाणी सोडावे लागेल असे मला वाटते.
माझे म्हणणे बरोबर आहे का? की त्याव्यतिरिक्त घरमालक काही करू शकेल का? मिपाकर यावर काही सांगू शकतील का?
वाचने
13030
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
घरमालक टोकन मनी परत करायला
तसेच पुढील खरेदीचा व्यवहार करताना जमल्यास आधी
In reply to घरमालक टोकन मनी परत करायला by आत्मशून्य
+१
In reply to घरमालक टोकन मनी परत करायला by आत्मशून्य
मला जरा आश्चर्य वाटेल
In reply to +१ by पैसा
जर MOU केले नसेल, तर टोकन परत
चुक्याच ..
धन्यवाद
थोडी चालू गिरी......
आमच्याकड इसार पावती /टोकन मनी
अॅग्रीमेंट टू अॅग्री इज नॉट