✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो

अ — अजय जोशी, Fri, 02/21/2014 - 12:22
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो पानगळ असली तरी मधुमास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही ते तसे होईल तेंव्हा खास होतो तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो फायदा नात्यातला चंद्रास होतो केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो बंधने तुडवीत जातो सहज सारी हा तुझ्याइतका मलाही भास होतो प्रेम इतके काय कामाचे जिथे की, आपला वापर 'अजय' सर्रास होतो

प्रतिक्रिया द्या
3751 वाचन

💬 प्रतिसाद (12)

गुड ट्राय..!

आत्मशून्य
Fri, 02/21/2014 - 14:44 नवीन
चांगला प्रयत्न आहे .
  • Log in or register to post comments

कळाले नाही

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 15:41 नवीन
तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
इथे " जे " म्हणजे नक्की काय ? ती नेमके असे काय बघते की नुसते बघितल्यानेही त्रास होतो ? "तरुण आहे रात्र अजुनि " मधल्या नायका सारखा ह्या नायकाचा 'प्रॉब्लेम' आहे काय ??
  • Log in or register to post comments

वळुन जे

अजय जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 17:28 नवीन
आता जे म्हणजे काय सांगू तुम्हाला. 'जे' हे बोलीभाषेत सहज वापरले जाते. जसे 'काय रे..' यातले 'रे' म्हणजे काय असे नाही विचारू शकत. 'जे' याचा अर्थच बघायचा झाला तर, 'पण' असाही अर्थ होईल. अर्थात कोणाला नाही म्हणायचे असल्यास म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/22/2014 - 18:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/22/2014 - 18:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments

व्वाह !

वेल्लाभट
Sat, 02/22/2014 - 18:35 नवीन
मस्त आहे! क्या बात !
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
जमलंय !!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

अजय जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 17:29 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जमेश मस्त

स्पा
गुरुवार, 03/06/2014 - 17:31 नवीन
जमेश मस्त :-)
  • Log in or register to post comments

आवडले!!

सूड
गुरुवार, 03/06/2014 - 18:09 नवीन
आवडले!!
  • Log in or register to post comments

छान आहे!

पैसा
गुरुवार, 03/06/2014 - 19:51 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान!

राघव
गुरुवार, 10/24/2024 - 17:53 नवीन
कविता आवडली.
केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो बंधने तुडवीत जातो सहज सारी हा तुझ्याइतका मलाही भास होतो
हे विशेष!
  • Log in or register to post comments

खूप छान. आवडली.

OBAMA80
Sun, 10/27/2024 - 13:42 नवीन
खूप छान. आवडली. तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो फायदा नात्यातला चंद्रास होतो हे फार भावले.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा