अडकलेले सुपारीचे कण .... भाग १... भूलाबाईची गाणी....
मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही.
तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात.
काल-परवा पण असेच झाले.खानदेशी शेवेजी भाजी वाचली आणि मन एकदम भूतकाळांत पोहोचले.आमच्या आजोबांना १२ मुले-मुली (५ मुले आणि ७ मुली).आता ह्या सगळ्यांना सांभाळायचे, म्हणजे घर पण तसेच हवे आणि आमचे घर पण तसेच होते.२५ फूट बाय ४० फूटचा तर नुसता हॉलच होता.माजघर्,कोठीची खोली,स्वैपाकघर्,वरच्या ४ खोल्या,शिवाय २५ बाय ४० फुटाची गच्ची.आता ह्या घराची बाथरूम किती मोठी असावी? तर १२ बाय १८ फुटाची बाथरूम होती.त्यातच दगडी हौद आणि तांब्याचा आगीचा बंब.
जळगावचा उन्हाळा खूपच कडक, विशेषतः आम्हा मुंबई करांसाठी,त्यामुळे दसरा-दिवाळीच्या सुमारास जळगावला फेरी व्हायचीच्,शिवाय आमच्या कडे गोंधळासकट नवरात्र असल्याने,नवरात्रात जळगावच्या आजी कडे जाणे होत असे.(त्यावेळी शाळेत नाही गेले तरी चालत होते.उंदरांची शर्यत अद्याप सुरु व्हायची होती.)घरचे नवरात्र म्हटल्यावर बर्याचशा आत्या आणि काका-काकू सहकुटुंब हजर असायचे.५०/६० माणसे घरांत असून पण कधी जागेची टंचाई जाणवत न्हवती.
एके वर्षी असेच नवरात्रात गेलो असतांना विटी-दांडू ह्या खेळाची आवड निर्माण झाली.मुळात मारामारी करण्याचाच स्वभाव असल्याने, हा खेळ मला जाम आवडला.ह्या खेळातील माझे प्राविण्य बघून एका मुलाने मला त्याच्या घरी संध्याकाळी आरतीला ये, असे आमंत्रण दिले.
संध्याकाळी त्याच्या कडे गेलो तर बरीच माणसे जमलेली.थोड्यावेळातच त्यांनी गाणी म्हणायला सुरुवात केली.त्या गाण्यांना एक जबरदस्त लय होती आणि समूहगाना मुळे त्यांना एक वेगळीच खूमारी पण चढली होती.गाणी गायल्या नंतर देवीची आरती झाली.
आणि मग प्रसाद वाटप.
हे एक वेगळेच प्रकरण असते.आधी एका बंद डब्यातून तो प्रसाद आणल्या गेला आणि हा नक्की कुठला पदार्थ आहे?हे ओळखायचे काम मुलांना दिल्या गेले.(आम्हाला कूट ओळखायचे वेड बहुदा इथेच सुरु झाले असावे.)तो पदार्थ ओळखल्याशिवाय प्रसाद वाटप होत न्हवते.
मी आणि माझ्या इतर भावंडांनी पण घरी हट्ट करून एक दिवस आमच्या घरी ही गाणी म्हटली.
पुढे आमच्या घरांत पण भाऊ बंदकी झाली आणि जळगावच्या घराची विक्री करण्यात आली.काल-परवाचा तो धागा बघीतला आणि भुलाबाईने आमच्या मेंदूत ठाण मांडले.आता मी हिची गाणी म्हटल्याशिवाय, ही प्रसन्न होणार नाही.
कुणीतरी मला भुलाबाईची गाणी पाठवू शकेल का?
प्रतिक्रिया
मी मुंबैचाच उन्हाळा कडक समजायचो...
भुलाबाई आणी भुलई हा एकच
सा बाई सु सा बाई सु बेलाच्या
अजून आठवल्यावर नक्की सांगेन .
वा मुवि काका
अक्कण माती चिक्कण माती अश्शी
लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा !
ही तर भोंडल्याची गाणी! आम्ही
हादगा
मस्त. आम्ही पण भुलाबाईच
माझाही हातभार..
वेड्याची बायको एकदा झोपली
भोंडल्याचं अजून एक गाणं
भोंडला आणि भूलाबाई.... ह्यांत बराच फरक आहे.
मस्तच .....
काळी चंद्रकळा नेसूं मी कशी
व्वा!
धन्यवाद....
खरे तर
हम्म!
मस्त!!!
मस्त!