डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत. कारण एवढ्या सुंदर पाककृती करण्यासाठी आणि त्याचे फोटो टाकण्यासाठी माणूस साधारण असा परिपक्व असावा. पण त्यांना बघून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ते व्यवस्थित तरुण आहेत आणि व्यवसायाने सुद्धा शेफ नाहीत( वाणिज्य शाखेचा माणूस असतील अशी मुळीच शक्यता वाटत नव्हती.
असो भटक्या खेडकर , शैलेंद्र , भाते, मुवि, विनोद १८, मी आणि उत्सवमूर्ती श्री दीपक कुवेत असे सर्व जण छान मोकळ्या हवेत आकाशाच्या छपराखाली बसलो होतो. समोर एक गायक पेटी आणि तबला साथीला, हवेत सुखद असा गारवा आणि पिणेकरांनी उंच ग्लासात बियर घेतलेली होती. फक्त शैलेंद्र हे आपली निष्ठा बदलत नाहीत म्हणून त्यांनी म्हातारा संन्यासी (ओल्ड मोन्क) घेतलेली होती. खायला प्यायला रेलचेल होतीच. म्हणजे पहाडी कबाब, चिकन मानच्युरियन, सीख कबाब असे गरमागरम पदार्थ होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यात भटक्या खेडवाला यांनी एक असभ्य मराठी म्हणी आणि वाक्प्रचार असे पुस्तक उपलब्ध आहे असे सांगितल्यावर लोकांनी विविध असभ्य म्हणी साहित्य कसे समृद्ध करतात याची थोडी थोडी झलक दाखविली. उदा. कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली
किंवा सतरा साडे तरी भागाबाईचे कुले उघडे
अशा म्हणीतून आपला मुद्दा कसा ठासून सांगितलं जातो हे जाणवले.
भटक्या खेडवाला यांनी अंबरनाथला घर घेतले त्यावर मुंबई पुण्यात आणि इतर महाराष्ट्रात आकाशाला भिडणाऱ्या जागांचे भाव यावर साधक बाधक चर्चा झाली. यात श्री शैलेंद्र यांनी सांगितले कि घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेणे हे खरं तर फायदेशीर ठरते. पण माझ्या मते मानसिक दृष्ट्या आपले घर असणे हे विशषतः गृहिणीला फार महत्त्वाचे वाटते.तुम्ही तुमच्या पत्नीला भाड्याने अगदी हिर्याचे शरीरभर दागिने आणून दिलेत तरी तिला स्वतःचा जरी फक्त एक दागिना असेल तरी त्याचे मोल जास्तच वाटेल. यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. भटक्या खेडवाला यांचे खेद येथे स्वतःचे घर आहे आणि मागे बाग आहे यावर तेथे एक दोन दिवस जाऊन राहायचे यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. श्री दीपक कुवेत यांचे कुवेतला कसे जाणे झाले यावर एक चर्चा झाली. कुवेत हा एक समृद्ध देश आहे आणि भारतीयांना तेथे चांगला वाव आहे असे मतही त्यांनी मांडले.
थोडा वेळ वारुणीचे विविध प्रकार आणी त्याचा उपभोग कसा घ्यायचा आणि दुरुपयोग कसा टाळायचा यावर एक साधक बाधक चर्चा झाली. समोरिल गायकाने गझल गायला सुरुवात केली त्यात गुलाम अली/ जगजीत सिंह यांनी गायलेले काळ चौदहवी की रात थी, इश्क कीजे फिर सम्झीये जिंदगी क्या चीज है. अशी गाणी बरी गायली. यावर श्री भाते यांचे असे मत पडले कि ते काही तितकेसे चांगले नव्हते. अर्थात सर्वाचे असे मत पडले कि त्यःची गायकी जर तितकी चांगली असती तर तो हॉटेलात का गायला असता? निदान त्यांचे गायन पेटी आणि तबला यामुळे वातावरण निर्मिती होत होती यात शंका नव्हती. शैलेंद्र यांना सायकल वर कोकण दौरा करण्याची इच्छा आहे तरी त्यात कोणी सहभाग घेणार असेल तर त्यांना व्यनि करावा.
भटक्या यांनी आताशा हरिश्चंद्र गड आणि तत्सम ट्रेक ची ठिकाणे कशी व्यापारीकरणाने बरबाद होत आहेत यावर दुक्ख व्यक्त केले यावर लोकांनी चिंता व्यक्त केली.अशी चर्चा बराच काळ चालू होती. शेवटी स्टार्टर खाऊन बहुतेकांचे पोट भरले असल्याने समारोपासाठी फक्त फ्राईड राइस आणि दाल तडका मागवली. अशारितीने सर्व जन तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने रात्री साडेअकरा वाजता तेथून उठले आणि हॉटेलच्या बाहेर परत पंधरा मिनिटे गप्पा मारीत कोण कुठे कसा जाणार आणि पुढचा कट्टा श्री रामदास यांच्या घरी आहे तेंव्हा भेटायचे असे ठरवून निघाले.शेवटी एकच वाईट गोष्ट झाली कि श्री दीपक कुवेत यांनी बिल भरले. म्हणजे उत्सवमूर्तीने च पाहुणचार करायचा हे जर अति होते असे माझे वैयक्तिक मत आहे.
श्री मुवि आणि श्री विनोद हे टेबलाच्या दुसर्या टोकाला असल्याने त्या बाजूला झालेल्या अधिक चर्चेसाठी त्यांनी या वृत्तान्ताला हातभार लावावा .
फोटो श्री विनोद यांनी काढले आहेत तेंव्हा फोटो टाकण्याची मी त्यांना विनंती करीत आहे.
प्रतिक्रिया
साग्रसंगीत कट्टा
मध्यवर्ती डोंबिवलीचा परिणाम!
ह्हूं जेव्हढा वेळ कट्टा
बघितलात माझ्या प्रतिसादाचा परिणाम!
मस्त वृत्तांत.
अरेच्च्या! सध्या दे दणादण
मीपण येणार होतो परंतू मी
काही फोटो....
लातुर कट्टा होईपर्यंत माझा '
लातुर कट्टा... होणारच....
मुवि साठी' डिनायल मोड ऑफ '
भारीच... कट्टेकरी एकदम
डोंबिवली "नंदी प्यालेस" कट्टा.
त्या पुस्तकाच्या लेखकास फोन
करा कट्टे!
मस्त वृत्तांत आणि फोटो
भारी झालेली दिसते वारी
मस्त कट्टा झाला
करा बाबांनो करा.
ताई
आतुरतेने वाट बघत आहे.
आज घरी जाउन पहिले इनो चे
कशाला रे. कट्ट्याला आला असतास
कशाला रे. कट्ट्याला आला असतास
हम्म्म... म्हणजे सध्या माझाच
मस्त फोटो!