स्ट्फ्ड मटार पराठे
साहित्यः
नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे.
१ वाटी मटाराचे दाणे उकडून घेणे व मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटणे (मी फ्रोझन मटार वापरले आहेत)
१-१/२ टेस्पून आले + लसूण + हि.मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं करु शकता)
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून गरम-मसाला
१/२ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता)
१/२ टीस्पून जीरेपूड
मीठ चवीप्रमाणे
१-२ टेस्पून बेसन
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करुन त्यात आले + लसूण + हि.मिरची पेस्ट परतवून घेणे.
त्यात भरडसर वाटलेले मटार घालून परतणे.
त्यात मीठ व सर्व मसाले घालून थोडे कोरडे होईपर्यंत परतणे.
त्यात बेसन घालून , ते शिजेपर्यंत परतणे. (बेसनामुळे सारण खमंग होतं व पराठा लाटताना फाटत नाही)
वरुन थोडी कोथींबीर घालावी व मिश्रण गार होऊ द्यावे.
कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या.
त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
पराठा जरा जाडसरच लाटावा.
नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.
गरमा-गरम मटारचे पराठी बुंदी रायत्याबरोबर सर्व्ह करावे.
आवडत असल्यास टोमॅटो सॉस, चटणी - लोणच्याबरोबरही सर्व्ह करु शकता.

खल्लास !!
झक्कास्स...हा प्रकार मला जाम
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
सानिका, तुझे नाव वाचुन माझ्या
स्नॅक्सच्या वेळेत उघडला धागा,
मस्तच ......
खरेच सानिका खूप सुंदर
नेहमीप्रमाणेच असं म्हणता
In reply to नेहमीप्रमाणेच असं म्हणता by प्यारे१
>>पूर्ण भाजला गेला नाही असं
In reply to >>पूर्ण भाजला गेला नाही असं by सूड
बरं.
In reply to बरं. by प्यारे१
काही हरकत नाही, मी खाईन तो
In reply to काही हरकत नाही, मी खाईन तो by रेवती
तुमच्यासाठी शिल्लक राहीला
In reply to >>पूर्ण भाजला गेला नाही असं by सूड
धन्यवाद सूड
In reply to धन्यवाद सूड by सानिकास्वप्निल
तो दुसर्या कोणी खावू नये
In reply to तो दुसर्या कोणी खावू नये by डॉ सुहास म्हात्रे
हल्लीच्या पोरांची घाई हो
In reply to धन्यवाद सूड by सानिकास्वप्निल
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
In reply to कोल्ह्याला द्राक्ष आंबट by अजया
+१
नेहमीप्रमाणेच छान फोटू व कृती
प्रत्येक वेळी नवीन
In reply to प्रत्येक वेळी नवीन by त्रिवेणी
असेच म्हणते
+१
मस्त
भन्नाट .
त्यात मटारचे सारण भरुन सर्वं
In reply to त्यात मटारचे सारण भरुन सर्वं by आदूबाळ
सारणात
In reply to सारणात by सानिकास्वप्निल
धनवा!
तुझ्या नी मृणालीनीच्या पाकृ
बेक्कार थंडी पडली आहे आज
किती छान हिरवेगार सारण दिसते
मस्त पराठे !!
मस्त !
मस्तच... छान दिसतायत अगदी
झबरडस्ट!
वा! वा! झकास! फोटो बघून मेले.
मस्त !!!